बलात्कारावर उपाय एकच तथागत गौतम बुद्धांची शिकवण
भारतात सध्या बलात्काराचे प्रमाण पाहता पाया खालची जमीन सरकेल अशी आहे थोडे त्यावर लक्ष टाकू या २०१४ मध्ये नॅशनल क्राईम ब्युरो ने आकडेवारी सांगताना सांगितले होते कि भारतात दर दिवसाला ९२ बलात्काराच्या घटना घडतात अतिशय भयानक अशी परिस्थिती आपणास पाहायला मिळते सध्याचे प्रमाण आता वाढलेले आपणास पाहायला मिळते अश्यावेळी या देशात स्त्री हि केवळ उपभोगाची वस्तू म्हणून या देशात पाहिली जाते असे का होते याचे कारण आजवर आम्ही शोधले कि हि भावना मनात निर्माण का होते याची आपण कधी विचारना केली आहे का तर नाही वासनांध पुरुष बलात्कार करतो त्याला आई बहीण बायको नसतो असे नाही असतात पण बलात्कार करण्याच्या घटना का घडतात याकडे आपण दुर्लक्ष करतो मुळात या विषयावर कोणी बोलत नसतो बलात्कारावर उपाय काय शिक्षा हा काही उपाय होत नाही यासाठी आपणाला इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात घेऊन जावे लागणार कारण तिथून च यावर उपाय काय हे सांगता येईल आपण पाहू या नेमके काय होते ते इसवी सण पूर्व तिसरे शतक म्हणून सम्राट अशोकाचा कालावधी सम्राट अशोकाच्या काळात बलात्कार घडल्याची नोंद सापडत ...