आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ७
सम्यक स्मृती { Right Mindfulness }: अखंड जागरूकता म्हणजे सम्यक स्मृती होय. कोणतीही क्रिया करताना किंवा अनुभवताना आपण ती विशिष्ट क्रिया करीत आहोत वा वेदना अनुभवत आहोत याची क्षणोक्षणी जाणीव ठेवणे हा अर्थ सम्यक स्मृतीत अभिप्रेत आहे . कायानुपश्यना, वेदनापश्यना व धर्मानुपश्यना यांचे संकल्पित रूप म्हणजे सम्यक स्मृती होय. या चार हि विचारांची जाणीव स्मृतीद्वारे ठेवावी लागते. व अखंड जागरूक राहावे लागते. ह्यांची भावना आचरण करणे म्हणजेच आत्मशरण आणि अनन्यशरण होऊन वागणे होय. भारतीय अध्यात्म साधनेत स्मृतीचे अनन्य साधारण महत्व हे बौद्ध धम्मात च आहे . मराठी संतांना सम्यक स्मृती, स्मरण ह्यांचा वारसा त्यातूनच लाभला आहे . बौद्ध धम्मात ज्यांना पंचेंद्रिये म्हणून ओळखल्या जाते , त्या श्रद्धा , वीर्य,स्मृती ,समाधी,आणि प्रज्ञा. यांचा अभ्यास योगसूत्रातून अत्यावश्यक समजला जातो.
थोडक्यात सम्यक स्मृती म्हणजे काय हे आपण पाहिले आहे. आता स्मृती म्हणजे माणसाची स्मरणशक्ती असा सरळ अर्थ येतो पण वरती तुम्हाला काही वेगळेच वाचायला मिळाले असेल मग , इथे द्विधा अवस्था निर्माण होते अरे हे काही वेगळेच तर सांगत नाहीत ना ? तर मित्रानो वेगळे काहीच नाही फक्त सर्वसामान्य लोक स्मरण शक्तीला स्मृती म्हणतात तर जागरूक असणाऱ्या व्यक्तीच्या कृतीला सम्यक स्मृती म्हणतात. यात मनुष्य आपल्या ला स्वतःला जागरूक ठेवतो म्हणजे काय त्याला संपूर्ण कृतीचा अनुभव घेताना तो सर्व स्वरूपाने एकरूप होऊन घेतो . आता हे एकरूप होणे म्हणजे काय ? मित्रानो हे काही वेगेळे ज्ञान नाही सर्वसामान्य माणसाला माहित असणारच असते फक्त आपण अज्ञान असतो
आता आपण जेवतो तेव्हा आपले मन जर का स्थिर नसेल तर आपण जेवतो ते जागरूक न होता म्हणजे काय घाईघाईत जेवतो तेव्हा आपले लक्ष त्या जेवणावर नसते आपण त्या जेवणाला जाणून घेत नसतो केवळ पोट भरावे म्हणून आपण खातो पण त्या जेवणाचा स्वाद आपल्याला घेता येत नाही याला जागरूक नसणे असे म्हणतात. जागरूक होऊन आचरण करणे हे सम्यक स्मृतीत जास्त महत्वाचे आहे.
मराठी संतांवर या सम्यक स्मृतीचा अभाव आहे. याची काही उदाहरणे आपण पाहू या . ईश्वराचे स्मरण करण्यासाठी प्रत्येक संताला याची गरज पडलेली दिसते आहे . आणि म्हणून त्यासाठी ते म्हणतात ,
त्याने काय तुझी नाही केली चिंता | राहे त्या अनंता आठवुनी||
अश्या शब्दात तुकाराम महाराज स्मरण करतात . ज्यांच्यामुळे मुखाने हरीचे स्मरण होत नसेल तर त्या सुखास आग लागो .
आग लागो तया सुखा | जेणे हरी जगजेठी ||
ऐसें धरोनिया ध्यान | मन करावे चिंतन ||
जेवताना चालताना किंवा काम करताना नामस्मरण करावे
राम म्हणे ग्रासोग्रासी | तोचि जेवला उपवासी ||
धन्य धन्य ते शरीर | तिर्थाव्रतांचे माहेर||
राम म्हणे करिता धंदा | सुख समाधी त्या सदा ||
राम म्हणे वाट चाली | यज्ञ पाऊला पाऊली ||
ऐसा रामजप नित्य | तुका म्हणे जीवनमुक्ती ||

आता यापुढे तुकाराम महाराज काय म्हणतात पहा आत्मद्वीप, आत्म शरण होण्याचा प्रभाव त्यांच्या खालील गाथावरून स्पष्ट होते.
