आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४
सम्यक कर्म : सम्यक कर्म बुद्धाचा कर्म सिद्धांत आणि हिंदू वा अन्य धर्माचा कर्म सिद्धांत हे वेगळे वेगळे आहेत तरी हि बुद्धाने सम्यक कर्म सांगताना माणसाच्या आचरणात सदाचार आणि पावित्र्य असावे असा अभिप्राय आहे . हिंसा त्याग , दंड व शस्त्रप्रयोग त्याग , प्राण्यांवरील दया , हेच सम्यक कर्म आहे . मनुष्य जीवनाच्या पावित्र्यासाठी आवश्यक असलेल्या पंचशीलाचाही यात समावेश होतो. कुशल अकुशल कर्माचे फळ भोगावे लागते म्हणून अशुभ त्यागून शुभ कर्मे केली पाहिजेत . त्यासाठी अहिंसा,अचौर्य,सत्य मद्यत्याग करावे . हि अपेक्षा असते . भिक्षु ना अकाल भोजन,सुवर्णधन ग्रहण निषिद्ध आहे . त्यांना दहा शिलांचे पालन करावे लागते . या अष्टांग मार्गाचा अनुभव घेणारा साधक सर्वज्ञ आनंद अनुभवत असतो . सर्व जगच त्याला निवास्थान वाटू लागते .
बुद्धाच्या सम्यक कर्माचा प्रभाव मराठी संतांवर पडलेला प्रभाव पाहताना आपण ज्ञानदेव म्हणतात .
हे विश्वाची माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपण जाला ।। १२-२११
पुढे जाऊन संत तुकाराम म्हणतात ' पाप पुण्य ,सुख दुःख , हानीलाभ आणि शंकाचा नाश झाला असून आप परभाव नष्ट झाल्यामुळे जिवंतपणीच मरण आले व संसाराची मुळाशी नायनाट झाला . आता अहंकार उरला नाही .
पुण्यापापा ठाव नाही सुखदुःख । हानीलाभ शंका नासलिया ।।
जिता मरण आले आपपर गेले । मूळ छेदियेलें संसाराचे ।।
तुका म्हणे आता नाही अहंकार । जालोतदाकार नित्यशुद्ध ।। ३०-३१
आमुचा स्वदेश । भुवत्रयामध्ये वास ।।
तुका म्हणे नाम । अवघे आमुचे हे धाम ।।
अश्या पद्धतीने तुकाराम महाराज स्वतःचे हित जाणून समाधानी वृत्तीने राहतात
आपले आपण जाणावे स्वहित । देणे राहे चित्ती समाधान ।।
प्राण्यावरील ड्यभवातून संतांची अहिंसा उदय पावते . तुकोबा म्हणतात मास्यांनी व श्वापदांची काय अपराध केला कि कोळी व पारधी त्यांचा वध करतात.
काय केले जलचरी । ढिवर त्यांचा घातावरी ।।
श्वापदातें वधी निरापराधे पारधी ।।
मनात भूतदया असली म्हणजे सर्वत्र हृषीकेशी दिसतो
भूतदया मानसी । अवघा देखे हृषीकेशी ।।
सम्यक कर्मात अंतर्भूत होणाऱ्या पंचशीलात अहिंसा ब्रह्यचर्य , सत्य,अचौर्य,आणि मद्यपान त्याग यांचा समावेश होतो.
पंचशीलाचा संतांनी अनेक ठिकाणी उपदेश केला आहे . त्यांनी पंचशील सलग उपदेशिले नसली तरी त्यांच्या उपदेशात पंचशील ठायी ठायी दिसते
संतांच्या उपदेशात आलेली मानवता हि बुद्धाच्या करुणामय मार्गामुळेच आलेली दिसते .
अहिंसा : प्राणिवधाचा संतांनी विरोध केला आहे . त्यांना प्राणीहिंसा मान्य नाही . संत रामदास म्हणतात
निष्टुरपणे धरू नये । जीव हत्या करू नये ।।
तुकाराम म्हणज म्हणतात
धिक तो दुर्जन नाही भूतदया । व्यर्थ तया माय प्रसवली ।।
कठीण हृदय तया चांडाळाचे ।जो नेने पराचे दुःख काही ।।
आपुला हा प्राण तैसे सकळ लोक । न करी विवेक पशु जैसा ।।
तुका म्हणे सुखे कापितासे गळे । आपुल्या वेळे रडतसे ।।
मास खाता हाऊस करी । जोडुनी वैरी ठेवियेला ।।
ज्ञानदेव याना हि हिंसा मान्य नाही ते सर्वाभूती हरी आहे असे त्यांना वाटते
न करी भूतमात्री हिंसा । सर्वाभूती हरी सरसा ।।
भावपूर्वक नमस्कारा ।।
अचौर्य : संतांनी चोरीचा हि निषेध केला आहे .
