२६ नोव्हेंबर बहुजन स्त्रियांच्या जीवनातील एक नवीन पहाट

२६ नोव्हेंबर  भारतीय  स्त्रियांच्या  जीवनातील  एक नवीन पहाट
या देशाच्या  बहुसंख्य लोकसंख्ये पैकी ९५ टक्के लोकांची  संख्या म्हणजे बहुजन समाज आता हा  बहुजन समाज त्यावेळी प्रजासत्ताक जीवन जगत होता आणि काही कालांतराने त्यांच्यावर आक्रमणे झाली त्यात हा बहुजन समाज गुलाम बनला तो असा गुलाम नाही तर सामाजिक धार्मिक आर्थिक बाबीत गुलाम झाला  ज्याला कोणतेच स्वतंत्र नव्हते त्याने काय खायचे त्याने काय कपडे घालायचे त्याने कोणत्या वेळी कोणती क्रिया करायची म्हणजे मुलभूत अधिकार तर नव्हतेच पण स्वतःच्या पत्नीचे रक्षण करणे सुद्धा त्यांच्या हातात नव्हते विशिष्ट समाजाच्या हाती ते सर्व अधिकार गेले मुळात हा समाज का गुलाम झाला  याच्यावर जर विचार केला तर पाहिलं कारण असे त्याच्यात असणारा अज्ञानी पणा हा त्याच्या गुलामीला सर्वात, घटक बनला शूरतेची कमी नव्हती पण  मानसिक बुद्धिमत्ता कमी असल्याने त्याला या परिस्थितीला सामोरे  जावे लागले  मग त्याच्यावर लादलेली बंधने पाहतांना खूप भयानक आहेत बाहेरून आलेल्या आर्यांनी त्यांच्यावर अनेक बंधने लादली पाहिलं बंधन लादल ते शिक्षण बंदी म्हणजे या लोकांनी शिक्षण घेवू नये म्हणजे त्यांच्यावर सहज राज्य करता येईल या समाजातील लोक शिकली नाहीत तर यांना जगात  काय घडत याच ज्ञान भेटणार नाही हि अशिक्षित राहिली तर त्याच्या अशिक्षितपणाचा फायदा हा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात  होईल म्हणून त्यांच्यावर हे बंधन  अश्याप्रकारे सप्तबंदी घालण्यात आल्या शूद्रांना धनसंपत्ती जमा  करण्याचे अधिकार नव्हते ब्राह्मण वर्ग जे सांगेल ते या  बहुजन समाजाने करायचे असा हा बहुजनावर अत्याचार रोजच व्हायचे ब्राह्मणाला जी स्त्री आवडायची ज्या स्त्रीवर ब्राह्मण मोहित व्हायचा त्या स्त्रीला त्याच्यासोबत   त्याचे अत्याचार सहन करावे लागायचे बहुजन स्त्री आला आपले चरित्र जपण्याची मुभा नव्हती ज्या ज्या बेली ब्राह्मण आसक्त व्हायायचे त्या त्या वेळी बहुजन स्त्री ला त्याच्याशी नाईलाजास्तव आपले शरीर त्याच्यापुढे टाकावे लागायचे या असह्य  यातनांचा भोग बहुजन समाजाच्या वाट्याला आला न वाली ना दाता जो तो येई तो त्यांच्या शरीराचे लचकेच तोडायचा अगदी   बेजार करून टाकल व्यवस्थेन एकवेळची हातात तलवार घेवून घोड्याच्या पाठीवर  बसून मैदान   गाजवणारी रणरागिणी आज त्यांच्यापुढे गुलामाच जीवन जगू लागली आमच्या या स्त्रियांची केली जाणारी विटंबना हि इतकी क्रूर आणि  भयानक आहे कि आज हि त्याच्यावर वाचन करताना अंगावर काटा उभा राहतो कसे सहन केल या स्त्रियांनि आज हि स्त्रीला पायातली चप्पल समजली जाते कोकणात एक म्हण आहे पायातली चप्पल पायातच ठेवायची असते तिला डोक्यावर घेवून चालत नाही म्हणजे स्त्रीला डोक्यावर घेतलं तिला अधिकार दिले  तर ती  पुरुषाला नक्कीच भारी पडते यासाबंधात जास्त सांगायची गरज नाही