कोणी निंदा कोणी वंदा | आम्हां स्वहिताचा धंदा ||
तुम्हासारखे चालावे | तेव्हा स्वहिता मुकावें ||
कोणी निंदा कोणी वंदा | आम्हां स्वहिताचा धंदा ||
तुम्हासारखे चालावे | तेव्हा स्वहिता मुकावें ||
आपुले आपणच जाणावे स्वहित ' परावलंबी राहू नये
आपुलाले तुम्ही कर रे स्वहित | वाच स्मरा नित्य राम राम ||
सावध ती माझी इंद्रिये सकळ ||
आपुलाले तुम्ही कर रे स्वहित | वाच स्मरा नित्य राम राम ||
सावध ती माझी इंद्रिये सकळ ||
जेवताना , बसताना, झोपताना, जागृतीत किंवा स्वप्नवस्थेत हि रुपध्यान करण्याचा सल्ला एकनाथ देतात
आसनी भोजन शयनी | जो चिंति रूप मनी ||
जागृती स्वप्न आणि सुषुप्ती सदा ध्याय रूप चित्ती ||
नसे आणिके ठायी मन | एका शरण जनार्दन ||
जागृती स्वप्न आणि सुषुप्ती सदा ध्याय रूप चित्ती ||
नसे आणिके ठायी मन | एका शरण जनार्दन ||
रामदास म्हणतात .
मनाच्या तोडून वोढी | श्रवणी बैसावे आवडी ||
सावधपणे घडीन घडी | काळ सार्थक करावा ||
मरणाचे स्मरण असावे ||
मनाच्या तोडून वोढी | श्रवणी बैसावे आवडी ||
सावधपणे घडीन घडी | काळ सार्थक करावा ||
मरणाचे स्मरण असावे ||
एकूण संतांच्या ईश्वराशी नामस्मरणाचा भाग असेल किंवा आपला उपदेश असेल त्यात बुद्धाच्या शिकवणीचा प्रभाव दिसतोच दिसतो ईश्वराचे नाम घेण्यात कशी अवस्था असावी हे सांगताना संत सम्यक स्मृतीचा वापर करतात हा त्याचा एक भाग आहे जी बुद्ध हा ईश्वराला नाही तर स्वतःला ओळखण्यासाठी सांगतो आणि संतांनी हे जर का सांगितले असते तर कदाचित संतांचा प्रभाव हा जास्त उठून दिसला असता पण संतांनी देवाला जास्त महत्व दिले असले तरी त्यांच्या वरील बुद्धाचा प्रभाव नाकारता येत नाही कारण हेच ते संत आहेत जे ईश्वराचे नाम घेत जावे सांगत असताना एकीकडे समाज सुधारणा पण व्हावी म्हणून मार्गदर्शन करत असतात . हेच त्यांचे विसंगती असणारी उदाहरणे आहेत . संत भक्तिकडून समाज सुधारानेकडे का वळले ते आपण आधी पासूनच पाहतो आहे . संत साहित्यावर व उपदेशावर बुद्धाचा प्रभाव ठळक दिसतो .
आणि हेच आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय कि इथे संतांनी बुद्धच सांगितला पण नाव ईश्वराचे घेतले जे काम येशू ख्रिस्ताने केले तेच काम इथे संतांनी केल. कदाचित या संतांनी बुद्ध ठळक मांडला असता तर अनेक संतांचे पितळ उघडे पडले असते जे ढोंगी साधू संत झाले होते त्यांचा बाजार थांबला असता संतांचे सांप्रदाय हा बुद्ध सांगू लागला असता तर हिंदू धर्माचा डोलारा कोसळून पडला असता आणि ह्याचे खापर संतावर पडले असते ज्या ज्या संतांनी बुद्ध सांगण्याचा प्रयत्न केला उगडपणे त्या त्या संतांची हत्या केली गेली आहे हा इतिहास आहे. आणि विशेष म्हणजे तुकाराम महाराज असतील किंवा बसवेश्वर असतील नाही तर रविदास यांच्यावर देखील बुद्ध ठळक दिसतो त्यांच्या प्रत्येक शिकवणीत बुद्ध जाणवतो बुद्धाच्या एकूण एका शिकवणीचा प्रभाव दिसतो यांच्यावर
ब्राह्मणी विचारधारा धुडकावून ते समाज सुधारणा करण्याकडे झुकले आणि बाकीचे बहुतांश संत हे ईश्वराशी लोकांना जोडून अंधारात ठेवण्याचे काम केले पण बुद्ध सांगितला तर अंधार नाही प्रकाशच जाणवतो हे ठळक संत संप्रदायात दिसतें आहे . यांचे वेगळे वेगळे भाग दिसतात त्याचे कारण च बुद्ध आहे .
तर चला पुढच्या भागात शेवटचा अष्टांग मार्ग पाहू या . .........

टिप्पण्या