आणि बुद्धच महार झाले .....................


जोहार मायबाप जोहार अशी हाक कानी आली कि दारासमोर म्हणे एक माणूस असायचा हातात नागफण्याची काठी घेऊन उभा असलेला राकट बांध्याचा माणूस गावाची महारकी करण्याचे काम करायचा गावाची मेलेली ढोर हा गडी एकटाच एका हाताने उचलून न्यायचा भले भले थकायचे पण हा एकटा ओढत नेत होता पण जगणे याचे जनावराला हि लाजवील असे होते हो गावकुसाबाहेर जीवन जगायचा व गावगाडा हाकीत बसायचा एका महसूर्याच्या जन्माने यांच्या जीवनाचे सोन झाले गावकुसातून गावात आला बंगला आला गाडी आली पण जात काय सुटली नाही भीमाने महाराची महारकी सोडली बुद्धाच्या ओटीत टाकून आज महार म्हणून स्वतः मिरवतात अश्या लोकांनी खास करून इकडे लक्ष द्या
का दिला बुद्ध बाबासाहेबानी बुद्धच का दिला येशू हि देऊ शकले असते कि पैगंबर हि देऊ शकले असते गुरु साहेब पण देऊ शकले असते महावीर पण देऊ शकले असते पण तुम्हाला बुद्धच का दिला याकडे आम्ही कधी वळलो आहे का तुमच्या प्रगतीसाठी तुमच्या सन्मानासाठी तुमच्या स्वातंत्र्यासाठी स्वाभिमानासाठी मोकळा श्वास घेण्यासाठी जातीच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी रूढी बंधने मोडून काढण्यासाठी दिला बुद्ध
स्वातंत्र्य समता बंधुता न्याय घटनेत देऊन भारताला बुद्ध दिला तुम्ही काय करताय
बाबासाहेबांची जयंती आली कि स्टेज वर माईकवर भाषण झाडतो कि या देशाला बाबासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही बाबासाहेब तुम्ही परत जन्माला या
आणि तू कशाला आलाय जन्माला तुझे अस्तित्व काय तू किती बाबासाहेबांचे विचार आचरणात आणतोस
नुसते जयभीम के नारो मर मिंटंगे हम अरे तू जिवंत च कुठे आहेस मारण्याला तू आधीच मेला आहेस तुझ्या शरीरात जीव नावाची गोष्ट च नाही रे
बुद्ध मूर्तीपुढे वंदना घेतो नमो तस्स भगवतो अरहतो आम्ही मात्र पाहिल्यासारखेच राहतो
कसे होणार आपले जातीय रंग आमच्यात काय कमी आहे का ?
आज हि महार असलेला समाज बाबासाहेबांच्या विचारांचा खून नाही का करत कुठे आहेत बाबासाहेब
बुद्ध दिला तेव्हा बाबासाहेबानी एक विश्वास दाखवला होता पण बाबासाहेबांचा विश्वास घात करणाऱ्या समाजाने आपला हक्क बाबासाहेबांवर दाखवू नये अजिबात दाखवू नका
मित्रांनो, धम्मदिक्षा सोहळ्याच्या वेळी बाबासाहेबांनी दिलेल्या भाषणात असे म्हटले होते कि, आपण आता बुद्ध झाले आहोत, त्यामुळे आता आपल्याला हिंदु धर्मातील, देव देवतांचा त्याग करायला पाहिजे व भ. बुद्धाच्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे धम्माचा प्रचार व प्रसार केला पाहिजे असे केल्यास आपण नक्कीच एक आदर्श नागरिक बनु आणी सुखी होउ!पण जर असे नाही केल्यास, व आपले जुण्या चालीरितींना आत्मसात केला, तर लोक म्हणतील कि एवढा चांगला बुद्ध धम्म या महार लोकांनी स्विकारला व त्याला बाटवला. हा दुरद्रुष्टी विचार त्यावेळी बाबासाहेबांनी केला होता. पण असेच भयसुचक वारे आता वाहु लागले आहेत. आपल्या समाजातील लोकांनी बुद्ध धम्म स्विकारला खरा, पण काय ते खरचं बुद्ध झालेत काय? 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना धम्मदिक्षा देउन मुघलांच्या भारतात झालेल्या आगमनानंत्र संपुर्णपने देशातुन हद्दपार झालेला बुद्ध धम्म परत आणला, जगातील कोणत्या धर्मगुरुलाही जमले नसेल असे काम, बाबासाहेबांनी करुन दाखविले. धम्माच्या पुनरुज्जीवनाचे कार्क्ष उशीरा सुरु केल्यामुळे, मला खेद होतो आहे, असे बाबासाहेब म्हणाले. माझे लोक आपले वैयक्तीक सुख बाजुला ठेवुन धम्माचे काम प्रामाणीकपने करतील. बुद्ध धम्म स्विकारुन त्याचे महत्व सर्व जगाला पटवुन देतील. पण कसे पटवुन देतील? पटवुन देण्यासाठी स्वताला तरी थोडी धम्माची जाण असायला हवी ना?आज धम्मदिक्षेला जवळपास 55 वर्षे पुर्ण झालीत. पण त्यानंतरही आपल्या समाजाची स्थिती काय आहे? काही लोक स्वता शिकले, पण त्यांना आपल्या कुटुंबाशिवाय बाहेरचा समाज तर दिसतच नाही. विचार करा मित्रांनो जर बाबासाहेबांनी स्वतापुर्ताच विचार केला असता तर?? ते अरबोपती झाले असते. पण त्यांना सामाजिक जाण होती. समाजाबद्दल आपुलकी होती.