रामदास म्हणतात
देखिली वस्तू चोरू नये ।।
बहुत कृपण होऊ नये । पडली वस्तू घेऊ नये ।।
संत एकनाथ म्हणतात
लाच खाऊ नये । करीत घेऊ नये
तस्कराशी पुसू नये । पापद्रव्य जोडू नये ।।
असत्य : सत्य वचनाचा पुरस्कार सर्वच संतांनी केला आहे .
रामदास म्हणतात
सत्यमार्ग सांडू नये । असत्य पंथे जाऊ नये । वृथा अभिमान धरू नये असत्याचा ।।
विवेक दृढ धरावी वाट सत्याची ।।
तुकाराम महाराज म्हणतात
खरे बोले तरी । फुकासाठी जोडे हरी ।।
तुका म्हणे सत्या नाही पाठी पोट ।।
असत्याचा शब्द नको वाचे माझे । असत्य सर्वथा नोहे वाणी
एका जनार्दनीं असत्याची वाणी । तोचि पाप वाणी दृष्ट बुद्धी ।।
ब्रह्मचर्य : संतांनी परस्त्रीगमन हे भयंकर पाप आहे असे उपदेशिले आहे.
रामदास म्हणतात
परस्त्रीते पाहो नये । पापबुद्धी अनाचार मांडू नये ।
मन भलतीकडे धावे । तो तमोगुणा ।।
तुकाराम महाराज म्हणतात
पापाची वासना नको दावू डोळा त्याहूनि आंधळा बराच मी ।।
नको मज कधी परस्त्रीसंगती जनातून माती उठता भली ।।
परविया नारी माऊलीसमान मानलीया धन काय वेचे ।।।
अनाचार करू नये असे सर्वच संत सांगताना दिसतात .
मद्यपान निषेध :मराठी संतांनी मद्यपानाचा निषेध च केला आहे .
धूम्रपान घेऊ नये । उन्मत्त द्रव्य सेवू नये ।।
तुका म्हणे मद्य सांडावी लंगोटी ।
न करा सुरापान कन्यागोविक्रय जाण ।
मद्य आणि मध एकरासी नावे ।
तरिका ते खावे आधारे त्या ।। सेविता वारुणी देहभान हरपते ।।
आता थोडक्यात बुद्धाचा कर्म सिद्धांत पाहू या
संतांच्या उपदेशावर बुद्धाचा हाच कर्मसिद्धांताचा प्रभाव पडला आहे.
एकंदरीत बुद्धाच्या मार्गाचा यांच्या उपदेशावर पडलेला प्रभाव आहे कारण संतांचे दोन प्रकारचे उपदेश आपणास पाहायला मिळतात एक दैववादी तर एक मानवतावादी असे आहेत आणि हा फरक हेच सिद्ध करतो कि यांच्यावर बुद्धाच्या शिकवनीचा प्रभाव आहे म्हणून .
थोडक्यात सम्यक कर्म आणि बुद्धाचा कर्म सिद्धांत आपण पाहिला त्याचा प्रभाव संतांच्या उपदेशावर आहे हा हि पाहिला तेव्हा संतांचा खरा मार्गदाता देखील बुद्धच आहे हे नाकारता येत नाही
चला तर पुढच्या भागात अजून एका मार्गाच्या बाबतीत पाहू या .......

