कोडे राम कृष्णाचे
बाबासाहेबांनी लिहिलेला द रिडल्स इन हिंदूझम या ग्रंथात हिंदू धर्माचा बहुतेक सारा इतिहास मांडला आहे आणि विशेषतः बाबासाहेबांनी या ग्रंथात हिंदूच्या रीतीरिवाज व संस्कृतीची उकल करताना आपल्याला पाहायला मिळते बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक अभ्यास करून अनेक निष्कर्ष काढले आहेत त्यापैकी राम आणि कृष्ण हे हिंदू धर्मातील महत्वाचे नायक मानले जाते अशा नायकांची कशा प्रकारे वागणूक होती याचा सारांश पाहायला भेटतो रामाचे कोडे : राम हा वाल्मिकीने लिहलेल्या रामायणाचा नायक रामायणाची कथा तशी लहानशी आहे पण साधी आणि सरळ आहे त्यात खळबळजनक असे काही नाही राम हा भक्तीचा विषय व्हावा असे या कथेत काहीच नाही तो आज्ञा पुत्र आहे एवढेच आहे पण वाल्मिकीने रामामध्ये काही असामान्य गोष्टी पहिल्या आणि म्हणूनच रामायणाची रचना त्याने केली आणि राम हा विष्णूचा अवतार आहे या गोष्टीवर भर देवून त्याने रामायणाची रचना केली आहे आता राजा म्हणूनरामाचे चरित्र कसे आहे याह विचार करूया एक व्यक्ती म्हणून मी रामाबद्...