पोस्ट्स

ऑक्टोबर २, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धम्मचक्र अनुवर्तन नव्हे धम्म चक्र प्रवर्तनच

१४ ऑक्टोबर १९५६ भारताच्याच नव्हे जगाच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण क्रांती जी  जगातील सर्वच क्रांती मोडून काढीत नवा इतिहास घडवला गेला बाबासाहेबांच्या या क्रांतीचे इतिहासात सुवर्ण अक्षरांनी  कोरला गेला हा इतिहास  रक्ताचा एक हि थेंब न सांडता केलेली धम्म क्रांती जगाच्या इतिहासात पहिलीच होती . धम्म स्वीकारला तेव्हा तारीख १४ ऑक्टोबर ची होती या दिवशी स्वीकारलेला धम्म भारताच्या इतिहासात बुद्ध धम्माल नवजीवन देणारे ठरले या भारतात बौद्ध लोक  असले तरी धम्म मात्र नामशेष होता हे मानावेच लागते महाबोधी विहार बुद्धाचे असून देखील बुद्धाचा धम्म नव्हता बुद्धाला या भारतात जिवंत  करून केलेली क्रांती हि बुद्धाच्या धम्म क्रांतीचेच रूप आहे  सारनाथ इथे बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन केले तर बाबासाहेब यांनी नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन केले  माझे हे म्हणणे थोडे धाडसाचे आहे कारण एकीकडे बुद्धाने हि धम्मचक्र प्रवर्तन केले आणि बाबासाहेब यांनी हि धम्म चक्र प्रवर्तन केले तर ते कसे काय केले  अनेक विद्वानांचे मत असते कि धम्मचक्र हे फक्त सम्यक संबुद्ध च प्रवर्तित करू शकतात   इतर सामान्य लोकांना ते शक्य नसते आणि हेच कारण आ