धर्म आणि धम्म
बाबासाहेबांनी धर्म आणि धम्म यात काय साम्य असते हे त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात चौथ्या खंडात प्रस्तुत लिहिले आहे बाबासाहेब म्हणत धर्म हा माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नाही पाहिलं बाबासाहेब धर्माची व्याख्या सांगताना म्हणतात कि धर्म म्हणजे ईश्वर पूजा चुकलेल्या आत्म्याची सुधारणा प्रार्थना विधी व यज्ञ याग इत्यादींनी देवाला प्रसन्न करणे धर्म हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतःपुरता मर्यादित ठेवावा सार्वजनिक जीवनात त्याला अवसर नाही उलटपक्षी धम्म हा मूलतः आणि तत्वतः सामाजिक आहे धम्म म्हणजे सदाचरण जीवनाच्या क्षेत्रात माणसा - माणसातील व्यवहार उचित असणे समाज धम्माशिवाय असूच शकत नाही अश्या पद्धतीने धर्म हा वैयक्तिक असून धम्म हा वैश्विक आहे प्रज्ञा आणि करुणा या धम्माच्या दोन कोनशीला आहेत प्रज्ञा म्हणजे निर्मल बुद्धी धम्मात अंधश्रद्धा खुल्या समजुती चमत्कार यांना जागा नाही करुणा म्हणजे प्राणीमात्राविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता प्रज्ञा आणि करुणा यांचे मिश्रण म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म धर्माच्या कल्पनेत वास्तुमात्रांचा आरंभाचा साक्षात्कार तसेच जग श...