बुद्ध शिष्य रावण
वाल्मिकी रामायणात रावण हा खलनायक स्वरुपात दाखवला आहे पण त्या रावणाचे महात्म्य हा रामायणाचा रचनाकार वर्णन करतो याचा अर्थ काय आहे समजणे गरजेचे आहे वरील शीर्षकावरून आपल्याला कदाचित विचित्र व कि बुद्ध शिष्य रावण कसा काय त्याला ऐतिहासिक पुरावा आहे बुद्ध धम्मातील लंकावतार सुत्त हे तथागतांनी रावणाला केलेला उपदेश आहे प्रथम रामायणातील रावणाचा रामायणातही कसा गौरव केला आहे ते पाहूया आता रामायणात रावणाला राक्षस का म्हटले असावे तर त्याला एक कारण आहे रावण हा द्रविड संस्कृतीतील राजा आहे आणि या संस्कृतीला रक्षक संस्कृती म्हटले जाते रक्षक फार पराक्रमी असल्याने आर्यांनी त्यांना राक्षस म्हटले आणि रक्षक हि मानव संस्कृती होती {वा रा श्लोक ७/४/९व १२ } वाल्मिकीने रावणाचे गुण सांगताना वाल्मिकी म्हणतो कि रावण हा नितीज्ञ महाविद्वान सभ्य आणि सुसंस्कृत मनुष्य होता त्याची नगरि मानवांची नगरी होती वाल्मिकी पुढे जावून म्हणतो कि रावण तपस्वी मेधावी महावीर बलवान पंडित संगठीत शरीर आणि विशाल छातीचा सुंदर पुरुष होता हे स्वत: वाल्मिकी आपल्या रामायणात लिहितोय तसेच रावणाला तो महात...