छत्रपति संभाजी राजे




मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासात  सर्वात बदनाम व्यक्ती कोण असा जर कोणाला विचारले तर लगेच उत्तर मिळत संभाजी राजे  इतिहासकारांनी अशी काही त्यांच्या चरित्राची पुरती वाट लावून टाकली आहे संभाजी राजांच्या बदनामीची करणे दिली जातात ती त्यांच्या तथाकथित स्वैरवर्तनाची पण खरोखर ते स्वैरवर्तनि होते काय ? त्यांच्या राज्यबुडव्या घरभेदी स्त्रीलंपट  इ आरोप केले जातात हि दुषणे लावली जातात त्यात किती तथ्य आहे ? कथा कादंबऱ्या काव्ये नाटके चित्रपट इ ललित साहित्य व कला माध्यमांद्वारे रंगविले गेलेले संभाजी राजांचे चरित्रचित्रण ऐतिहासिक सत्यावर खरोखर आधारलेले आहे काय ? या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या हाती काय येते तर पूर्वगृहीत दृष्टीकोनाने काठोकाठ भरलेल्या शब्दबंबाळ साहित्याचा ढिसाळ ढिगारा त्यावर उभारलेल्या संभाजी राजांचे चरित्राचे मूर्तीशिल्प हि तसेच द्वेष व तिरस्काराने कलावंडलेले या मुर्तिशिल्पावरील द्वेष मत्सराची जळमटे काढून त्यावरील काजळी स्वच्छ करण्यासाठी ज्याच्या आधारावर तो उभा आहे त्या पूर्वग्रहदुषित साहित्याचा ढिसाळ ढिगारा उपसण्याची नितांत गरज  आहे अर्थात काही इतिहासकारांनी तसा प्रयत्न केला पण लोकांच्या मनात संभू राजांची प्रतीम यापूवी खूप मलिन करण्यात आली होती आणि शंभू राजे समजण्यासाठी लोकांना संभाजी राजे पटवून देण्यासाठी प्रथम त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले पाहिजे  थोडक्यात संभाजी  राजांच्या आरोपावर लक्ष टाकूया
संभाजी राजांचे बदफैलीपणा { ? }
संभाजी चरित्राला विकृत वळण देण्यास कारणीभूत ठरली ती मल्हार रामराव चिटणीस याची बखर संभाजी राजांच्या दुर्दैवी शेवटानंतर १२२ वर्षांनी म्हणजे उत्तर पेशवाईत इ सन १८११  मध्ये ती रचली गेली त्याही पूर्वी जिंजीच्या मुक्कामात राजाराम महाराजांच्या आश्रयाखाली असलेल्या कृष्णाजी अनंत सभासद याने आपल्या शिवप्रभू चरित्रात संभाजी राजांच्या बदनामीचा पाया रचला होता डच फ्रेंचइंग्रज पोर्तुगीज मोगल आदिलशाह दरबाराच्या हेरांनी आपापल्या मालकांची मर्जी राखण्यासाठी जे अहवाल पाठवले होते त्यातही तिचे पडसाद उमटले आहेत समकालीन व नंतरच्या हि कागदपत्रात  अश्या रीतीने संभाजी राजांची बदनामी करणारी वर्णने आली आहेत ती का आली या प्रश्नाचा विचार केल्यास आपल्या समोर उभी राहते ती शिवपरिवारातील महत्वाकांक्षी सोयराबाईकटकारस्थानाची मालिका  त्या मालिकेत दिसणारे शिवरायांचे विश्वशु सहकारी यांची रंग त्यात मोरोपंत पिंगळे अण्णाजी दत्तो सुरनीस हिरोजी फर्जद बालाजी आवजी  अशी मंडळी समोर येतात त्यांनी स्वराज्यात पिकविलेल्या कंड्या व त्याचा आधार घेवून परकीय हेरांनी आपल्या राज्यकर्त्याकडे पाठवलेले अहवाल तसेच त्यावर  आधारलेल्या बखरी ह्याच संभाजी राजांच्या बदनामीस कारणीभूत ठरल्या या सर्व ऐतिहासिक कागदपत्रांची छाननी करून चाळीश वर्षे संशोधन करून इतिहासकार