पोस्ट्स

जानेवारी १२, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

छत्रपति संभाजी राजे

इमेज
मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासात  सर्वात बदनाम व्यक्ती कोण असा जर कोणाला विचारले तर लगेच उत्तर मिळत संभाजी राजे  इतिहासकारांनी अशी काही त्यांच्या चरित्राची पुरती वाट लावून टाकली आहे संभाजी राजांच्या बदनामीची करणे दिली जातात ती त्यांच्या तथाकथित स्वैरवर्तनाची पण खरोखर ते स्वैरवर्तनि होते काय ? त्यांच्या राज्यबुडव्या घरभेदी स्त्रीलंपट  इ आरोप केले जातात हि दुषणे लावली जातात त्यात किती तथ्य आहे ? कथा कादंबऱ्या काव्ये नाटके चित्रपट इ ललित साहित्य व कला माध्यमांद्वारे रंगविले गेलेले संभाजी राजांचे चरित्रचित्रण ऐतिहासिक सत्यावर खरोखर आधारलेले आहे काय ? या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या हाती काय येते तर पूर्वगृहीत दृष्टीकोनाने काठोकाठ भरलेल्या शब्दबंबाळ साहित्याचा ढिसाळ ढिगारा त्यावर उभारलेल्या संभाजी राजांचे चरित्राचे मूर्तीशिल्प हि तसेच द्वेष व तिरस्काराने कलावंडलेले या मुर्तिशिल्पावरील द्वेष मत्सराची जळमटे काढून त्यावरील काजळी स्वच्छ करण्यासाठी ज्याच्या आधारावर तो उभा आहे त्या पूर्वग्रहदुषित साहित्याचा ढिसाळ ढिगारा उपसण्याची नितांत गरज  आहे अर्थात काही इतिहासकारांनी

नामांतर

इमेज
  मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन आणि आंबेडकरी जनता आज दिनांक १४ जानेवारी २०१४ नामविस्तार दिन म्हणजे बाबासाहेबांचे मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यात आले तो दिवस आणि त्या नामविस्तारानंतर काही क्रांतिगीते उदयास आली त्यातील एक गीत असे आहे भीमरायाच्या नावासाठी रक्त सांडले  राव असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव भीमरायाच्या नावासाठी रक्त सांडले राव ..... असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव ..... पाहून भीमाची क्रांती, ती क्रांती सलत होती..... ज्ञानाचे पेरले मोती त्याचे नावच नव्हते वरती .... नामांतराने विद्यापीठाला जगात आला भाव ...... असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव ..... गौतमने प्राण गमावला..... पोचीरामने लढा लढविला ... सुहासिनी आणि प्रतिभाने ..... जातिवाद्यांना धडा बडवला ..... बलिदानाचा महिमा गाईल इथले गाव अन गाव ..... असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव ..... भीम नाव कमानी वरती .... पाहून भटोबा झुरती ....... झुरता झुरता अर्धे मरती .... दवाखान्यात होती भरती .... नाव पुसाया येतील त्यांच्या वर्णी बसतील घाव ...... असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा