पोस्ट्स

संभाजी राजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे

इमेज
छत्रपती संभाजी राजे इतिहासातील  सर्वात बदनाम केलेलं व्यक्तिमत्व म्हणून संभाजी राजांच्या चरित्राकडे पाहिलं जात आणि संभाजी राजाच संपूर्ण आयुष्य रंगेल म्हणून दाखवण्यात आले  पण खोट्या आणि सूडबुद्धीने लिहिण्यात आलेल्या कथा आहेत संभाजी राजांच्या आयुष्यावर लिखाण करणारे बहुतेक लोक हे संभाजी राजांच्या विरोधातले आहेत आणि त्यांचे चरित्रकार अनेकजण आहेत शिवाय प्रत्येकाने आपल्या सोयीचा संभाजी राजा सांगितला इतकेच काय तर काही महाभाग लोकांनी त्यांच्या साहित्यात हि आपली मते मांडली आहेत जे साहित्य संभाजी राजांच्या नावावर आहे संभाजी राजे आहे लहानपणापासून दैववाद आणि देववाद यांच्या विरोधात होते कारण त्याच्या बालपणी त्यांनी कधी कोणत्या देव व अंधश्रद्धेच्या काही चमत्कारावर विश्वास ठेवला  नव्हता याला  इतिहास साक्षी आहे आता आपल्या मूळ विषयाकडे वळू या संभाजी राजे यांची हत्या कोणी व कधी केली यावर सविस्तर पाहू या संभाजी राजे यांना पकडून देण्यासाठी कवी कुलेश आणि गणोजी शिर्के यांच्यावर जो फितुरीचा शिक्का  मारला जातो तो अत्यंत चुकीचा आहे कारण गणोजी शिर्के संभाजी राजे तळकोकण...

आदरांजली या भिमसैनिकाची

गुलामीची बंधने तोडण्य निघाली रणरागिणी तो सह्याद्रीची शूर जातीच्या घरी जन्मली वाघिणी त्या जाधवांची दिली शौर्याची गाथा या भूमीला ती मर्दानी राणी भोसल्यांची अश्या माझ्या या मातेला स्मृतीदिनी आदरांजली या भिमसैनिकाची ।। धृ ।। पुण्याच्या त्या ओसाड वाळवंटात पेरल बीज समतेच उभ्या जगाला दिल दान एका महान शूरवीराच गाढवाच्या नांगराने नांगरलेल्या त्या मातीच पिक आणल जिजाऊ नि त्या भूमीवर स्वातंत्र्यच नांगरून माती कथा तिची होती गुलामीची    अश्या माझ्या या मातेला स्मृतीदिनी आदरांजली या भिमसैनिकाची ।। १ ।। केले जवळ गोरगरीब जनतेला जवळ केल माणुसकीला अन्यायाच्या खाईत पडलेल्या हीनदिनाला स्वाभिमानाची पेटवली ज्योत त्यांच्या अंतकरणाला शिवबाच्या रूपाने नवा राजा दिला या रयतेला म्हणूनच गावी त्यांची कीर्ती अनमोल तयांची अश्या माझ्या या मातेला स्मृतीदिनी आदरांजली या भिमसैनिकाची   ।। २ ।। बांधले शिवरायांनी तोरण स्वराज्याचे साकार केले स्वप्न जिजाऊ मातेचे अन्यायाचा करून खात्मा राज्य आणले जनतेचे स्वराज्य केल निर्माण हीन दिन समाजाचे म्हणून गातो नेहमी कवने त्यांच्या यशकिर्तिचि अश्य...

धर्मनिरपेक्ष बाबासाहेब

धम्म प्रभात मित्रानो  बाबासाहेब कसे आहेत हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत त्यांच्या कामाची महती कशी कशी काय समाजानार बाबासाहेब यांच्याविषयी एक जेव्हा बाबासाहेब धर्मांतर केल्यानंतर काही बौद्ध लोक त्यांच्याकडे आले आणि म्हणाले बाबासाहेब आता आपण बौद्ध धम्म घेतला तेव्हा असे करा आता तुम्ही राज्यघटनेत बदल घडवून आणा आणि अल्पसंख्यांकांचे सर्व फायदे आपल्याला मिळवून द्या त्यावेळी बाबासाहेब ज्या सोफ्यावर बसले होते न त्यावरून उठून उभे राहिले आणि कडाडले मी फायदे मिळवण्यासाठी बौध्द धम्म नाही घेतला जो कायदा इथल्या हिंदुना  असेल तोच कायदा इथल्या बौद्ध लोकांना असेल आणि बाबासाहेबांनी बौद्ध लोकांना आरक्षण ठेवलेच नाही १९५० पासून  ते १९९० पर्यंत तर आरक्षण नव्हते बौद्धांना तरीही प्रगती झाली हि बाबासाहेबांची विचार धारा पण बाबासाहेबांचे हे रूप लोकापुढे येवू दिल नाही खर तर बाबासाहेबांचे हे धर्मनिरपेक्ष रूप जगासमोर आणायला त्यांचे अनुयायी मागे पडले हि शोकांतिका आहे का झाल असे का पडलो मागे आम्ही याचा कधी तरी विचार करतो आणि स्वताच स्वताला दोष देतो कारण आम्ही बाबासाहेब सांगण्यातच कमी ...

हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लोकशाही कशाला द्यायची

 नालायाकांच्या देशात नाही जिद्द उरली लढण्याची हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लोकशाही कशाला द्यायची ।। धृ ।।  बा भीमा का दिला तू अधिकार तुझ्या लेकीवर आज होतोय बलात्कार आज लोकांच्या मनात भरलाय वासनेचा विकार लुटूनिया इज्जत तुझ्या लेकींची घेती वासनांध ढकार वाटत मनाला माझ्या आता करावी तयांची शिकार  पण काय करणार बाबा इथे विचारच झालेत बेकार मग येते चीढ त्या लाचार समाजाची हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लोकशाही कशाला द्यायची ।। १ ।। शिक्षण म्हणजे तिसरा डोळा मंत्र बाबा तू दिला घेवून शिक्षण आता तुझा समाज मोठ्या पदावर गेला तुझ्या विचारांना त्यांनी जातीवाद्यांच्या दावणीला नेला आणि इथेच बाबा तुझा समाज जिवंतपणी मेला सापडली नाही अजून यांना चावी हि विकासाची हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लोकशाही कशाला द्यायची।।१।। शिका संघटीत व्हा संघर्ष करा शिकवण दिली बहुमोलाची शिकून गटातटात विभागलो हि नीती आहे आमची संघर्ष करतो आपसाआपसात कमाल आहे आमच्या नेत्यांची दुर्दशा झाली इथे कोणी हि इज्जत लुटतो तुझ्या समाजाची आस राहिलीच नाही त्यांना तुझ्या विचारांची हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लो...

आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब भाग : १

बाबासाहेब आणि स्थापत्याशात्र . बाबासाहेबांच्या विषयी अजून एक महत्वाची माहिती भेटली आहे मित्रानो प्रथम मी वाचली आणि मलाच आश्चर्य वाटले अभियंत्याच्या यादीत शिवराय आहेतच पण त्यांच्या पाठोपाठ बाबासाहेबांचा नंबर लागतो जगातील महापुरुषांचे हे रूप पाहण्याजोगे असते खरच बाबासाहेब यांचे व्यक्तिमत्व बहुरंगी आणि अष्टपैलु होते याची आपल्याला खात्री पटते तर चल आज आपण बाबासाहेब यांचे स्थापत्यशास्त्र विषयी अभ्यास पाहूया  स्थापत्यशास्त्र अवगत करण्यासाठी आज तरी स्पर्धा दिसून येतात आणि त्यासाठी गुणानुक्रमे मुलांची नवे घेतली जातात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना चार चार वर्षाचा अभ्यास करावा लागतो तेव्हा कुठे त्यांना त्याचे ज्ञान येते ते हि अर्धवट येते हा विषय तांत्रिक स्वरूपाचा असल्याने  बरेच विद्यार्थी नापासही होतात समजण्यासाठी अवधड असणारा हा विषय बाबासाहेबांनी त्याच्याविषयी अधिक ज्ञान संपादन केले होते बाबासाहेबांचा ग्रंथाचा आवाका इतका वाढला कि  त्यांना ग्रंथासाठी घर बांधावे लागले आणि ते बांधताना बाबासाहेब यांनी वास्तुशास्त्राचा अभ्यास  केला आहे त्यांच्याकडे त्यासबंधी अने...

आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब भाग : २

डॉ बाबासाहेब आणि  शेती डॉ  बाबासाहेब आंबेडकरांनी small holdings in india and their remedies हे पुस्तक लिहून शेती समस्यांचा विचार केला त्याचप्रमाणे on small holders relief bill वर चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला इंग्रजांचे कार्यकारी मंडळात मजूर मंत्री असताना दामोदर घाटी योजना महानदीवर धरण कार्यान्वित करून शेतीचा विचार केला states and miniorites मधूनही शेती व शेतकऱ्याच्या विचार केला प्रत्यक्षात त्यांना शेती करण्याचा योग आला नव्हता क्रियेवीण वाचाळता व्यर्थ  आहे असे त्यांना  वाटत असे प्रत्यक्षात कृती हवी होती पण वेळ मिळत नव्हता हे दुःख कदाचित त्यांच्या मनात असेलही प्रत्यक्षात कृतीची बाबासाहेब वाट पाहत होते आणि ती संधी चालून आली नानासाहेब डॉ  आंबेडकर दि २० जुलै १९४२ ला इंग्रज कार्यकारी मंडळात रुजू झाले आणि त्यांच्याकडे मजूर खाते आले एका  वर्षानंतर बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला संपूर्ण भारतात हि अनेकवेळा दुष्काळ पडले दुष्काळामुळे अन्न धान्याचा तुडवडा पडला अत्या...

