विश्वाची निर्मिती
१] विश्वाच्या उत्पत्तीचे आणि ईश्वराचे रहस्य जाणून घेण्याच्या प्रयत्नात धार्मिक दृष्टीने विश्वाची निर्मिती कशी झाले हे कोणाला सांगायची गरज नाही कारण आज सर्वाना ती माहित आहे कारण प्रत्येक धर्माची धर्मग्रंथ हे त्याची साक्ष देतात पण काय हे खरे आहे का असा कधी विचार केला आहे का मी जेव्हा असा विचार करतो तेव्हा मात्र मन अगदी गोंधळून जाते मग काय करायचे कस शोधायची करणे हा प्रश्न पडतो मग एकच पर्याय विज्ञान ज्याच्याकडून विश्वाच्या निर्मितीची करणे सापडतात २} उत्सुकता हा मानवाचा स्वभाव धर्म आहे लहान मुल बोलायला लागल्यावर त्याला दिसणाऱ्या नवीन गोष्टीबद्दल अनेक प्रश्न विचारीत असते त्याबाबत जाणून घेण्यासाठी ते मुल आपल्या आई बाबाना आप्तेष्टांना आणि परिचितांना अनेक प्रश्न विचारून गोंधळवून टाकीत असते उत्तरे देणारे कंटाळून जातात पण ते मुल कधी कंटाळत नाही का? कसे ? कोठून ? कोठे ? कुणी ? यावर ? कितीतरी प्रश्न ते मुल विचारीत असते मोठ्या व्यक्तीचेही असेच असते जगात जे नवीन नवीन शोध लागतात त्याच्या मुलाशी देखील वरील प्रश्न असतात असे प्रश्न विचारले गेले नसते तर कुठलाच शोध लागला नसता असे प्रश्न बुद्धिवादी विचार...