भगवान बुद्धाचा कर्म{कम्म } सिद्धांत
१}चांगल्या कर्मासाठी नैतिकतेची आवश्यकता१ वैदिक धर्मातील सर्वश्रेष्ठ आणि सर्वात जुना ग्रंथ ऋग्वेद नैतिकतेबद्दल काहीच सांगण्यात आलेले नाही पण अनैतिकता मात्र ओसंडून वाहत आहे ज्या धर्मग्रंथात नैतिक आचरणाच्या कथा किंवा उदाहरणे नसतील नैतिकते विषयी मार्गदर्शन नसेल तर धर्मातील जनतेने कोणाकडे पाहायचे / ऋग्वेदात नैतिकतेचा अभाव असला तरी दारू पिणे गुरढोरा चे येथेच्छ मांस खाणे कोणत्याही स्त्रीशी संभोग करणे याबाबतीत मात्र ऋग्वेदरुपी महासागर तुडुंब भरला आहे२ म्हणूनच वेदविशयि आपले मत व्यक्त करताना भगवान बुद्धाने म्हटले आहे मानवाच्या नैतिक उत्थानाकरिता वेद कुचकामी आहेत वेद हे ओसाड वाळवंट आणि पथहिन जंगल आहे३ अनैतिकतेच्या संबंधाने विष्णू देवतेचे नाव सर्वात वर आहे विष्णूने बहुजन राजा बळी चे राज्य कपटाने बळकावून त्याचा वध केला मुलनिवाशी राजा जालंधर रूप घेवून जालंधर पत्नी तारा चे सतीत्व नष्ट केले शिवाने मोहिनीच्या मागे लागून वीर्य स्खलन केले ब्रह्माने मुलीशी अनैतिक कर्म केल्यामुळे महात्मा ज्योतीबांच्या नजरेत तो बेटीचोद ठरला गौतम ऋषीचे रूप घेवून इंद्राने ऋषीपत्नी अहिल्येशि व्यभिचार केला गुरु बृहस्पतीचा शिष्य चंद्राने गुरुपत्नी तारा चे अपहरण करून तिला बुध नावाचा पुत्र करून दिला सूर्य राजाने कुंतीला कुमारी माता बनवून कर्णास जन्माला घातले४ वादिक धर्माचा महापुरुष कृष्णाने नग्न पने अंघोळी करीत असलेल्या गोपींची वस्त्रे चोरली त्यांना कपाळावर ओंजळ बांधून व वाकून स्वतःला नमस्कार करण्यास भाग पाडले आणि नंतरच त्यांची वस्त्रे दिली {भागवत १०-२२-१९} आजच्या सिनेमातील नंगानाचाला लाजवणारी कृष्णाची गोपिसोबत यमुना नदीत रासलीला आहेअसे अनेक प्रकारचे सबंध आणि कर्म वैदिक धर्म ग्रंथात आहेत२ हिंदू आणि बौद्ध कर्म सिद्धांत एक नाहीत१ वैदिक ब्राह्मणी धर्माचा कर्म सिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे उलटपक्षी बौद्ध धम्म आत्म्याचे अस्तित्वच मानत नाही त्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नः वैदिक कर्म सिद्धांत हा आत्म्याच्या जन्मजन्मावर आधारलेला आहे२आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे वैदिक धर्म मानीत असल्यामुळे कर्म हे जन्माजन्मांतरी चालूच असते३ बौद्ध धम्मात आत्माच मनात नसल्यामुळे जन्माजन्मांतरीचा नियम बौद्ध कर्म सिद्धांतास लागू होत नाही४ देहाव्यतिरिक्त आत्म्याला अस्तित्व आहे यावर वैदिक धर्म आधारलेला आहे देह मृत झाला तरी आत्मा मरत नाही आत्मा देहातून निघून जातो हि वैदिक धर्माची विधाने बौद्ध सिद्धांताला लागू नाहीत ५ कर्त्याच्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो असे वैदिक धर्म मानतो जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याला सोडून जातो त्यावेळी त्याच्या आत्म्यावर अनेक संस्कार झालेले असतात६ या संस्कारामुळे पुढील जन्मी त्याला कोणते अधिकार मिळणार हे ठरत असते हिंदूंचा हा सिद्धांत आत्मा न मानणाऱ्या बौद्ध कर्म सिद्धांताशी विसंगत आहे म्हणून दोन्ही धर्माचे कर्म सिद्धांत हे एकाच आहेत असे मानणे चूक आहे यापासून आत्मा न मानणार्यांनी सावध असावे३}बुद्धाचा कर्मसिद्धांत गत जन्माशी सबंधित नाही१ आत्मा आणि ईश्वर कोणीही कधीही पाहिलेले नाही त्यांचे अस्तित्व कोणीही छातीठोकपणे सिद्ध करू शकत नाही गतजन्मी कोणी चांगली कर्मे केलीत आणि कोणी वाईट कर्मे केलीत हे कोणीही सांगू शकत नाही मह गतजन्मी च्या कृत्यावरून चांगला वाईट