जादिवादी हल्ले आणि त्यामागची पार्श्वभूमी

१४ एप्रिल च्या दिवशी जगभरात बाबासाहेब यांची जयंती झाली आणि थाटामाटात झाली पण काही जातीवादी लोकांनी बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुकीवर दगडी हल्ला  केला आणि खास करून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याची माहिती भेटते तिथे पोलिसकाय करतात यावर शंका उपलब्ध होते खर तर वाशीम जिल्ह्यातअडोली गावात बाबासाहेबांची जयंती साजरी करू नका असा त्या लोकांचा उद्देस आहे आणि का बाबासाहेब हे  काय फक्त बौद्ध  समाजाचे आहेत का मराठा समाज समजून का घेत नाही खास करून इथल्या मराठ्यांना भडकावण्यात आले  होते याची माहिती भेटते  शिवसेना या नालायक सेनेच्या जिल्हाप्रमुख हा या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार असल्याहि माहिती भेटते आता आठवले यांनी महायुती सोडावी आणि बाहेर पडावे अरे ज्या जातीवादी संघटनेत जाता कशाला बाबासाहेबांचे आणि त्यांच्या समाजाचे इज्जत रस्त्यावर मांडायला गेलात का आज अडोली मध्ये बौद्ध समाजावर जातीवादी हल्ला होतो कारण काय तर बाबासाहेब यांची जयंती तुम्ही साजरी करायची नाही का हा जातीभेद का केला जातो आमची प्रगती यांना सलते असेच म्हणायला लागेल  आता हा हल्ला  कसा झाला हा ह...

लाचार आहात का तुम्ही कि तुम्ही नुसते पैसेच पहिले

जिंकण्या युद्ध हे लोकशाहीचे पक्ष सारे निघाले आज नेते पाच वर्षांनी तोंड दाखवायला आले लाज नाही वाटली भडव्यांना इथे सारेच माजले लाचार आहात का तुम्ही कि तुम्ही नुसते पैसेच पहिले ।। धृ ।। लोकशाहीचा रणसंग्राम होतो आहे इथल्या भूमीवर कुत्र्यावानी भुंकत बसतात नेते इथल्या मैदानावर भिक मागती जनतेपुढे निवडणुकीच्या तोंडावर लाल गालत उभे राहती नेते सारे गल्ली गल्लीवर  जिंकून द्या म्हणती मला मी सारे तुमच्यासाठीच केले लाचार आहात का तुम्ही कि तुम्ही नुसते पैसेच पहिले  ।। १ ।। राजावाणी अधिकार देवू केला तुम्हाला लाजवले तुम्ही त्या शरीर विकणाऱ्या बाईला इमानाने ती बाई सुख देते ग्राहकाला तुम्ही तर विकूनच टाकले स्वतःला तो तिचा धंदा तर हे  तुमचे व्यवसाय झाले लाचार आहात का तुम्ही कि तुम्ही नुसते पैसेच पहिले  ।। २ ।। विकला स्वाभिमान पैस्याच्या आहारी जावून नेत्यांनी लुटले तुम्हाला घरात येवून अजून झोपला आहात जरा भूतकाळ घ्या पाहून संधी आहे आता द्या इमानी नेता निवडून देश हितासाठी लढा रे मतदान करणे तुम्ही सारे विसरून गेले लाचार आहात का तुम्ही कि तुम्ही नुसते पैसेच पहिले...

नवबौद्धयान : बौद्ध धम्माची खरी ओळख

इमेज
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धानंतर २५०० वर्षांनी बुद्ध धम्माचा प्रसार भारत देशात केला १४ ओक्टोंबर १९५६ साली नागपूरच्या भूमीत लाखो जनसागराला बुद्धाच्या  ओटीत टाकले रशियन क्रांतीपेक्षा बाबासाहेबांनी केलेली धम्मक्रांती जगातील सर्वोत्तम धम्मक्रांती ठरली रक्ताचा एक हि थेंब न घालवता केलेली धम्मक्रांती म्हणून जगाच्या इतिहासात नोंद आहे  अश्या महापंडिताने या बौद्ध धम्माचा खरा इतिहास मांडला आणि बौद्ध धम्मात असणाऱ्या दोन पंथात नवबौद्ध यान हा नवीन पंथ निर्माण केला जो सर्वात जास्त प्रभावशाली ठरला आता नाकी काय आहे बौद्ध धम्म आणि त्याचे काय पंथ आहेत त्यांची निर्मिती कशी झाली यावर एक प्रकाश टाकूया प्रथम बौद्ध धम्मात असणारे पंथ एक महायान  जो बुद्धाच्या मृत्युनंतर उदयास आला दुसरा हीनयान तोही याच वेळी उदयास आला आणि तिसरा बुद्धा नंतर २५०० वर्षांनी उदयास आला तो नवबौद्धयान मुळात भगवान बुद्धाने ईश्वर नाकारल्यामुळे ईश्वरवादी धर्मांना मोठा धक्का बसला त्यामुळे बुद्ध व त्याच्या विचाराची नासाडी कशी  करता येईल हे प्रथम हिंदू धर्माने प्रयत्न केला पण बुद्ध स्वतः जिवंत...