वा सी बेंद्रे यांनी छत्रपती हा संभाजी राजांच्या  आधारित ग्रंथ निर्माण करून त्याला १६६०  केले त्यानंतर कमल गोखले यांनी संभाजी महाराज यांच्यावर पी एच डी  करून शिवपुत्र संभाजी या ग्रंथाला १९७१ साली प्रकाशित  केले त्यानंतर मात्र संभाजी राजांकडे  अभ्यासकांची दृष्टी बदलली आणि छावा नावाच्या कादंबरीचा उदय झाला त्यानंतर महानायक संभाजी  म्हणून त्यांची ओळख व्हायला लागली त्यानंतर जयसिंगराव पवार यांनी छत्रपति संभाजी हा स्मारक ग्रंथ १९९० साली प्रकाशित केला  आणि जनमानसात संभाजी राजे  उदयास आले ते रौद्र रूप शंभू राजे आणि मग काही इतिहासकारांनी जी संभाजी राजांबद्दल थाप मारली ते सिद्ध होते आणि ती थाप काय आहेत त्याबद्दल पाहूया
गोदावरी कमला आणि तुळसा : सभासदाच्या बखरीत संभाजी राजांच्या तथाकथित दुर्वर्तनाबद्दल मात्र काहीही माहिती नाही चिटणीस याने आपल्या बखरीत त्याविषयी कपोलकल्पित माहिती देवून संभाजी राजांच्या चरित्रावर शिंतोडे उडवले  आहेत आणि अण्णाजी दत्तो सुरनीस याच्या मुलीवर संभाजी राजांनी बलात्कार केला म्हणून संभाजी राजांवर आरोप ठेवला जातो आणि हि माहिती  रंगवून सांगितली जाते आणि शिवरायांनी संभाजी राजांनी श्रेष्ठ मुलीशी अगम्यागमन केले म्हणून शिक्षा केल्याची माहिती दिली जाते चिटणीस याच्या बखारीवर  विसंबून बऱ्याच  लेखकांनी संभाजी राजांचा इतिहास मांडला महंमद झुबेरी याने १९ व्या शतकात १८२४ साली बुसातीन  उस  सलातीन हा आदिलशाहीचा इतिहास लिहिला चिटणीस याच्या बखरीनंतर १४ ते १५ वर्षांनी लिहिला त्या ग्रंथाला चिटणीस याच्या बखरीचा आधार घेतला होता त्यामुळे त्यात या वरील घटना आल्या याच वर्षी सातारच्या पोलिटिकल एजंट असलेल्या डफ  याने हिस्टरी ऑफ मराठास  हा ग्रंथ लिहिला १८२६ साली त्याचे प्रकाशन झाले   त्यातही संभाजी राजांच्या जीवनावर चिटणीस याच्या बखरीतील उल्लेख आहे त्यानंतर अनेकजणांनी इतिहासाची मांडणी केली आणि साऱ्यांनी  त्याच प्रकारे वर्णने केली शेवटी १९६० साली वा सी बेंद्रे यांनी लिखित संभाजी चरित्र  लिहिले त्यांनतर वसंत कानेटकर यांनी जेव्हा रायगडला जग येते हे नाटक लिहिले पण त्यांनी चिटणीस यांच्या बखरीचा आधार घेतला कदाचित त्यांनी बेन्द्रेंच्या ग्रंथाचा आधार घेतला असता तर नाटकात बदल झाला असता आणि चिटणीस याच्या बखरीतील त्या मुलीला गोदावरी हे नाव कानेटकर यांनी दिले आपल्या लेखात कानेटकर म्हणतात गोदावरी श्रेष्ठ वर्णाची असल्यामुळे शिवाजी महाराज नाराज झाले असे म्हटले आहे त्यावर कानेटकर यांची वर्ण श्रेष्टत्वाची  कल्पना पेशवाई मधील आहे शिवशाहीतील नाही असे जयसिंगराव पवार म्हणतात पुराण कथेचे थोर अभ्यासक द ग  गोडसे यांनी केसरीच्या १९८४ च्या दिवाळीच्या अंकात संभाजी राजा आणि गोदावरीची कथा या शीर्षकाचा लेख लिहिला त्यात रायगडाच्या खूब लढा बुरुजाखालून खाली येताना दिसलेल्या तथाकथित गोदावरीच्या समाधीचे संशोधन प्रसिद्ध केले त्यानुसार ती समाधी हिउत्तर पेशवाई मधील सवाई माधवराव