एक महार लाखो ठार एक महार लाखोंची हार अरे काय घोषणा आहेत ह्या इतका जातीचा अहंकार महार लोकांनी त्यांच्या काळात केला पराक्रम पण ते महार आता बौद्ध झालेत ना मग बौद्ध असल्यावानी वागा कशाला पार्ट महार जात लावायला हवे जगाला माहीत आहे महार बौद्ध झालेत ते महार बुद्ध झाले असे जगाला कळू द्या बुद्ध महार झाले असे नको
त्यावेळची बाबासाहेबांचा एक शब्द म्हणजे लोकांच्या काळजाचा तुकडा असायचा कि बाबासाहेबांचा एक हि शब्द त्यांच्या जनतेने कधी खाली पडू दिला नव्हता पण आज काय चालू आहे बाबासाहेबांचे विचार च बाजूला टाकून ठेवले आहेत या जनतेने
बाबासाहेब यांची सभा असायची सर्वच लोकांना जायला जमायचे नाही कारण लांब मग गावातील लोक एक माणूस निवडायची त्याला सांगायचे जा आणि बाबासाहेब काय सांगतात ते फक्त आम्हाला येऊन सांगा बाबासाहेबांच्या शब्दासाठी आतुरलेली जनता इतिहासाच्या पानात अशी कुठे सापडली नाहीत गावाने ठरवलेला माणूस बाबासाहेबांच्या सभेच्या ठिकाणी यायचा शेवटी अडाणी असणारा हा माणूस बाबासाहेबांचे एवढे मोठे भाषण थोडी लक्षात ठेवणार होता बाबासाहेब यांनी भाषण दिल्यावर हा गावात आला लोक जवळ आली त्यांच्या विचारती झाली त्याला अरे आज काय सांगितले बाबासाहेबांनी काय आदेश दिलाय आम्हाला एकडाव गड्या सांग कि काय सांगितलंय बाबासाहेबान डोळ्यात आतुरतेची झलक असायची मग तो माणूस म्हणायचा बाबासाहेब तर लय बोलले पण बाबासाहेब त्यात एक म्हणाले कि तुमच्या पोटाला चिमटा काढा पण तुमची पोर शिकवा बास बास बास लोकांनी एवढेच धान्यात ठेवले आणि आपली पोर शिकवायला सुरुवात केली पण हि पोर शिकली आणि या पोरांनी पार माती केली बाबासाहेबांच्या चळवळीचे वाटोळे केले ते या शिक्षित लोकांनी नुसते शिकले पण शेकले नाही जर का शेकले असते तर जीवनाचे मर्म कळाले असते
कुंभार जेव्हा मडके घडवतो तेव्हा ते कच्चे असते ते जेव्हा आगीवर भाजतो ना तेव्हाच ते पक्के होते आम्ही अजून कच्चेच आहोत म्हणून आम्हाला बुद्ध समजला नाही
 मुळात धर्मंतरामागे असलेला बाबासाहेबांचा हेतु फार कमी लोकांनी लक्षात घेतला आणी त्याहुनही कमी लोकांनी त्यांचा ध्यास योग्य पद्धतीने पुढे नेला. आजही बहुजन समाजातील फार लोक ज्यांनी बुद्ध धम्माचा स्विकार केलाय. ते लोक स्वताला बुद्ध ऐवजी आभिमानाने स्वताला महार म्हणतात. अशी खुप नाटके, मि फेसबुक वर नेहमी पाहातच असतो कि,. जेव्हापर्यंत बुद्ध आणी महार ह्या दोन्हींमधला फरक जानवनार नाही. तोवर यांच्यामध्ये सुधारणा होणे शक्यच नाही.
बाबासाहेबांपुर्वीची अनेक वर्षे दलितांनी अत्याचार सहन केले. आणी त्यांच्याविरोधात उचललेल्या पावलांवर अनेक प्रश्न उभे केले. त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय काळानुरुप योग्यच होता. मात्र त्यांच्या कार्याला पुढे नेण्यात आपला समाज मागे पडला. मुळात बाबासाहेबांना समजण्यातच आपण कुठेतरी मागे पडलो असे जाणवते. त्या काळातील सामाजिक परिस्थीतीमुळे लाखो दलितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेत्रुत्वाखाली
धम्मदिक्षा घेतली. त्यावेळी खुप लोक आपल्या महार जातीसकट बुद्ध धम्मात आले. आपल्याला हे विसरता कामा नये कि महार हि एक हिंदु धर्मातील जात होती, जिला ते लोक शुद्र म्हणत होते. आणी तरी आजही आपले लो स्वताला महार म्हनवुन घेतात. बुद्ध हा तर एक धम्म आहे त्यात कुठल्याच जातीपातीसाठी जागा नाही. बुद्ध धम्माचा स्विकार करुनही लोक स्वताला अभिमानाने दलित, महार म्हनवत असतील तर मग धर्मांतराचा उपयोग काय? आजही आपल्या समाजातील सुशिक्षीत लोक सांगतात कि 
आपला धर्म बौद्ध आहे व जात महार......... तर मग तुम्हीच सांगा, आपणच या "बुद्धा"चा "महार" केलाय हे म्हणने चुकीचे तर ठरणार नाहीना 

जय शिवराय जय भीमराय 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र