वास्तव आज हि भयानक आहे स्त्री जन्मा तुझी कहाणी खूप भयानक होती बहुजन स्त्री जी  तेव्हा गुलाम झाली  आहे ती आजपर्यंत गुलामीच जीन जगत आहे  या स्त्रियांची असणारी बंधने एका शास्त्रात नाहीत सबंध हिंदू धर्मात आहेत मनुस्मृती ने तर कहर केला आहे स्त्रीला फक्त ब्राह्मण उपभोगू शकतो  का तर तो श्रेष्ठ वर्णातील आहे म्हणून आम्ही कधी समजून गेलो नाही आज  हि हिंदू धर्मात लग्न लावताना भटजी म्हणतो मम भार्या म्हणा मग आमचा नवरा मुलगा  म्हणतो मम भार्या आणि मग आदेश असतो जोपर्यंत पूजा करत नाही तो पर्यंत त्या नवरीला हात लावण्याची परवानगी नवऱ्याला नसते कारण  ती पूजा होईपर्यंत ब्राह्मणाला दान दिलेली असते इतकी भयाण परिस्थिती आहे अशाच या स्त्रियांची व्यथा मांडणारा एक महामानव  महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला त्या दिवशी सह्याद्रीला इतका आनंद झाला कि जणू या भारताच्या भूमीत नररत्न जन्माला आल्याचा भास झाला आणि शिवनेरीला स्त्रीमुक्तीचा दाता जन्माला आला छत्रपती शिवरायांचा जन्म जणू संदेश देत होता कि हो इथूनच स्त्रियांच्या या जाचक बंधनातून सुटका होणार आहे इथूनच सुरुवात आहे आणि  तो दिवस १९ फेब्रुवारी चा आहे ज्या दिवशी शिवराय जन्माला आले आणि इथेच स्त्रियांच्या बंधन मुक्तीची सुरुवात झाली शिवरायांनी स्त्रीला मानाचे स्थान दिले मासाहेब यांच्या आशीर्वादाने राज्यकारभार केला पुढे स्त्रीमुक्तीच्या अजून एका   वीराच्या आगमनाची चाहूल लागली तो पुरंदर आनंदाने नाचू लागला कि  अरे आता इथे स्त्रीला परत तिचे अधिकार देण्यासाठी नरवीर जन्माला   येत आहे हा दिवस आहे १४  मी चा ज्या दिवशी छत्रपती संभाजी राजे यांचा जन्म झाला अहि संभाजी राजे जन्माला आले  राज्यात आनंद उत्सव पण एका समाजाला खूप दुःख झाले सारे बहुजन आनंदात असताना ब्राह्मण मात्र दुःखी होता जणू  काही त्याला माहित होते  कि हा जन्माला आलेला वीर हा राजा आपले अस्तित्वच नष्ट करेल कि काय आणि बघता   बघता संभाजी राजे यांनी स्त्रियांना मनाचे स्थान दिले आपला  राज्यकारभार एका स्त्रीच्या  हाती तिला आपली पत्नी येशुबाई यांच्या हाती राज्याचा  कारभार दिला राजमुद्रा देवून त्यांना राजगादीवर बसवले आणि पहिली लाथ त्यांनी मनुवादी भटशाहीला घातली स्त्रीला राज्यपदावर बसवले असे संभाजी राजे इतिहासात आज अजरामर झाले पुढे दिवस जावू लागले संभाजी राजांच्या खुनानंतर शिवशाही गेली आणि पेशवाई चालू झाली इतके अत्याचार परत तोच काळ कालपर्यंत जिच्या हाती राजदंड होता आज परत तिचे हात बंधनात अडकले पेशवाई ने हि तेच केल जे हजारो वर्षे चालू होते  पुण्याची शनिवार पेठ यासाठी प्रसिद्ध आहे शिवरायांचा लाल महाल  पाडला आणि तिथे जगातला पहिला रंडीखाना बांधला गेला  त्याचे नाव  शनिवारवाडा आम्ही आम्ही किती आवर्जून सांगतो पुण्याची शान शनिवारवाडा  