धम्माचीभूक
बाबासाहेब यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथाची प्रस्थावना लिहिली आणि त्याच रात्री बाबासाहेबांचा संशयास्पद दिल्ही मध्ये मृत्यू झाला हि बातमी रात्री रेडिओ वरून साऱ्या भारतात पसरली सारा समाज रडू लागला जनता धाय मोकलून रडत होती बाबासाहेबांना त्यांचा अंत्य विधी हा मुंबईत होणार होता आणि बाबासाहेबांचे प्रेत हे दिल्लीत पडून आहे एक तास झाला दोन तास झाले तीन तास झाले चार तास झाले बाबासाहेबांचे प्रेत तशेच पडून आहे एवढा उशिर का झाला त्यांच्या प्रेताला आणायला तर नंतर समजल कि बाबासाहेबांचे प्रेत ज्या विमानाने मुंबईत नेणार आहेत त्या विमानांच भाड कोण भरणार याच्यावरून वाद चालू होता सकाळी चार वाजता हा वाद संपला आणि मग बाबासाहेबांचे प्रेत निघाले दिल्ली वरून सकाळी बाबासाहेबांचे पार्थिव सांताक्रूझ विमानतळावर आणले आणि त्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला तो असा कि सांताक्रूझ विमानतळ लोकांच्या गर्दीने भरले होते जनता रस्त्याच्या दुतर्फा उभी राहून रडत होती काय होते नात त्यांच्याशी बाबासाहेब हे काही रक्ताचे नाते नव्हते बाबासाहेबांचे प्रेत राजगृहात आणले गेले करोडोंचा जनसागर राजागृहाकडे आला होता हिंदूंच्या ब्राह्मणांना सुद्धा आश्चर्य वाटले बाबासाहेब आणि त्यांच्या अंत्ययात्रेला इतका जनसागर डोळे विस्परले त्यांचे अगदी समाज सारी जनता बाबासाहेबांचे शेवटचे दर्शन घ्यायला आली होती आणि बाबासाहेबांची अंत्ययात्रा निघाली जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी अंत्ययात्रा करोडो जनसागर डोळे पुसत निघालाय मुंबईतील सारी रहदारी बंद पडली दुकाने बंद झाली होती आणि तब्बल गर्दी जमली होती मुंबईच्या इतिहासातील एकमेव अंतयात्रा ना भूतो ना भविष्याती अशी अंतयात्रा चालालि आहे सारे जन दुःखाच्या सागरात बुडाले आहेत बाबासाहेब यांचे पार्थिव त्या दादर येथील हिंदू स्मशान भूमीत आणले लोकांचे ते डोळ्यातील अश्रू काही थांबत नव्हते
त्याचे वेळी बाबासाहेब यांच्या प्रेतासोबात आलेले शंकर आनंद शास्त्री यांनी सांगितले कि नाही बाबासाहेब यांच्यासोबत घातपात झाला हे बाबासाहेबांच्या शवाचे शवविच्छेदन करा आणि बी सी कांबळे यांनी हि शास्त्री यांच्या मताला दुजोरा दिला कि नाही बाबासाहेब यांच्यावर विषप्रयोग झालाय पाहिलं शवविच्छेदन करा पण त्या मध्ये उपस्थित असणाऱ्या हिरानंदानी यांनी सांगितले बाबासाहेबांचे शवविच्छेदन केल तर जगभरात दंगली होतील आणि दंगलीच कारण पुढे केल गेल नंतर बाबासाहेब यांच्या प्रेताला चंदनाच्या चितेवर ठेवलं पण तिथे जमलेल्या जनतेचे अश्रू बोलत होते थांबा थांबा बाबासाहेब यांच्या चितेला अग्नी देवू नका थांबा आज अश्रू हि बोलत होते तिथे जमलेला जनसागर म्हणत आहे थांबा बाबासाहेब १६ तारखेला येणार होते आणि आम्हाला धम्माची दीक्षा देणार होते पण आज बाबासाहेब ६ तारखेला आलेत आता आम्ही यांना जावू देणार नाही केवढी भूक धम्माची बाबासाहेब यांच्या चितेला साक्षी ठेवून १६ लाख लोकांनी धम्माची दीक्षा घेतली अरे ते बाबासाहेब जिवंतपणी धम्माची दीक्षा तर देत होते पण मेल्यावर हि धम्माची दीक्षा देत आहेत जगातील असा पहिला महामानव आहे ज्याने मेल्यावर हि आपल्या अनुयायांना धम्म दिला बाबासाहेबांच्या चितेला समोर ठेवून दीक्षा सोहळा काय देखावा होता डोळ्यात अश्रूंचा पूर वाहत आहे आणि लोक धम्माकडे जात आहेत हि धम्माची भूक आहे धम्म हवा आहे आम्हाला बाबासाहेबांच्या पावूलावर पाय ठेवून ह्या लोकांनी धम्म घेतला