जन्म मिळतो यावर विश्वास कसा ठेवायचा कुणला स्वर्ग मिळाला आणि कोणाला नरक मिळाला हा सर्व काल्पनिक प्रकार आहे कारण वर आकाशात पृथ्विलोकांशी सबंध येणारा कोणताच लोक नाही स्वर्ग नरक या पर्शिया देशाच्या इंद्र आणि यम राजांच्या राज्ये आहेत आणि ती जमिनीवरील राज्ये आहेत याला श्रीमदभागवत देखील साक्षी आहे मुल निवाशि भारतीयांना मूर्ख बनवण्यासाठी विदेशी आर्य ब्राह्मण लोकांनी तसे खोटे खोटेच ग्रंथात लिहून ठेवलाय२ भगवान बुद्धाने जो कर्म सिद्धांत सांगितला आहे त्यात कराल तसेभराल असे म्हटले आहे असे सांगणारा महामानव बुद्ध पहिला महापुरुष आहे३ भगवन बुद्धाचा कर्म सिद्धांत हा कर्म आणि त्याचा वर्तमान जीवनावर होणारा परिणाम या पुरताच मर्यादित आहे पूर्व जन्माचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर बुद्धाचा विश्वास नव्हता४ जन्म हा मत्यपित्या मुळे होतो म्हणूनच बालकाच्या जन्माला जो वारसा लाभतो तो त्याच्या आईवडिलांकडून च मिळतो असे तथागत मानतात५ माणसाची स्थिती अनुवांशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालीच्या परस्थितीवर अधिक अवलंबून असते बुद्धाला चांगल्या आणि वाईट कर्माचा सबंध फक्त वर्तमान काळाच्या कर्माशी सांगायचा आहे४} कर्म म्हणजे काय१ कर्म म्हणजे सामान्य अर्थाने कार्य क्रिया किंवा आचरण होय शरीराने वचनाने आणि मनाने हेतुपूर्वक केलेले कोणतेही कार्य म्हणजे कर्म होय सर्व प्रकारचे कर्म चांगले किंवा वाईट कर्माच्या अंतर्गत येतात कर्म आणि पुनर्जन्म एकमेकांशी सबंधित आहेत कर्म आणि पुनर्जन्म बौद्ध धम्माचे मौलिक सिद्धांत आहेत२ बौद्ध धम्मात कर्म एका अशा मानशिक प्रवृत्तीला म्हणतात जी कार्य उत्पन्न करते भगवान बुद्धांच्या शब्दात सांगयचे म्हणजे चेतना किंवा चैतसिक कार्य हेच कर्म आहे अन्य कर्मे हि क्रिया समजल्या जातात३ बौद्ध धम्मात प्रत्येक कार्य आणि क्रियेला कर्म म्हटले जात नाही परंतु चेतन आणि चेतनाकृतलाच कर्म म्हटले जाते त्याचेच कर्मपथ असते त्याच फळ कर्मफळ असते आणि भाव असते चेतना मानस कर्म आहे आणि चेतनेद्वरे जे उत्पन्न होते ते चैतसिक कर्म होय याच कर्मामुळे जगात विविधता निर्माण होतात४ विश्वातील सर्व घटना कारण शिवाय घडत नाही वैदिक धर्मात याला भाग्य किंवा भाग्यवाद म्हणतात बौद्ध धम्मात याला भावाची शृंखला किंवा कार्यकारण भाव म्हणतात यात केवळ कर्माबद्दल च स्पष्टीकरण करण्यात आले नसून एकीकडे आनंदमय आणि दुसरीकडे दुःखमय फळ का देतो हेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे याच कार्यकारण सिद्धांताची माहिती भिख्खू अश्वजीत कडून ऐकून सारीपुत्त आणि मोदगल्यायन अतिशय प्रफुल्लीत आणि रोमांचित झाले५ समस्त कर्माचा हेतू किंवा कारण असते सदाचरण शीलाचे पालन करून उत्पन्न झालेल्या कार्याला कुशल कर्म म्हटले जाते दुराचरण आणि शीलाच्या उल्लंघनाचे उत्पन्न होणार्या कार्याला अकुशल कर्म म्हटले जाते जगातील कुणालाही कारणाशिवाय काहीच होत नाही ते तसेच होते जसे कि कारण त्यांना बनविते जगात आढळून येणारी असमानता विचित्रता वैगरे लोक वैचीत्रताचे सर्व कर्मामुळे असते६ बौद्ध धाम्मानुसार असमानतेचे कारण कर्म आहे दुसर्याशब्दात आम्ही म्हणू शकतो कि भूतकाळात आपल्याकडून केल्या गेलेल्या कर्माचे फळ वर्तमान काळात प्राप्त करतो आपण आपल्या सुख किंवा दुःखासाठी स्वतःच उत्तरदायी आहोत आपण आपला नरक स्वतःच बनवतो आपण चांगल्या किंवा वाईट कर्माचे स्वतः निर्माते आहोतसंतांच्या उपदेशावर बुद्धाचा हाच कर्मसिद्धांताचा प्रभाव पडला आहे.

टिप्पण्या