बळीराजा : एक काल्पनिक पात्र
बळीराजा हे नाव आज इथल्या शेतकऱ्याला दिले जाते. बळीराजा बाबत ठोस कोणतेच पुरावे नाहीत पण त्याच्याबाबत असणारी माहिती खूपच रंजक आहे शिवाय ती कहाणी एका राजाशी मेल खाणारी आहे. एकीकडे बळीला भूगोल नसताना इतिहास आहे असे म्हटले तर तो इतिहासाचा अपमान च ठरेल बळींबाबत संदर्भ सापडतात ते फक्त आणि फक्त पुराणकथेत च बाकी कोणतेही पुरावे नाहीत बळीचे राज्य कसे होते इतकेच माहिती पण व्यवस्था काय होती याबाबत मात्र आज हि एकमत नाही. आज हि शेतकरी म्हणतो इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो . या वाक्यात एक गंमत आहे ती अशी कि हे वाक्य इसवी सणाच्या पूर्वी सम्राट अशोकाच्या आधी कोणी म्हटल्याचे एक हि उदाहरण नाही. कुठे लिहीत नाही को कुणाच्या मुखात नाही बळीराजा खरेच होऊन गेला असेल तर तथागत बुद्धाचे वडील शुद्धोधन हें तर शेतकरी राजा होता त्यांच्या बाबत ऐतिहासिक अस्तित्वाचे दाखले मिळतात दुसरीकडे बळीराजा हा शेतकरी राजा आहे पण त्याचा कधी उल्लेख सापडत नाही बुद्ध इतिहासात नाही कि बुद्ध पूर्व इतिहासात हि इतकेच काय सातवाहन काळात हि बळीबाबत पुरावे नाहीत. याचा अर्थ नेमका काय घ्यावा बळी हे पात्र इतिहासाती...