आम्हाला चीड येत नाही
झाला आमच्या जीवनाचा अंधकार नाही प्रकाशाची आस जीवन आहे रसातळास आम्हाला देवाचा ध्यास कधी कळणार जीवनाचे मर्म आम्हाला कळत नाही काय करणार त्याला कारण आम्हाला चीडच येतच नाही ।। धृ ।। मारिले खैरलांजीत आमच्या बांधवाना करून बलात्कार केल बेइज्जत आमच्या बहिणींना तरी मोकाट सुटले गाव गुंड राजकारण्याची साथ त्यांना मरू दे त्यांना जावू दे इज्जत आम्ही तर ठीक आहे ना अशी विचार धारा आमची त्याला दोष त्यांचा म्हणूच शकत नाही काय करणार त्याला कारण आम्हाला चीडच येतच नाही ।। १ ।। आमच्या बहिणीची इज्जत मंडळी त्यांनी रस्त्यावर आम्ही म्हणालो लुटू देणा इज्जत ती वेळ थोडी आहे आमच्यावर मेली तर मरेल ती ते संकट तिच्याच घरावर आम्ही कशाला उतरायचे त्यासाठी रस्त्यावर पण उद्या तुमचीच बहिण असेल तेव्हा अश्रू येतील कि नाही काय करणार त्याला कारण आम्हाला चीडच येतच नाही ।। २ ।। दिवसा ढवल्या दलित वस्तीवर हल्ले करती जातीवादीगुंड आमच्या मनात अजून आहे जाती व्यवस्थेचा न्यूनगंड अजून अत्याचार होती आमच्यावर आमचे रक्त अजूनही थंड असे वाटते आहे आजला...