यांच्या पत्नी यशोधरा बाई  यांची आहे कारण त्या समाधीचे बांधकाम हे शिवकालातील नसल्याचे आढळते ते पेशवाई मधील आहे कारण पेशव्यांचे वास्तव्य काही काळ रायगड वर होते यशवंतराव होळकरांच्या पुण्यावरील स्वारीच्या धुमश्चक्रीत दुसऱ्या  बाजीरावाच्या काळात कुटुंब कबिल्याबरोबर यशोदाबाई यांची रवानगी पुण्याहून  रायगडावर केली होती आणि त्या रायगडावर मरण पावल्या व त्यांचे दहन हे गडाखाली किल्लेवाडीच्या वाटेवरच झाले असे गोडसे म्हणतात  आता अण्णाजी दत्तो याच्या मुलीची कथा त्याने कशी आणली गेली आणि राजकारण केले गेले कारण जर ती समाधी हि यशोदाबाई यांची असेल तर गोदावरी चा काय सबंध येतो यात आणि  बांधकामावरून सिद्ध होत कि ते बांधकाम शिवकाळातील  नाही यावरून सिद्ध होत कि गोदावरी हिला संभाजी राजांचे चरित्र बदनाम करण्यासाठी त्यांच्या चरित्रात मुद्दाम घुसवण्यात आले
थोरातांची कमला
गोदावरी जशी संभाजी राजांच्या आयुष्यात नोदवलि गेली तशी कमला नावाची तथाकथित युवती संभाजी राजांच्या चरित्राला बदनाम करण्यासाठी त्यांच्या चरित्रात आणली गेली नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ बी कवी यांनी कमला नावाचे काव्य लिहून तिला इतिहासात अमर करून  टाकली आणि त्यावर आधारित थोरातांची कमळा  नावाचा चित्रपट काढून जनसामान्याच्या पर्यंत कमळा हि शंभूराजे यांची प्रेयशी  म्हणून  पोहचवली अन हि मोठ्यांनी म्हटलेलं खोट  किती मोठ याच उत्तम उदाहरण आहे कोल्हापूर जवळच्या पन्हाळा गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका समाधी मंदिराला थोरातांच्या कमले चे मंदिर म्हणून संबोधले जाते या स्मारकावरून तथाकथित कमलेला पुढील अनेक पिढ्यांना संभाजी राजांच्या प्रेमपात्रांची आठवण राहण्याची व्यवस्था केली आहे पण खरच ते थोरातांच्या कमलेचे स्मारक आहे का ? पन्हाळा येथील रहिवाशी व इतिहास संशोधक मु गो गुळवणी यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि थोरातांची कमला या शोध निबंधातून कमलेच्या कथेवर व समाधीवर प्रकश टाकला आहे ऐतिहासिक साधनांच्या द्वारे सिद्ध न होणारी आणि केवळ अख्यायीकेद्वारे जनमानसात ठाण मांडून जे थडगे दाखवले जाते ते कुणाचे आहे ? सज्जाकोठीच्या खाली असलेली आपटी या गावातील हे थडगे दुसऱ्या  संभाजी राजांच्या {राजारामपुत्र } काळातील करवीर दरबारचे सरदार यशवतराव थोरात व त्यांची पत्नी गोडाबाई यांची ती समाधी आहे तहसील कचेरीत त्याची नोंद आहे सर्व्हे नंबर १९७ क्षेत्रे  १ एकर १५ गुंठे खराब अशी असून ३ गुंठे खराब जमिनीतील या ऐतिहासिक वस्तूला थोरातांचे थडगे म्हटले जाते आणि या जमिनीचे वहिवाटदार  श्री आप्पा धोंडी कदम हे आहेत तसे कागदोपत्री नोदाविले आहे  पण कमला या पात्राचा कुठेही तसा कागदोपत्री उल्लेख सापडत नाही  यावर सखोल संशोधन केल्यावर जिवाजी बिन शिवाजी थोरात यांच्या करिन्यात  त्यांना यशवंतराव थोरात यांचा इतिहास सापडला करवीर दरबारात सेनाखासखील  या  किताबाबरोबर नवा लक्षाची