आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : 5


सम्यक अजिविका : यामध्ये योग्य आणि नीतीच्या मार्गाने अर्थोपार्जन करणे अपेक्षित आहे . संसारी माणसाला उदारनिर्वाहाकरिता जो व्यापार, व्यवसाय करावा लागतो तो नितीधर्मावर आधारित असावा . तो करताना इतरांची हानी करून स्वतःचा स्वार्थ साधने बुद्धाला अमान्य आहे. बुद्धाने खालील व्यवसायांना निषिद्ध ठरवले आहे.
1} शस्त्रांचा व्यापार 2}प्राण्यांचा व्यापार 3} मदयादींचा व्यापार4} मांसविक्री5} विषाचा व्यापार याखेरीज लक्खन सुत्तात दांडी मारणे, माप कमी करणे, लाच देणे, फसवणूक करणे, कपट करणे , मानसिक त्रास देणे, वध करणे , डाका टाकणे, लूटमार करणे हे अयोग्य आहेत बुद्धाने चुकीच्या मार्गाने पैसे कमावू नये असाच संदेश दिला आहे तुमचे जीवन हे चांगले आचरण असणारे असावे
सम्यक आजीविका चा मराठी संतांवर असणारा प्रभाव पाहू या वैयक्तिक व सामाजिक जीवनाच्या शुद्धीसाठी ह्याची गरज आहे . मिथ्या आजीविकेचा त्याग करून सम्यक मार्गाने उदरनिर्वाह करणे म्हणजे सम्यक आजीविका होय. यात धर्मानुसार प्रामाणिकपणे श्रम करून धनार्जन करणे अभिप्रेत आहे. केवळ घाम गाळून द्रव्योपार्जन करताना नितीबाह्य मार्गाचा अवलंब न करणे हे कटाक्ष पूर्वक सांगितले आहे. इतरांची हानी करून स्वार्थ साधने यात निषिद्ध मानले जाते.
ह्या सम्यक आजीविका चा मराठी संतांवर प्रभाव दृग्गोचर होतो. नितीधर्म बाह्य मार्गाने धन मिळवण्यास म्हणजे इतरांची फसवणूक करून त्यांचा घात करणाऱ्या विक्रीय करण्यास मनाई केली आहे.
संत रामदास म्हणतात, अनितीने द्रव्य मिळवू नये
पापद्रव्य जोडू नये | पुण्यमार्ग सोडू नये कदा काली ||
द्रव्यदारा हरू नये | बालात्कारे ||
अनितीने द्रव्य जोडी | धर्मनीतिन्याय सोडी | तो एक मूर्ख || दासबोध 12-59
तुकोबांना, पाषान्ड करून उपजीविका करणारा लोक बुडव्या वाटतो .
पाषान्ड करोनि मांडिली जीविका |बुडवी भाविका लोकाप्रति || तू. व 263
तुकोबांच्या मते गायत्री मंत्र विकून पोट भरणारे यमलोकी जातात. कन्येचा विक्रेय करून पैसा मिळवणारे अघोर नरकात जातात आणि ईश्वर नामाचे गायनं करून पैसे मागतात त्यांची काय अवस्था होते ते काय सांगावे .
गायत्री विकोंन पोट जे जाळाती| तया होत गती यमलोकी ||
कन्येचा जे नर करिती विकरा | ते जाती अघोरा नरकपाता ||
नाम गाऊनिया द्रव्य जे मागती | तेणे तया गती कैसी होय || अ. वा. प्र. तू. 39
सम्यक आजीविका चा सार सांगताना तुकाराम म्हणतात जो उत्तम मार्गाने पैसे मिळवून अनासक्तीने खर्च करील तो सुगतीला प्राप्त होईल .
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे | उदास विचारे वेच करी |
उत्तमची गती तो एक पावेल | उत्तम भोगील जीव खाणी|| अ वा प्र तू 5
ह्या सर्व बाबतीत तुकोबांना मानसिक समाधान हेच सर्वोत्तम वाटते. ते म्हणतात. चित्ती समाधान असले तर विष सुद्धा सोने वाटते. मनात तळमळ असली तर चंदनाणे अंग पोळते.
चित्त समाधाने | तरी विष वाटे सोने || अ वा प्र तू 41
आपण एकंदरीत सर्व उदाहरणे पाहिली असता संतांच्या अभंगावर बुद्धाच्या सम्यक आजीविका चा प्रभाव दिसून येतो . बुद्धाने दिलेली शिकवण हि संपूर्ण भारताच्या संस्कृतीवर स्पष्टपणे ठळक दिसून. एकंदरीत भारताच्या मातीत असणारा हा बुद्धाचा संदेश कणाकणात आपणास पाहायला मिळतIIो शत्रूने अगदी बुद्धाला नेस्तनभूत करण्याचा प्रयत्न केला पण बुद्ध इतका प्रभावी ठरला कि शत्रूलाही त्याच्या शिकवणीचा मोह आवरला नाही . आणि त्यातच साऱ्या शिकवणीचे सार हे हिंदुत्ववादी लोकांच्या संस्कृती मध्ये जागोजागी पाहायला मिळतो. अशीच यापुढे आपण पाहत जाऊ या बुद्धाच्या शिकवणीचे पडसाद यांच्या संस्कृतीवर कसे कसे पडले आहेत ते आणि यातूनच समाज सुधारणेची चळवळ उभी राहिली आहे.
तर पुढच्या भागात पुढील मार्गाचा प्रभाव पाहू या ................

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र