पोस्ट्स

मार्च २४, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिकवण बुद्धाची नाव घेतलं ईश्वराच

इमेज
 बुद्ध तत्वांचा येशु ख्रिस्तावर प्रभाव     बुद्ध तत्व प्रणालीचा येशु ख्रिस्तावर प्रभाव असू शकेल का अशी कल्पना यापूर्वी हास्यास्पद वाटत असे परंतु आज अभ्यासांती असे स्पष्ट झाले आहे कि बुद्धाची तत्वे येशूने आपल्या शैलीत सांगितली बुद्धानंतर येशु ख्रिस्ताचा ५०० वर्षांनी झाला तर येशु नंतर ६०० वर्षांनी महमद पैगंबराचा जन्म झाला म्हणून बुद्धाचा प्रभाव येशूवर पडला तर येशूचा प्रभाव इस्लामवर पडला या दोन्ही विश्वधर्मावर बुद्धाच्या तत्वांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो आपण प्रथम येशु ख्रिस्ताचा इतिहास पाहूया येशूचा जन्म बौद्ध राष्ट्रात ; बायबल नुसार येशूचा जन्म पहिल्या शतकात यहुदी जमातीतील राज्यात झाला परंतु हेरोद राजाच्या भीतीमुळे येशूला मिस्र देशात गुप्तपणे न्यावे लागले मात्र राजा हेरोद मरण पावल्यावर येशु आपल्या आई सोबत इस्रायल मध्ये येवून नासेरंथ नावाच्या गावी राहिला आणि येशूचे जन्मकाळी युरोपात बौद्ध धम्माची आणि बुद्धाच्या तत्त्वज्ञांची लाट होती येशूच्या जन्मकाळी बुद्ध धम्म हा एकमेव विश्वधर्म होता आणि बुद्धाचे तत्वज्ञान कोणालाही नवीन नव्हते कोणतेही नवीन पंथ निर्माण होते समय...