बुद्ध विहार
आली आली गड्यानो भीमजयंती आली काय सांगू बाई आज बौद्धवाडी सजली निळ्या पताक्याने सारी निळी निळी झाली पण काय सांगू दादा बाबांचा फोटोची आज तरी सफाई झाली ।। धृ ।। वर्षभर नाही पाहिलं त्या फोटोकडे कारण कधी आम्ही इकडे कधी तिकडे ज्यांनी तोडले आमच्या पायातील कडे आमची वाटचाल त्याच दिशेकडे खूप दिवसांनी विहाराची सजावट झाली पण काय सांगू दादा बाबांचा फोटोची आज तरी सफाई झाली ।। १ ।। गावामध्ये बुद्ध विहार बौद्धावाडीत शोभते काय नशीब आमचे बुद्ध विहाराला कुलूप लागते गावोगावी मंदिरात आज रोषणाई दिसते आमच्या बुद्ध विहारात फक्त मेणबत्तीच विझते आज बऱ्याच दिवसांनी मंदिरात वीज लागली पण काय सांगू दादा बाबांचा फोटोची आज तरी सफाई झाली ।। २ ।। काय सांगावे आमच्या लोकांचा तो विचार ऐकतो बुद्ध म्हणे आज आम्हाला कुठे पावतो बाकीचे देव कर्मकांड करायला लावतो बुद्ध मात्र कर्म करायला सांगतो तरी आज बुद्धाच्या मूर्तीची सजावट केली पण काय सांगू दादा बाबांचा फोटोची आज तरी सफाई झाली ।। ३ ।। जयंतीची धूम सार्या गावागावात दिसते बुद्ध विहारात तेव्हा कोणाच नसते रात्री कव्वालीला म...