सम्यक कर्म : सम्यक कर्म बुद्धाचा कर्म सिद्धांत आणि हिंदू वा अन्य धर्माचा कर्म सिद्धांत हे वेगळे वेगळे आहेत तरी हि बुद्धाने सम्यक कर्म सांगताना माणसाच्या आचरणात सदाचार आणि पावित्र्य असावे असा अभिप्राय आहे . हिंसा त्याग , दंड व शस्त्रप्रयोग त्याग , प्राण्यांवरील दया , हेच सम्यक कर्म आहे . मनुष्य जीवनाच्या पावित्र्यासाठी आवश्यक असलेल्या पंचशीलाचाही यात समावेश होतो. कुशल अकुशल कर्माचे फळ भोगावे लागते म्हणून अशुभ त्यागून शुभ कर्मे केली पाहिजेत . त्यासाठी अहिंसा,अचौर्य,सत्य मद्यत्याग करावे . हि अपेक्षा असते . भिक्षु ना अकाल भोजन,सुवर्णधन ग्रहण निषिद्ध आहे . त्यांना दहा शिलांचे पालन करावे लागते . या अष्टांग मार्गाचा अनुभव घेणारा साधक सर्वज्ञ आनंद अनुभवत असतो . सर्व जगच त्याला निवास्थान वाटू लागते . बुद्धाच्या सम्यक कर्माचा प्रभाव मराठी संतांवर पडलेला प्रभाव पाहताना आपण ज्ञानदेव म्हणतात . हे विश्वाची माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना चराचर । आपण जाला ।। १२-२११ पुढे जाऊन संत तुकाराम म्हणतात ' पाप पुण्य ,सुख दुःख , हानीलाभ आणि शंकाचा नाश झाल...
टिप्पण्या