आजच्या समाजाची विचारसरणी
भारता भारता तू कशाचा महान रे आज तुझ्याच लेकीबालीचा इथे होतो रे बलात्कार कशाचा महान तू ज्या ,भूमीत तथागत भगवान गौतम बुद्ध जन्माला आले ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्या भूमीत असे स्त्रियांवर होणारे अत्याचार आपण आज पाहत आहोत असे का यांना रोकणारे कोणी नाही का ज्या देशात महान राष्ट्रानिर्माते होवून गेले त्या देशाची हि करुण कहाणी आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत आपल्या या देशात अश्या गोष्ठी सर्रास घडत आहेत मानवाला मनुष्की नावाची ओळख राहिली नाही माणूस फक्त वासनाधीन झाला आहे याला कारणी भूत आजची लोकांची विचार करण्यासाठी पद्धत ती बदलली पाहिजे तर या देशात मैत्रीपूर्ण संबंध राहतील पण याला बदलण्यासाठी माणसाला आपल्या मानुसूचीतेला आव्हान कराव लागेल त्यासाठी या देशातील लोकांना एकच पर्याय राहतो तो म्हणजे माणसाने मैत्री करुणा अंगीकारणे आवश्यक आहे .
आजच्या जीवनात माणूस स्त्री या जातीकडे एक उपभोगाची वस्तू म्हणून समजतो पण कधी हा विचार नाही करत कि हीच स्त्री कधी कोणाची आई असते कोणाची बहिण असते कोणाची मावशी असते कोणाची बायको असते कि कोणाची मुलगी असते मग हि नाती तर प्रत्येक माणसाला असतात तरीही माणूस असा का वागतो त्याला त्याच्या मनात असा विचार का येवू नये कि आपली हि नाती असि आहेत मग ज्या स्त्रीवर बलात्कार करतोय तिच्या भावना असतीलच ना त्या अश्या उधवस्थ करताना मनाची तयारी कशी हाच एक गहन प्रश्न आहे माणसाला मनाची हि विचार करण्याची पद्धत मोडायला हवी आणि या देशात जे चित्रपट दाखवले जातात त्या चित्रपटातून दाखवली जाणारी अश्लीलता हीच आजच्या तरुणाची एवं सर्व वयोगटातील सर्वच व्यक्ती याची शिकार झालीत आज भारत देशाच्या सेन्सर बोर्डात काम करणारी माणसे हि अश्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत आज चित्रपटातून तसेच इतर माध्यमातून लोकांना विविध प्रकारचे चित्रपट दाखवले जातात त्यामधील स्त्रियांचं प्रदर्शन म्हणजे स्त्रीजातीचा तिच्या शरीराचा उपभोग कसा घ्यायचा हे दाखवले जाते
स्त्रियांना नुसती उपभोगाची वस्तू मानून तिचा अपमान केला जातो आज आपल्याला सर्रास एखादा तरी बलात्कार झाल्याच दिसून येत अस का याच कोण विचार करीत नाही याला कारण म्हणजे आज जे इंटरनेट वर सहजरीत्या अश्लील चित्रफित भेटतात त्यामुळे अगदी लहान मुलांच्याही मनात मुलींविषयी वासनामय विचार घोळतात . आणि पाहिलं म्हणजे समाजाच्या विचार सारणीमध्ये अमुलाग्र बदल आपल्याला पाहायला भेटतो माणसाला जे विकारांची भावना उदभवतात त्यांना आला घालण्यासाठी आज समाजाला बुद्धाची गरज आहे कारण मनातील तृष्णा काढून टाकण्यासाठी माणसाला बुद्धाची शिकवण अनुसरली पाहिजे तेव्हाच या समाजाचे कल्याण होणार आहे हा भवसागर तरुण जाण्यासाठी बाकी कोणी आपल्याला मदत करणार नाही पण बुद्धाची तत्वे तुम्हाला नक्कीच तरुण नेतील
जर माणसाने हिंदू धर्मात राहून म्हटले कि आम्ही हा भवसागर तरुण जावूशकतो तर ते शक्य नाहीकारण हिंदू धर्म कर्मकांड याच्याशिवाय पुढे जात नाही देवाची अराधानाकेल्याशिवाय माणसाला मुक्ती हि प्राप्त होत नाही मग तुम्हीभवसागर पार कसा करणार
दुसरे इस्लाम धर्मही माणसाला देवाशी नात जोडायला लावत त्यामुळे तिथेही निराशाच हाती असणार आहे आणि दुसरा इसाई मध्ये हि तुमची निराशाच होते कारण तिथे मोक्ष प्राप्तीसाठी तुम्हाला देवाची आराधना करणे गरजेचे आहे
फक्त बुद्ध धम्मच तुम्हाला सांगतो कि मोक्ष म्हणजे निर्वाण प्राप्त करण्यासाठी तुम्हाला स्वतः बदलावे लागेल काही तत्वांचे पालन केल्यावर तुम्ही हि मोक्ष प्राप्त करू शकता
अजून समाजाला जग आलेली नाही समाज अजूनही झोपेत पेंगत आहे त्यांच्या बुरसटलेल्या मनाला जागृत करणे आवश्यक आहे
टिप्पण्या