म्हणून असेच स्त्रियांचे हाल होत होते स्त्री म्हणजे केवळ मुल पैदा करणारी मशीन म्हणून या लोकांच्या उपयोगी पडत होतो बाकी तिला कसलाच अधिकार नाही संपत्तीचा ना स्वताच्या जीवन जगण्याचा पण आशेचा किरण दिसतात तसे एक आशेचा किरण दिसू लागला त्याच पुण्यात एका क्रांतीचा उगम झाला तो  सातारा इथे कटगुण या ठिकाणी महात्म्याचा जन्म  झाला आणि स्त्रियांच्या उद्धार्कार्त्याचा उदय झाला याच महात्मा फुले यांनी भटशाही मातीत गाडली आणि स्त्रियांना शिक्षणासाठी स्त्रियांची पहिली शाळा काढली स्वतः आपल्या पत्नीला शिकवून त्या स्त्रीशिक्षणाच्या प्रथम शिक्षिका केल्या   भारतात आजपर्यंत कधी असे झाले नव्हते स्त्रीला हातात कधी पुस्तक आणि लेखणी या पेशवाई ने घेवू दिली नाही त्या पुण्यात स्त्रियांची शाळा काढणे केवढे ध्येय केवढी जिद्द म्हणायची सावित्रीमाई यांनी  खूप यातना सहन केल्या लोकांचा नेहमीचा त्रास आता तर लोक अंगावर थुंकायचे शेन देकून मारायचे यातना असह्य झाल्या माई फुल्यांकडे आल्या आणि म्हणाल्या बस झाल आता नाही सहन होत लोक अंगावर शेन टाकतात थुंकतात आणि त्याच कपड्यांनी मुलीना शिकावयाचे नाही सहन होत पण महात्मा फुलेंनी सावित्री माई ना असे नाही सांगितले कि बस झाल तू नको शिकवू म्हणून काय  गरज होती त्यांना राजाराणीचा संसार होता का त्रास यातना सोसल्या असतील याची कल्पना करा फुले म्हणतात सावित्री अग आपला जन्मच या अडाणी आणि शोषित लोकांना मार्ग दाखवण्याचा आहे त्यांना आम्हाला या दलदलीतून बाहेर काढायचे आहे म्हणून सावित्री तू शिकव  लोक त्रास देतात ना मग अस कर दोन लुगडी घे एक जाताना घाल आणि दुसरे शाळेत गेल्यावर घाल म्हणजे एक खराब झाले कि दुसरे शाळेत घाल म्हणजे तुझे कपडे खराब राहणार नाही केवढी आत्मइच्छा होती केल असत का आम्ही तेवढ सहन केवळ स्त्री शिक्षित व्हावी तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी म्हणून हा सारा त्रास भोगला पुढे स्त्रियांच्या शिक्षणात भर पडत गेली अमी स्त्री शिक्षित झाली पण स्त्रियांवर असणारी मानसिक आणि धार्मिक दहशत काही केल्या कमी झाली नाही महात्मा फुले यांचे निधन १८९०  मध्ये झाले पुढे काय पण निसर्गाला हि जाणवले कि काय कि हे कार्य थांबता नये या कार्याचा निकाल लागलाच पाहिजे  स्त्रियांची बंधनातून मुक्ती झालीच पाहिजे   म्हणून लगेच १४ एप्रिल १८९१  ला समतेचा प्रज्ञासूर्य  मध्यप्रदेशात महू गावी उगवला त्याच्या त्या प्रकाशाने या सर्व महामानावांचे प्रयत्न फळाला येणार असे दिसून आले आता स्त्रियांची मुक्तता निश्चित आहे हे जणू निसर्गच सांगू लागला आणि बाबासाहेब जन्माला आले  बहुजनाचा मुक्तीचा दाता जन्माला आला होता दिवस गेले शिक्षणाने बाबासाहेब प्रगत झाले जातीवादी व्यवस्थेने खूप अडचणी तयार केल्या पण स्त्रीमुक्ती झालीच पाहिजे हा  चालत आलेला समता  रथ पुढे नेण्यासाठी क्रांतिसूर्य