विजापूर प्रांताची दौलत यशवंतराव थोरातांना मिळाली होती पन्हाळ्याच्या पायथ्याशी बालाजी विश्वनाथ पेशव्याच्या फौजेशी लढत असताना छातीत भाला लागून यशवंतराव थोरात जिथे धारातीर्थी पडला तिथेच त्यांची बायको गोडाबाई  समस्त भाऊबंदाच्या  समोर सती गेली हि घटना पन्हाळ्याच्या पायथ्याला घडली तिथे थोरात घराण्यातील लोकांनी वीर यशवंतराव व गोडाबाई  थोरात यांची समाधी बांधली आणि त्या समाधीत स्त्री पुरुषांच्या पाषाणाच्या मुर्त्या आहेत आणि त्या ढाल तलवार आदि शस्त्राणि सज्ज दाखवले आहे यावरून स्पष्ट होते कि कमला नावाची कोणी स्त्री संभाजी राजांच्या आयुष्यात आली होती आणि संभाजी राजांचा प्रेमप्रकरण कसे झाल हे समोर येत किती खोट  आणि कल्पित घटना इतिहासात लिहिल्या गेल्या हे समजून येते त्यामुळे यांना संभाजी राजांना बदनाम करण्यासाठी काल्पनिक पात्र घुसडून त्यांना इतिहासात  अमर करण्यात आले
गडकऱ्यांची तुळसा :
कानेटकर यांची गोदावरी थोरातांची कमळा  तशीच गडकरी यांनी तुळसा या काल्पनिक प्रेयशिला संभाजी राजांच्या चरित्रात घुसडली आणि लोकप्रिय केले मुळात नसलेल्या तुळसाला इ सन १८९१ साली आत्माराम मोरेश्वर पाठारे यांनी आपल्या संगीत श्री  छत्रपती संभाजी नाटकात जन्म दिला त्याच्या या निर्मितीला त्यानंतरच्या अनेक नाटककारांनी  आणि कादंबरी कारांनी  खूप प्रसिद्धी दिली गोदावरी आणि कमला प्रमाणे तिच्याविषयी कोणत्याच लोककथा व आख्यायिका प्रचलित प्रचलित नव्हत्या किंवा तिच्याविषयी कोणतेच थडगे किंवा स्मारक उपलब्ध नाही पण गडकर्यांनी राजसंन्यास या संभाजी राजांवरील नाटकात तिला महत्वाचे स्थान दिले आहे आणि त्यामुळे ती जनमानसात स्थिरावली इ सन १८९१ मध्ये पाठारे  यांनी निर्माण केलेल्या संभाजी राजांच्या कपोकल्पित प्रेयशिला १९२२ मध्ये गडकर्यांनी राजसंन्यास मध्ये पुनरुज्जीवन दिले आणि वि वा हडप यांनी १९२३ मध्ये राजसंसार या नाटकात त्याचेच अनुकरण केले आजवर एकंदर साठच्यावर संभाजी राजांवर नाटके लिहिली त्यात गोदावरी कमळा  आणि तुळसा यांना महत्वाचे स्थान दिले आहे १९५१ साली मा के सोनसुखार यांनी थोरातांची कमला व इ सन १९६७ साली शं ब चव्हाण यांनी सती गोदावरी हे नाटक लिहून त्यांना मध्यवर्ती स्थान दिले  इ सन १९४१ साली बी कवींनी कमला हे नाटक लिहिले त्यावर थोरातांची कमला हा चित्रपट भालजी पेंढारकर यांनी निर्माण केला पुढे १९६३ साली याच शीर्षकाचा दुसरा चित्रपट काढला कवी राजा बढे यांनी १९६५ साली रायगडचा राजबंदी चित्रपट काढून गोदावरीला मध्यवर्ती स्थान दिले या सर्व कलाप्रकारांनी  खमंग मसाला म्हणून या पात्रांचा  वापर केला होता पण आणि त्यामुळे संभाजी राजे यांना रंगीला नायक अशी प्रतिमा तयार केली गेली आता या तुळसा हि काल्पनिक होते हे सिद्ध होत कारण तिला इतिहासात कुठेच नाव येत नाही किंवा तिच्याविषय माहिती भेटत नाही म्हणजे हि काल्पनिक आहे एवढे नक्की  आता संभाजी राजे व्यसनाधीन आहेत असा त्यांचा उल्लेख आहे प्रत्यक्षात कोणताही