पोस्ट्स

नोव्हेंबर २०, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महार आणि मराठा...................

मानववंश शास्त्रज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर मानववंश शास्त्राचा वापर करीत म्हणतात महार आणि मराठे दोन भिन्न नसून एकच आहेत  त्यासाठी ते महार आणि मराठा यांच्या ज्ञातीची कुळे सारखीच असल्याचे सांगतात महार आणि मराठे यांच्या कुळात असणारे साम्य म्हणजे दोघांमध्ये सारखीच कुळे आहेत दोघांचे टोटेम देखील सारखेच आहे. आणि असे फक्त त्याच लोकांमध्ये असू शकते जे भिन्न नसून एकच कुळातील असणारे असू शकतात आणि बाबासाहेब म्हणतात कि  हे भाऊबंद  आहेत तरच ते एका वंशाचे सिद्ध होतात {द अनटॅचेबल १९४८ पेज ६४} यावरून निष्कर्ष काढता कसा येईल यासाठी पाहावे लागते मराठा समाजचे पूर्वीचे नाव काय होते ते यासाठी इसवी सणाच्या आधी आधी जावे लागते बुद्ध काळात या भूमीला गणसंघाचा दर्जा असल्याचे दिसते अंगुत्तर निकाय मध्ये रठ्ठीक शब्दाचा वापर हा गणराज्य प्रणालीतील राजाच्या पदांनंतर चा दर्जा असणारे पद मानले जाते यावरून रठ्ठीक रास्टिक राष्ट्रिक हे लोकांचे नाव नव्हते शिaaवाय अशोकाच्या काळात महारठ्ठ देश अस्तित्वात असल्याचा उल्लेख सापडतो त्यावेळी महारठ्ठ हे गणसंघ राज्य होते आणि रठ्ठीक पेत्तनिक व भोज यांचा उल्लेख अशोकाच्या अभिलेखात आलेलाआहे या