आणखी तेजोमय झाला आणि बाबासाहेब जगातील सर्वात मोठे विद्वान झाले डिग्री ची लिस्ट त्यांच्या नावापुढे लागल्या आणि जनतेच्या हितासाठी त्यांनी बंड केले बाबासाहेब यांच्याकडून जणू गांधी ने सुद्धा सत्याग्रहाचे धडे घेतले कि काय असे वाटू लागले मानवाला पाणी हा नैसर्गिक अधिकार आहे  यासाठी सत्याग्रह केला आणि यशस्वी देखील केला आणि   स्त्री मुक्तीच्या  साठी प्रयत्न करणाऱ्या संभाजी राजे आणि शिवराय यांच्या हत्येचा बदला बाबासाहेब यांनी महाड इथे मनुस्मृती जाळून घेतला  इथेच स्त्रीमुक्ती निश्चित आहे याचा  इशारा भेटला भारताच्या  स्वातंत्र्यासाठी  लढा उभारला होता दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन नेस्तनाभूत झाले होते त्यांना भारताचा ताबा भारताकडे द्यायचा होता पण द्यायचा कसा ते राज्य चालवायचे तर त्याची घटना  हवी म्हणून घटनेची तरदूत करण्याची जबाबदारी देण्यात  आली अनेकांनी प्रयत्न केल पण शक्य झाले नाही शेवटी बाबासाहेबांना संविधान सभेत घ्यावेच लागले  बाबासाहेब संविधानात आले तर त्यांनी सुरुवात च  बहुजन समाजाला न्याय कसा देत येईल हे पाहू लागले आणि तो दिवस जवळ जवळ येवू लागला स्त्रियांच्या मुक्तीचा दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर ला बाबासाहेबांनी अथक प्रयत्नांनी या भारताला घटना दिली या घटनेत सर्व समानता देण्यात आली स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीत अधिकार दिले आणि इथेच स्त्रीमुक्तीचे द्वार कायमचे उघडे झाले आज जे स्त्रियांना सर्व क्षेत्रात मुक्त प्रवेश आहे हा याच महामानावांचा आणि महामातांचा त्याग  आहे म्हणून आज २६ नोव्हेंबर हा दिवस स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा झाला पाहिजे  बाबासाहेबांच्या रूपाने शेवटचा स्त्रीमुक्तीचा प्रज्ञा सूर्य स्त्रियांना मुक्त करून गेला
पण आज स्त्रियांना किती माहिती आहे याची हे माहित नाही   शिवराय ते बाबासाहेब शाहू महाराज हे बाबासाहेबांच्या सोबत स्त्रीमुक्तीचे कार्य करत  होते  पहा महामानव यांच्यात पण  खूप गोष्टी साम्य दिसतात म्हणजे सर्वांचे एकच ध्येय मग शाहू राजांची आरक्षण संकल्पना बाबासाहेबांनी संविधानात आणून शोशिताना न्याय दिला म्हणून आज हि बाबासाहेबांच्या अगोदर छत्रपती शाहू राजे यांचे नाव बहुजानाचे शिक्षण आणि महर्षी राजमहर्षी आरक्षणाचे  जनक शाहू राजे म्हणून ओळखले जातात आज स्त्रिया विसरल्या  कि या महामानव यांनी काय काय यातना सहन  केल्या आहेत त्या म्हणून आज स्त्रिया किती उंच भरारी घ्या त्या भरारीच्या पंखाना बळ देणारे हे  या महामानव यांचे  त्यागाचे बळ आहे हे विसरता कामा नये म्हणून २६ नोव्हेंबर हा स्त्रीमुक्तीचा खरा दिन आहे याच दिवशी स्त्रियांच्या जीवनात एक नवीन पहाट उगवली ती आज विसरत कामा नये
जय शिवराय जय भीमराय

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र