धम्माचीभूक
बाबासाहेब यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथाची प्रस्थावना लिहिली आणि त्याच रात्री बाबासाहेबांचा संशयास्पद दिल्ही मध्ये मृत्यू झाला हि बातमी रात्री रेडिओ वरून साऱ्या भारतात पसरली सारा समाज रडू लागला जनता धाय मोकलून रडत होती बाबासाहेबांना त्यांचा अंत्य विधी हा मुंबईत होणार होता आणि बाबासाहेबांचे प्रेत हे दिल्लीत पडून आहे एक तास झाला दोन तास झाले तीन तास झाले चार तास झाले बाबासाहेबांचे प्रेत तशेच पडून आहे एवढा उशिर का झाला त्यांच्या प्रेताला आणायला तर नंतर समजल कि बाबासाहेबांचे प्रेत ज्या विमानाने मुंबईत नेणार आहेत त्या विमानांच भाड कोण भरणार याच्यावरून वाद चालू होता सकाळी चार वाजता हा वाद संपला आणि मग बाबासाहेबांचे प्रेत निघाले दिल्ली वरून सकाळी बाबासाहेबांचे पार्थिव सांताक्रूझ विमानतळावर आणले आणि त्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला तो असा कि सांताक्रूझ विमानतळ लोकांच्या गर्दीने भरले होते जनता रस्त्याच्या दुतर्फा उभी राहून रडत होती काय होते नात त्यांच्याशी बाबासाहेब हे काही रक्ताचे नाते नव्हते बाबासाहेबांचे प्रेत राजगृहात आणले गेले करोडोंचा जनसागर राजागृहाकडे आला होता हिंदूंच्या...