आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ८
सम्यक समाधी : ह्या मध्ये माणसाच्या मनातील विकार शांत होऊन मन एककेंद्रित होणे आवश्यक असते. कायिक क्लेशांना न जुमानता साधकाने मन एकाग्र केले पाहिजे. त्यामुळे कायम चित्तशुद्धी होते व चित्तकायशुद्धीतून प्रज्ञा प्रकाशमान होते. अगदी सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे मानवाचा स्वतःच्या मनावर ताबा मिळवणे हे होय. मानवाने मनावर नियंत्रण ठेवल्यास त्याच्या वागण्या बोलण्यावर व त्याच्या कृतीमध्ये खूप बदल जाणवतो यालाच त्याची प्रज्ञा जागृत होणे म्हणतात हा अष्टांग मार्गातील शेवटचा मार्ग आहे कारण ज्याच्या अंगी प्रज्ञा जागृत झाली असेल तोच व्यक्ती शील करुणा अंगी धारण करून निर्वाणाकडे झुकलेला असतो म्हणून हा मार्ग बुद्धाच्या शिकवणीत शेवटचा आहे. प्रथम हे लक्षात घ्यावे कि समाधी मार्ग बुद्धाने शेवटचा मार्ग सांगण्यामागे सुद्धा कारण आहे इतर लोकांनी समाधी प्रथम सांगितली आहे ध्यान प्रथम सांगितले आहे पण बुद्ध मात्र ते शेवटचा मार्ग सांगतात. आता याचा संतांवर किती प्रभाव आहे तो पाहू या. बहुतांश संतांचा एकांतात बसून चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आणि सर्वच संतांनी यावर भर ...