बाबासाहेब आयुष्यभर समाजाला जागा करण्यासाठी झटले उभे आयुष्य खर्ची घातले त्या बाबासाहेबांना आम्ही काय दिल बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी पोलिस बंदोबस्त ठेवून दारूची दुकाने बंद ठेवावी लागता केवढी मोठी शोकांतिका आहे आमच्या लोकांची आम्ही काय केल बाबासाहेबांसाठी बाबासाहेबांच्या विचारांचे तुकडे तुकडे केले अखेर आज परिस्थिती तशी आहे बाबासाहेबांचे विचार सोडून लोकांनी रूढी परंपरा जपत आहेत बाबासाहेबांचा सुद्धा देव केल जाणून बुजून देव केल कारण त्यांना माहित आहे जेव्हा महामानव देव होतो तेव्हा त्याचे विचार संपतात आणि त्याचे विचार संपले कि महामानव संपला हि वास्तविकता आहे आमच्या समाजाने ती स्वीकारली पाहिजे बाबासाहेबांचा संदेश समाजाला पाहिजे बावीस प्रतिज्ञा पंचशील याचे पालन केले पाहिजे बाबासाहेब तर म्हणत जो पंचशील पालन करतो त्याच्यावर कायद्याचा अंमल राहत नाही कारण तो कोणता गुन्हाच त्याच्या हातून होत नाही बाबासाहेब हे पंचाशिलाचे पालन करत होते म्हणून आयुष्यात कधी त्यांच्यावर कायद्याची कारवाई झाली नाही हे सत्य आहे
बहुजन समाजाचे उद्धार करत करत बाबासाहेब जनतेला सांगत गेले आता तुम्ही हि सुधारा नाही तर परत कोणता बाबा बुवा ह्यांच्या नदी जावून परत गुलामीत जाल विचार करा मित्रानो परिवर्तन होणे गरजेचे आहे
सहा डिसेंबर ५६ साली बहुजनाची झोप उडाली
वाली दिनांचा सोडूनी गेला जनता सारी पोरकी झाली
चैत्यभूमीच्या त्या जागेवर जनता म्हणे थांबा
धम्माची दीक्षा द्या बाबा तुम्ही धम्माची दीक्षा द्या बाबा ।।धृ ।।
बाबासाहेब वदले होते येईन मी मुंबईला
धम्माची दीक्षा देईन म्हणाले तुम्हला
तारीख हि निश्चित केली होती त्यांनी त्या समयाला
पण क्रूर काळाने बघा कसा हा घात आमचा केला
चैत्यभूमीच्या त्या जागेवर जनता म्हणे थांबा
धम्माची दीक्षा द्या बाबा तुम्ही धम्माची दीक्षा द्या बाबा ।। १ ।।
१६ डिसेंबर तारीख होती मुंबईच्या धर्मांतराची
पण बातमी आली दिल्लीवरून बाबांच्या महापरीनिर्वाणाची
जनता हि झाली अबोल करूण कहाणी त्यांची
बाबांसाठी धावुनी गर्दी ती चैत्यभूमीवरची
चैत्यभूमीच्या त्या जागेवर जनता म्हणे थांबा
धम्माची दीक्षा द्या बाबा तुम्ही धम्माची दीक्षा द्या बाबा ।। २ ।।
अंत्ययात्रा हि बाबांची चालली सोबत लोटला जनसागर
कोटी कोटी आसवांचा पूर आला दादरच्या भूमीवर
झिजला चंदनापरी कोटी कोटी उपकार आम्हावर
भीम पहिला मी तेव्हा चंदनाच्या चितेवर
चैत्यभूमीच्या त्या जागेवर जनता म्हणे थांबा
धम्माची दीक्षा द्या बाबा तुम्ही धम्माची दीक्षा द्या बाबा ।। ३ ।।
जनतेची हि भूक धम्माची पहिली ना कधी आजवर
साक्ष ठेवून बाबासाहेबांना त्या चंदनाच्या चितेवर
बुद्धं शरणं गच्छामि जयघोष त्या सागरावर
अनुयायी बाबांचे आले बौद्ध धम्माच्या वाटेवर
चैत्यभूमीच्या त्या जागेवर जनता म्हणे थांबा
धम्माची दीक्षा द्या बाबा तुम्ही धम्माची दीक्षा द्या बाबा ।। ४ ।।
रविंद्र सावंत
टिप्पण्या