२६ नोव्हेंबर बहुजन स्त्रियांच्या जीवनातील एक नवीन पहाट
२६ नोव्हेंबर भारतीय स्त्रियांच्या जीवनातील एक नवीन पहाट या देशाच्या बहुसंख्य लोकसंख्ये पैकी ९५ टक्के लोकांची संख्या म्हणजे बहुजन समाज आता हा बहुजन समाज त्यावेळी प्रजासत्ताक जीवन जगत होता आणि काही कालांतराने त्यांच्यावर आक्रमणे झाली त्यात हा बहुजन समाज गुलाम बनला तो असा गुलाम नाही तर सामाजिक धार्मिक आर्थिक बाबीत गुलाम झाला ज्याला कोणतेच स्वतंत्र नव्हते त्याने काय खायचे त्याने काय कपडे घालायचे त्याने कोणत्या वेळी कोणती क्रिया करायची म्हणजे मुलभूत अधिकार तर नव्हतेच पण स्वतःच्या पत्नीचे रक्षण करणे सुद्धा त्यांच्या हातात नव्हते विशिष्ट समाजाच्या हाती ते सर्व अधिकार गेले मुळात हा समाज का गुलाम झाला याच्यावर जर विचार केला तर पाहिलं कारण असे त्याच्यात असणारा अज्ञानी पणा हा त्याच्या गुलामीला सर्वात, घटक बनला शूरतेची कमी नव्हती पण मानसिक बुद्धिमत्ता कमी असल्याने त्याला या परिस्थितीला सामोरे जावे लागले मग त्याच्यावर लादलेली बंधने पाहतांना खूप भयानक आहेत बाहेरून आलेल्या आर्यांनी त्यांच्यावर अनेक बंधने लादली पाहिलं बंधन लादल त...