आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग :३

 सम्यक वाणी : बुद्धाच्या अष्टांग मार्गातील हा तिसरा मार्ग आहे . ह्यात योग्य आणि सत्याधिष्टित धर्मानुकूल वचनांचे उच्चारण आणि असत्य व धर्मबाह्य वचनांचा त्याग अभिप्रेत आहे . यामध्ये कुणालाही विनाकारण दुखावणाऱ्या कठोर वचनांचा व चुगलखोरांचा यात निषेध केला असून उच्चारलेल्या विवेकपूर्ण सत्यवचनांचे प्रत्यक्षात आचरण अतिशय महत्वाचे मानले गेले आहे.
यामध्ये शब्दामध्ये गोडवा असावा सत्याची धार असावी असे बुद्धाचे सांगणे आहे वाणीत समोरच्या व्यक्तीचे हृदयपरिवर्तन करण्याची क्षमता निर्माण व्हायला हवी.
 अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर सम्यक वाणी म्हणजे चांगले शब्द उच्चारावे सत्य बोलावे विनाकारण कुणास हि वाईट बोलू नये.
 तर अश्या प्रकारे सम्यक वाणी बाबत आपण पाहिले  पण आता याचा संतांवर प्रभाव कसा पडलाय ते हि पाहू या .
तुकाराम महाराज म्हणतात , राग लोभाची पर्वा न करता सत्य सांगावे
तुका म्हणे सत्य सांगे । येवोत रागे येतील ते ।।
एवढेच काय परोपकार प्रसंगी हि असत्य बोलू नये  असा त्यांचा कटाक्ष आहे
असत्य वाचन होता सर्व मोडी । जरी लग्नघडी परउपकार ।।
जाईल पतना यासि संदेह नाही । साक्ष आहे काही सांगती ते ।।  १०२१
परनिंदा ऐकणे व करणे वा चुगलखोरीला संतांनी विरोधच केला आहे

निंदेचे श्रवन नको कानी ।बधिर करोनि ठेवी देवा ।।
न करीत परनिंदा परद्रव्य  अभिलाष । काय आमचे यास वेचे सांगा ।। १२६
 संत तुकाराम महाराज दुसऱ्याला  कमी पणाने बोलणे देखील रजोगुण मानतात
परन्यून  बोलावे वाटे । तो रजोगुण ।।
चहाडी मनास आणू नये । बाष्कळपण बोलो नये ।।
 कठोर शब्दात न बोलणे हे सत्व गुणांचे लक्षण मानतात
शब्द कठीण  न बोले । तो सत्वगुण
तोंडी सिवी  असो नये ।।
विचारपूर्वक बोलण्यावर कटाक्ष आहे आणि बोलल्याप्रमाणे वागण्याबद्दल हि त्यांचा आग्रह आहे.
खोटे सांडोन खरे घ्यावे तरी परीक्षावंत म्हणावे । असार सांडून सार घ्यावे ।।
विचारेवीण काहीच नव्हे । समाधान ।। तस्मात विचार करावा ।।
क्रियेवीण शब्दज्ञान । तेचि श्वानाचे वमन  ।।
लटिका पुरुषार्थ बोलो नये विवंचनेविन चालो नये ।।
निंदा द्वेष करो नये ।।
असे संत रामदास त्यांच्या अभंगात म्हणतात  याही पुढे जाऊन  वाणीच्या दोषाने भरलेल्या दुरात्म्यांचा ते धिक्कार करतात
कठीण वचन कर्कश वचनी । कापट्य वचनी संदेह वचनी
दुःख वचनी तीव्र वचनी क्रूर निष्ठुर दुरात्मा
न्यूनवचनी पैशून्यवचनी  अशुभवचनी अनित्यवचनी
देश अनृत्यवचनी बाष्कळवाचनी धिक्कारू


पुढे संत तुकाराम महाराज  म्हणतात कोणतीही कृती करण्यापूर्वी विचार करण्यावर भर द्यावा
 तुका म्हणे आधी करावा विचार । शूरपणे तिर मोकळावा
तव्दतच बोलण्याप्रमाणे कृती करणारी पावले वंदनीय असतात
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
बोलविसी तैसे आणि अनुभवा

कठोर भाषणाने दुसऱ्यास  वाईट वाटते हा साक्षात अनुभव असल्याने वाईट बोलू नये , दुसऱ्यास  दुःख देणारी वाणी अपवित्र  होय असे संत रामदास याना वाटते
कठीण शब्दे वाईट वाटते । हेतो प्रत्ययास येते
तरी मग वाईट बोलावे  ते । काय निमित्त ।।
आपणास चिमोटा घेतला । तेणे कासावीस जाला ।।
अपानावरून दुसऱ्याला । राखत जावे ।।
जे दुसर्यास दुःख करी ते अपवित्र वैखरी ।। तरी मग कर्कश बोलावे ते । काय निमित्त
।।
आपण संत तुकाराम महाराज व संत रामदास यांनी कश्या पद्धतीने सम्यक वाणी असावी  ह्याबाबत आपल्या साहित्यात त्यांनी  लिहले आहे  कारण हेच आहे बुद्धाच्या सम्यक वाणी चा यांच्यावर असणारा प्रभाव पावलोपावलांवर  जाणवतो इथे   हिंदू नि बुद्धाला विष्णूच्या अवतारात स्वीकारल्याने  संत संप्रदायाने हि  बुद्धाला स्वीकारले यात वैष्णवांनी जास्त बुद्धाला जवळ  केलेले आपणास पाहायला मिळते . बुद्धाची शिकवण   यांनी आपल्या   माध्यमातून सांगितली आहे . बुद्ध तत्वज्ञान हे सर्वच संप्रदायात पाहायला मिळते .
यावर लिहायला गेल्यास वेगळा नवा ग्रंथ निर्माण होईल . बुद्ध शिकवणीला जवळ  करून मराठी संतांनी  हा महाराष्ट्र  बौद्ध कालीन होता याची स्पष्टता केलेली दिसते  कारण एखाद्याचा शिकवणीचा प्रभाव तेव्हाच पडतो जेव्हा त्यांचे अस्तित्व   त्या भागात असते . आणि महाराष्ट्रात जवळपास १५०० लेण्या आहेत त्या अनेक  कड्यामध्ये आपणास पाहायला मिळतात. तुकाराम यांच्या ध्यानाच्या जागेत सुद्धा बुद्ध लेणींचे अस्तित्व होते तेव्हा त्यांचा  प्रभाव  तुकाराम महाराज यांच्या शिकवणीवर पडलेला आपणास पाहायला मिळतो .
हे संत साहित्य च मुळात बुद्धाच्या  शिकवणीच्या प्रभावाखाली असल्याचे दिसते .
इतकेच काय  तर विठ्ठल भक्तांनी  पंढरीत विठ्ठल रुपी बुद्धच असल्याची अनेक ठिकाणी  ऊल्लेख केला आहे .
संतांचे समाज सुधारणा  चळवळ हि  बुद्धाच्या शिकवणीचे एक  भाग आहे अन्यथा हिंदू धर्माच्या  शिकवणीचे सार वर्णव्यवस्था विषमता आहे त्यात समतेची कास धरणारे संत हे  बुद्धाच्याच शिकवणीच्या प्रभावाखाली आलेले आहेत हे सत्य नाकारता येत नाही .
चला पुढच्या भागात चौथा मार्ग पाहू या ..... 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र