गणतंत्र का महानायक
भारत हा प्रजासत्ताक म्हणून जगात ओळखला जातो त्याचे श्रेय फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर यांना जाते त्याचा सविस्तर माहिती आपण घेणार आहोत बाबासाहेब यांना गणतंत्र का महानायक म्हटले जाते त्याचे कारण आहे कारण ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीची पहिली बैठक झाली त्या तारखेकडे पहिले तर आज घटना समितीच्या कार्यास २ वर्षे ११ महिने आणि १७ दिवस पूर्ण होतात घटना समितीची एकूण ११ अधिवेशने साली त्यापैकी सहा अधिवेशने उद्दिष्टांचा ठराव आणि मुलभूत हक्क केंद्राची घटना केंद्राचे अधिकार प्रांतिक घटना अल्पसंख्यांक जमाती शेड्युल विभाग शेड्युल जमाती यासबंधीची कमिट्याचे रिपोर्ट पास करण्यात खर्ची पडलेले आहे उरलेली पाच अधिवेशने घटना मसुद्यातील विचाराकरिता उपयोगी पडलेली आहेत घटना सभेच्या ११ अधिवेशनात एकूण १६५ दिवस असतात आणि यापैकी घटना मसुद्याच्या विचारासाठी म्हणून फक्त ११४ दिवस उपयोगी पडले घटना समितीच्या बैठकी प्रमाणे घटना मसुदा कमिटीतच बैठकीचा अहवाल उपयुक्त होईल त्यावरून घटनेच्या कार्याची व तिला लागणाऱ्या वेळेची चांगली कल्पना येईल २९ ऑगस्ट १९४७ साली घटना समितीने मसुदा कमिटीची निवड ...