जागतिक महिला दिन व आजची महिलांची मनस्थिती
भारतामध्ये जेवढी स्त्रियांची अवनती झाली, तेवढी कोणत्याही देशात झाली नाही. स्त्रियांना या देशात अत्यंत हिन व पुरुषांपेक्षा दुय्यम स्थान देण्यात आले. स्त्रियांच्या या अवनतीस ब्राम्हणवादी व्यवस्था कारणीभूत आहे. स्त्रियांना परंपरागत गुलामगिरीतून काढून तिला स्वातंत्र्य देण्याचे व तिचे उध्दार करण्याचे कार्य भगवान बुध्द, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांनी केले आहे. त्यांनी जे स्त्री मुक्तीसाठी कार्य केले त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. काळ जसजसा पुढे सरकेल, येणारी पिढी प्राचिन भारतातील गुलाम स्त्री व आधुनिक भारतातील स्वतंत्र्य स्त्री यांचा तुलनात्मक अभ्यास करेल, तेव्हा संपुर्ण देश फुले-आंबेडकरांच्या स्त्री मुक्तीच्या कार्यापुढे झुकल्याशिवाय राहणार नाही. प्राचिन भारतातील मनुस्मृतीचे कायदे व प्रथा स्त्रियांसाठी कसे जाचक होते व हे अन्यायी कायदे फुले-आंबेडकरांनी कसे बदलविले ते पुढिल आलेखावरुन दिसून येईल. १. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-१८ व २-२६ नुसार स्त्रियांना वेदाभ्यास व विद्या संपादन करण्याचा अधिकार नाकारण्यात आला. एवढेच नव्हे तर आ...