आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ६

सम्यक व्यायाम : सम्यक व्यायाम म्हणजे बाह्य शरीराचा व्यायाम नाही . कसरत करून कमावलेली शरीयष्टी म्हणजे सम्यक व्यायाम नाही. सम्यक व्यायाम म्हणजे ज्ञानयुक्त प्रयत्न  अथवा अभ्यास करणे.  निर्वाण व सत्यप्राप्तीच्या कार्यात अथवा अभ्यास अत्यावधक मानून बुद्धाने उद्योग किंवा प्रयत्नपूर्वक अभ्यासाला अनन्य साधारण महत्व दिले आहे. मनात नको ते वाईट विचार येऊ न देणे आणि मनातील चांगले विचार बाहेर जाऊ न देणे ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. कारण अभ्यासाला काहीही अश्यक्य किंवा अलभ्य नाही .  ह्या गोष्टीचा संतांनी आपल्या उपदेशात व आपल्या साहित्यात उल्लेख केला पण तो मात्र भक्तीच्या मार्गासाठी वापरला पाहू या संतांचा याबाबत काय अर्थ आहे तो संत एक सारखे ईश्वराचा धावा करतात आणि आपल्या मनात ईश्वराशिवाय दुसरे विचार येऊ नयेत  ह्यासाठी करुणा भक्तात . ह्यासाठी  त्यांनी प्रयत्न किंवा अभ्यासाची महिती गायली आहे . आणि ह्याला बौद्ध धम्मात सम्यक प्रधान असे नाव आहे.
न मिळो खाया न वाढो संतान । परी हा नारायण कृपा करो ।।
विटंबो शरीर येता का विपत्ती । परी राहो चित्ती नारायण ।।
क्षणक्षणा हाचि करावा विचार । तरावया पार भवसिंधु ।।
संतसमागमी धरुनी आवडी । करावी तातडी परमार्थी ।।अ  वा प्र तू ३
ह्यात सम्यक व्यायामाची भावना संतांनी अभिव्यक्त केली आहे . क्षणोक्षणी भवसिंधु पार करण्याचा विचार सांगतात व त्यासाठी संत समागमाचे हि महत्व विशद करतात.
अभ्यासाचा महिमा गात तुकोबा म्हणतात , ; ओले मूळ खडकाला भेदते, दोऱ्यांची चिरा कांचनी पडून कापला जातो, सवय केल्यास विष हि पचते, प्रयत्नाने भुजंगही धरता  सारांश अभ्यासपूर्वक प्रयत्न केल्यास असाध्य हि  साध्य होते .
ओले मूळ भेदी खडकास अंग । अभ्यासासी सांग कार्यसिद्धी ।।
नव्हे ऐसे काही नाही अवघड । नाही कठवाड  तोंच वरि ।।
दोरे चिरा कापे पाडिला कांचनी । अभ्यासें  सेवनि विष पडे ।।
साधूंनी बचनाग खाती तोळा तोळा । अणिकांतें डोळा न पाहवे ।।
साधुनी  भुजंग धरिती हाती । आणिक कापती देखोनियां ।।
असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।।

त्याच बरोबर तुकाराम महाराज म्हणतात, आळस त्यागून अखंडप्रयत्न करावा असाही उपदेश ते करतात
तुका म्हणे आळस । तोचि कारणांचा नास ।।

संत  रामदास म्हणतात
आळस अवघाची  दवडावा । यत्न उदंडची करावा ।। दा बो  १०-१२-२१

थोडक्यात संतांचे ईश्वराशी असणारे नाते ह्यामुळे भक्ती मार्गासाठी सुद्धा त्यांना बुद्धाच्या शिकवणीचा प्रभाव जाणवतो असेच दिसते आहे  पुढे जाऊन हेच संत ईश्वराला बाजूला ठेवून सांगतात कि नशीबावर न विसंबून राहता अभ्यासाला महत्व देतात प्रयत्नांना महत्व देतात तेव्हाच  यशस्वी होऊ असे शिकवन देतात याचा अर्थ स्पष्ट आहे  कि संतांमध्ये ईश्वराची भक्ती करत असताना हा बदल काय सुचवतो, तर स्पष्ट आहे हा बदल बुद्धाच्या प्रभावाची   किती खोलवर यांच्या साहित्यावर यांच्या अभ्यासावर पडलेला आहे हे सांगतो .
बुद्ध शिकवणीचा प्रभाव  आहे हे किती हि नाकारले तरी संतांची शिकवण भक्तीकडून प्रयत्नांकडे झुकलेली  हेच सिद्ध करते  कि हा बुद्धाच्या शिकवणीचा प्रभाव आहे म्हणून .
  मातीत बुद्ध इसवी सणाच्या आधीच मुळे घट्ट रोवून बसल्याने इथल्या  कणाकणात बुद्धाची शिकवण आहे . वैदिकांनी किंवा इतर कोणी हि बुद्धाला विकृत करण्याचा प्रयत्न केले पण बुद्धाच्या मूळ शिकवणीवर त्याचा काहीच फरक पडला नाही परंतु ज्यांनी विकृत करण्याचा प्रयत्न केला त्यांचा प्रयत्न हा असा त्यांच्यावर च उलट फिरला   हिंदू संतांच्या  साहित्यावर बुद्ध मार्गाचा प्रभाव पडला आणि लोक सुधारणा चळवळ जोमाने उभी राहिली
तर   वाचकांनो आता पुढील भागात अजून एका मार्गाचे विश्लेषण करू या ....... ... . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र