पोस्ट्स

ऑक्टोबर १, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बौद्ध धम्म निरीश्वरवादी म्हणजे नास्तिक आहे का ?

तथागत गौतम बुद्ध या जगाला दुःखमुक्तीचा मार्ग देऊन गेलो तुम्ही त्याला मानवमुक्तीच्या मार्ग समजलात . मानवाची मुक्ती हि दुःखापासून केली असे समजायला हवे होते पण, तुम्ही जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकलात. पुन्हा नवा जन्म नसतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे पण , तुम्ही त्याला  सोयीनुसार वापरता. अगदी तसेच बौद्ध धम्माबाबत लोकांचा गैरसमज झालेला आहे कि बौद्ध धम्म नास्तिक आहे . म्हणजे तो निरीश्वरवादी आहे. ईश्वर आहे कि, नाही यामध्ये बुद्धाने जरा हि रस दाखवलेला नाही. बुद्ध आपला मार्ग सांगतात  दुसऱ्यावर टीका करीत नाहीत. पण आजचे शिक्षित बौद्ध विचारवंत याना त्या २२  प्रतिज्ञांचा हि अर्थ कळलेला आहे कि नाही हे माहित नाही. अनेक मंडळी शहरात एखादा रविवार एक कार्यक्रम घेऊन धम्म प्रसार आणि प्रचार करीत असतात पण तो फक्त शहरात. गाव ओस पडलीत हे विदारक वास्तव समजण्यास हे असमर्थ ठरलेत तरी आज शोध घेऊ या प्रथम बुद्धाच्या धम्माबाबत असलेला हा गैरसमज . काय बौद्ध धम्म निरीश्वरवादी आहे का  ?  काय बौद्ध धम्म नास्तिक आहे का ?  आता हा गैरसमज का निर्माण झाला याचे उत्तर 'ईश्वर '   नामक...