चक्रवर्ती सम्राट अशोक : भारतीय इतिहासातील एक सोनेरी पर्व
सम्राट अशोकाला भारताच्या इतिहासातील एक चक्रवर्ती सम्राट मानले जाते हे काही त्याने स्वतःला म्हणवून घेतलेली उपाधी नाही तर समस्त भारत वर्षाने दिलेली पदवी आहे . अशोकाचे साम्राज्य अफगाणिस्थान व बलुचिस्थानपासून चोल, पांड्या, गांधार, आंध्र , कलिंग , भोज , पुलिंद, ताम्रपनी वैगरे मोठी राज्ये व इतर मांडलिक राज्यांचा समावेश ही आहे त्याशिवाय कामरूप, बंगाल , आसाम, ओरिसा पर्यंत आणि काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सर्व भाग अशोकाच्या साम्राज्यात मोडत होता म्हणून अशोकाला चक्रवर्ती सम्राट म्हटले जाते . जगातील लोकांना भारतीय इतिहासाची खरी ओळख करून देणारा राजा म्हणून सम्राट अशोकाला अग्रगण्य स्थान दिले जाते आणि दिलेच पाहिजे . त्याने आपल्या राज्यात बौद्ध धम्माला राजधर्माची मान्यता दिली व मैत्रीचा संदेश घेऊन जगभरात धम्मदूत पाठवले . तसेच भारताच्या कानाकोपऱ्यात अशोकाच्या आदेशाचे माहितीचे शिलालेख अभिलेख लघुलेख गुहालेख स्तंभ लेख कोरून ठेवले आहेत आणि त्यामुळेच भारताच्या इतिहासाची खरी ओळख आपणास मिळते हे श्रेय अशोकालाच द्यावे लागते अन्यथा भारताचा इतिहास हा अंधारात च पडला असता त्...