बलात्काराच्या देशा
आपला भारत देश या देशात स्त्री म्हणजे आमच्या देव्हाऱ्यातील देवता असे केवळ बोलण्यापुरते का होईना पण म्हटले जाते अश्या या भारत देशात काय चालले आहे याची जाणीव आहे का जनतेला तेच कळेना झालाय देशाच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने २०१४ व २०१५ ची आकडेवारी जाहीर केली आहे आपण आधी आकडेवारी पाहू मग आपल्या महत्वाच्या विषयाकडे लक्ष देऊ या २0१४ साली देशात ३७ हजार ४१३ बलात्कार झाले आणि २0१५ साली बलात्काराची संख्या ३४ हजार ६५१ इतके बलात्कार या देशात झाले आहेत कमालीची आकडेवारी आहे नाही का आपला भारत देश सर्व अभिमानाने मिरवतात भारतात स्त्री देवीचा दर्जा देतो म्हणून आणि त्याच देवीची इज्जत सरेआम निलाम करतो एकीकडे नवरात्रीत नऊ दिवस स्त्रीशक्ती म्हणून देवींचे भक्तिभावाने पूजन करणारे याचदिवसात देखील अनेक भूतलावरील देवींचे शील हरण करण्यात मश्गूल असतात यावर्षी तर बातमीच अशी होती नवरात्री दरम्यान कंडोम ची अधिक विक्री आता क कंडोम कशासाठी वापरतात हे सांगण्याची आवश्यकता नाही पण हि मानसिकता बदलत का नाही वासनेच्या...