नागवंशी महार आताचे बौद्ध यांचे पराक्रमाची शौर्यगाथा : वीर जमादार गंगाराम भागोजी सवादकर
आजवर इतिहासकार यांनी अस्पृश्य म्हणून काही लोकांच्या इतिहासाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले कारण त्यांचा इतिहास हा नेहमीच दैदिप्यमान असा राहिलेला आहे त्यात महारांचे शौर्य हे वाखण्याजोगे होते जगात महार लोकांची नावे आणि स्मारके आहेत हे आजवर आम्हास देखील माहित नाही नाग वंशी लोकांचा इतिहास कधीच सत्य म्हणून पुढे आला नाही त्यांना नाग म्हणजे साप म्हणून आताच्या युगात सांगितले गेले पण नाग म्हणजे साप नसून मानवाचा एक वंश आहे हे आम्हास आता आता कळू लागल आहे खरे पाहता इतिहासाने केवळ अन्याय केला म्हणून नाही तर आम्ही देखील कधी इतिहास पहिला नाही म्हणून आज हि आम्हाला आमचा खरा इतिहास माहित पडलेला नाही हि शोकांतिका आहे चला आमचा इतिहास जाणून घेवू आमच्या शुरविरांची स्मारके आणि त्यांची पराक्रमाची गाथा कशी इतर देशात आज हि साक्ष देत आहेत ते पाहू या त्यातील एक वीर म्हणजे २० दशकातच होवून गेलेलं १/११९ इन्फ्रट्रि बटालियन चे शूर सैनिक जमादार गंगाराम सवादकर जमादार गंगाराम भागोजी सवादकर हे १/११९ इन्फ्रट्रि बटालियन मध्ये १९१४ साली...