नागवंशी महार आताचे बौद्ध यांचे पराक्रमाची शौर्यगाथा : वीर जमादार गंगाराम भागोजी सवादकर
आजवर इतिहासकार यांनी अस्पृश्य म्हणून काही लोकांच्या इतिहासाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले कारण त्यांचा इतिहास हा नेहमीच दैदिप्यमान असा राहिलेला आहे त्यात महारांचे शौर्य हे वाखण्याजोगे होते जगात महार लोकांची नावे आणि स्मारके आहेत हे आजवर आम्हास देखील माहित नाही नाग वंशी लोकांचा इतिहास कधीच सत्य म्हणून पुढे आला नाही त्यांना नाग म्हणजे साप म्हणून आताच्या युगात सांगितले गेले पण नाग म्हणजे साप नसून मानवाचा एक वंश आहे हे आम्हास आता आता कळू लागल आहे खरे पाहता इतिहासाने केवळ अन्याय केला म्हणून नाही तर आम्ही देखील कधी इतिहास पहिला नाही म्हणून आज हि आम्हाला आमचा खरा इतिहास माहित पडलेला नाही हि शोकांतिका आहे चला आमचा इतिहास जाणून घेवू आमच्या शुरविरांची स्मारके आणि त्यांची पराक्रमाची गाथा कशी इतर देशात आज हि साक्ष देत आहेत ते पाहू या त्यातील एक वीर म्हणजे २० दशकातच होवून गेलेलं १/११९ इन्फ्रट्रि बटालियन चे शूर सैनिक जमादार गंगाराम सवादकर
जमादार गंगाराम भागोजी सवादकर हे १/११९ इन्फ्रट्रि बटालियन मध्ये १९१४ साली होते आणि पहिल्या महायुद्धाच्या त्यांच्या बटालियन ला तुर्कस्थानात पाठवण्यात आले होते त्यावेळी पहिल्या महायुद्धाचा काळ चालू होता आणि हे युद्ध चालू होत ते १९१४ ते १९१८ पर्यंत आणि त्यावेळी बटालियन चा मुक्काम हा तुर्कस्तान मध्ये होता या युद्धात ५ मार्च ला १९१८ रोजी गंगाराम यांना वीरगती मिळाली त्यांच्या शौर्याच्या नावे तिथे एक स्मारक बांधण्यात आले आहे आणि एका भारतीय सैनिकाचे त्यातच महार सैनिकाचे स्मारक परदेशात असणे हे आपल्यासाठी गौरवाची बाब आहे याची नोंद मिलिटरी च्या हिस्ट्री लिस्ट मध्ये आहे तुर्कस्थान मधील उत्कृष्ट कामगिरी साठी मरणोत्तर त्यांच्या पत्नीस रुपये १० इनाम देण्यात आला व देशासाठी लढल्या बद्दल गौरव पत्र हि देण्यात आले व सुवर्ण पदक हि देण्यात आले आजवर आम्हास देखील याची कल्पना खूप कमी आहे कि आमच्या लोकांचा असा हि इतिहास आहे ज्यांनी अनेक देशात जावून आपली शूरवीरता दाखवली आहे आफ्रिकेच्या जंगलात देखील भिमाकोरेगाव सारखा महारांच्या शौर्याचा विजयस्तंभ असल्याची माहिती मिळते आहे पूर्ण माहिती मिळताच सांगण्याचा प्रयत्न करू

गंगाराम सवादकर यांचे लढाई मधील शौर्य हे समोरील शत्रूला देखील थक्क करणारे होते कारण त्यांनी आजवर हरणारे पळून जाणारे सैनिक पहिले होते ब्रिटीशांची कधीच अशी बटालियन त्यांनि पहिली नव्हती अनेकवेळा त्यांनी ब्रिटीशांच्या बटालियन ला कत्तली केल्या होत्या पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला इंग्रज सरकार ला मनुष्यबळ कमी भासू लागले जेव्हा ब्रिटीश सैन्याशी जर्मन आणि तुर्क यांनी तुर्कस्थानातील गैलीपोली या बंदरात भयंकर कत्तली केली तेव्हा सरकार ने लढवू लोकांची एक फलटण उभारण्याचे निर्णय घेतला आणि हि लढवू लोक शोधायची कुठे म्हणून त्यांनी भारतातील लोकांचा विचार केला तेव्हा भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते पण सवर्ण लोकात असे लोक मिळणे शक्य नव्हते म्हणून अस्पृश्य लोकामध्ये त्यांना महार लोक हे चपळ आणि शूरवीर असतात याची इतिहासकार असल्याने चांगली माहिती होती आणि तसेच त्यांनी महारांची फलटण उभी केली १११ महार बटालियन म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिली पठाण सैनिकांच्या समोर ब्रिटीश सैन्य तग धरू शकले नव्हते त्यामुळे ब्रिटिशांचे दारुगोळा बंदुके पठाण लुटून घेवून जायचे पण १११ महार बटालियन यांच्या शौर्यामुळे आणि त्यांच्या रणनीतीपुढे पठाणांचे धाबे दणाणले होते आपला जीव घेवून पाळावे लागले होते कारण तेव्हा पठाणाच्या सैन्यांचा सामना महार सैन्याशी होता महारांच्या अश्या अनेक पराक्रमाच्या गाथा आहेत शिवाय पहिल्या महायुद्धात भारतीयांनी प्लाडर्स मेसापोटीनिया पलेस्टाईन आफ्रिकेतील जंगले गैलीपोलीच्या टेकड्या यावर पराक्रम करणाऱ्या ११ लोकास व्हिक्टोरिया क्रॉस देण्यात अ आले होते असे क्रोसेस पहिले कधीच भारतीयांना मिळाले नव्हते ते महारापासून देण्यास सुरुवात झाली
असा महारांचा दैदिप्यमान इतिहास आहे नागवंशी महार आताचे बौद्ध यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा यामध्ये प्रत्येक भागात एक एक नागवंशी शूरवीर लोकांचा इतिहास पाहू या
जय शिवराय जय भीमराय
{ टीप ; भारताची एकमेव बटालियन आहे जिचे युद्धभूमीवरील घोषणा आहे भारत माता कि जय बाकी बटालियन ची घोषणा ह्या देवाच्या नावावरून आहेत }

टिप्पण्या