आधार  नसलेल्या कथाना खरे मानून एक स्त्रीलंपट पुरुष म्हणून संभाजी राजांची प्रतिमा तयार केली गेली त्याच प्रमाणे व्यसनाच्या अधीन झालेला राजा म्हणून त्यांना रंगवले गेले डफ  याने मराठ्यांचा इतिहासात तसेच रियासतकार सरदेसाई यांनी उग्र प्रकृती संभाजी मध्ये त्यावर विशेष भर दिला आहे १९०० मध्ये न्या म गो रानडे यांनी राईज  ऑफ मराठा पॉवर या ग्रंथात याबद्दल संभाजी राजांना दोष दिला आहे नरहर कुरुंदकरांनी यावर आपले मत दिले आहे ते म्हणतात अकरावे वर्षी संभाजी राजांना व्यसने लागली तरीही १६६७ पर्यंत निट वागत होते असे काही चमत्कारिक व विसंगत चित्र सरदेसाई यांना अभिप्रेत होते १९८० ते १६८९ पर्यंतचा संभाजी राजांचा काळ सारखा लढाई लढण्यात गेला चैन भोग विलास करण्यास त्यांना फुरसत मिळाली नव्हती अश्या स्थतीत त्यांच्यावर असे आरोप होतात हे एक कोडेच वाटते  आणि  त्यांचे मुल मोघल तवारिखकार काफिखान यांच्या मुन्तखबुल लुबबाए महम्मदशाही या ग्रंथात सत्तामदाचा कैफ या अर्थाचे शब्द वापरले आणि डफ  याने त्याचे चुकीचे भाषांतर करून त्यांना व्यसनाधीन करून टाकले
संभाजी राजांविषयी अनेक गैरसमज पसरविण्यास कारणीभूत ठरलेली चिटणीसी  बखर लिहिणारा मल्हार राव रामराव चिटणीस हा बाळाजी  आवजी चा खापरपणतू होता संभाजी राजांवर विष प्रयोग करण्याच्या कटात बालाजी आवजी सामील होता त्यामुळे संभाजी राजांनी त्याला हत्तीच्या पायदळी तुडवले आपल्या खापरपंजोबाच्या  मृत्यूचा सूड घेण्याच्या भावनेतून चिटणीस याने हि बखर लिहिली आणि महाराजांना चरित्रहिन आणि स्वैरवर्तनी ठरवले त्यावर आधारित ग्रंथावर त्याचे पडसाद उमटले त्यामुळे संभाजी राजे हे एक खलपुरूष आहेत अशी लोकांच्या मनात भावना निर्मान झाली यावरून सिद्ध होत कि संभाजी राजे काय होते ते आता व्यसनी असणारा माणूस लढाई करण्यात का दंग राहील कारण सर्रास पहिले तर व्यसनी माणूस व्यसनशिवाय दूर राहत नाही आणि जर संभाजी राजे ११ वर्षाचे असताना त्यांना व्यसन लागते हे न पटण्यासारखे आहे कारण जे संस्कार शिवरायांवर झाले तेच संस्कार संभाजी राजांवर झाले मग शिवराय निर्व्यसनी आणि संभाजी राजे व्यसनी कसे होतात हे एक व्यसनाधीन संभाजी म्हणून त्यांची ओळख द्यावी म्हणून मारलेली केवळ थाप आहे कारण व्यसनी माणूस इतक्या यातना सहन करणे शक्य नाही
यावरून सिद्ध होते राजे निर्व्यसनी होते
ज्यांच्या हातात लेखणी भेटली कि कसे तलवार चालवणारे बहाद्दर आणि शूरवीराना कसे पायचीत केले जाते याचा उत्तम नमुना म्हणजे छत्रपती संभाजी महाराज  आहेत  आता लोकांच्या भावना बदलत आहेत कारण १९९० मध्ये प्रकाशित झालेली छत्रपती संभाजी राजांचा स्मारक ग्रंथ आणि १९६० साली वा सी बेंद्रे यांची छत्रपती संभाजी महाराज हा ग्रंथ संभाजी राजांच्या चरित्रावर प्रकाश टाकणारा आहे  यातून समजते कि ब्राह्मणी इतिहासकारांनी  कसे इतिहासाचे तीन तेरा केले ते

जय शिवराय
जय शंभूराजे
जय भीमराय

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र