बुद्ध शिष्य रावण
वाल्मिकी रामायणात रावण हा खलनायक स्वरुपात दाखवला आहे पण त्या रावणाचे महात्म्य हा रामायणाचा रचनाकार वर्णन करतो याचा अर्थ काय आहे समजणे गरजेचे आहे वरील शीर्षकावरून आपल्याला कदाचित विचित्र व कि बुद्ध शिष्य रावण कसा काय त्याला ऐतिहासिक पुरावा आहे बुद्ध धम्मातील लंकावतार सुत्त हे तथागतांनी रावणाला केलेला उपदेश आहे प्रथम रामायणातील रावणाचा रामायणातही कसा गौरव केला आहे ते पाहूया आता रामायणात रावणाला राक्षस का म्हटले असावे तर त्याला एक कारण आहे रावण हा द्रविड संस्कृतीतील राजा आहे आणि या संस्कृतीला रक्षक संस्कृती म्हटले जाते रक्षक फार पराक्रमी असल्याने आर्यांनी त्यांना राक्षस म्हटले आणि रक्षक हि मानव संस्कृती होती {वा रा श्लोक ७/४/९व १२ }
वाल्मिकीने रावणाचे गुण सांगताना वाल्मिकी म्हणतो कि रावण हा नितीज्ञ महाविद्वान सभ्य आणि सुसंस्कृत मनुष्य होता त्याची नगरि मानवांची नगरी होती वाल्मिकी पुढे जावून म्हणतो कि रावण तपस्वी मेधावी महावीर बलवान पंडित संगठीत शरीर आणि विशाल छातीचा सुंदर पुरुष होता हे स्वत: वाल्मिकी आपल्या रामायणात लिहितोय तसेच रावणाला तो महात्मा म्हणून संबोधतो वाल्मिकीच्या सुंदरकांड मध्ये श्लोक ६ आणि १३ मध्जे वाल्मिकी म्हणतो त्या महात्मा रावणाची नगरी जी महारत्नानी समकीर्ण होती ती नगरी हनुमानाने पहिली पहा श्लोक
'' महात्मनो महादवैश्म परिच्छदम
महारत्न समकीर्ण ददरौ स महाकपी
परत रावणाला आपल्या मंत्र्यासोबत चर्चा करताना पाहून हनुमान म्हणतो कि त्या महात्मा रावणाच्या सोबत मंत्र्याशिवाय अन्य कुणीही नव्हते पहा श्लोक
'' स रावण महात्मान विजनै मंत्रिसन्निधो ६-१०-१२
परत वाल्मिकी रावणाची एक महत्वाची आणि अतिशय खास सवय सांगतो कि रावण हा बळजबरीने कोणाचेही अपहरण करत नसे जरी तो महाप्रतापी असूनही पहा श्लोक
''तत्र कश्चित्प्रमदा प्रसहा विर्योपपन्नेन गुणेन लब्धा
न चान्यकामापी न चान्यपूर्वा वीणा वारहां जनकात्मजा तू
वाल्मिकी रामायणात वाल्मिकी रावणाचे सौंदर्य सांगत आहे राजर्षी ब्राह्मण दैत्य आणि गंधर्वाच्या स्त्रिया रावणाचे रूप पाहून त्याच्याकडे आकर्षित होत असत आणि कामाग्निच्या स्वाधीन होवून जात पहा श्लोक
'' राजर्षी विप्र दैत्यानां गंधर्वानां च योपितः
रससाचाभवत्कन्या स्तस्थ काकवंश गता वा रा ५-६-६८
यावरून स्पष्ट होते कि रावण हा अक्राळ विक्राळ चेहऱ्याचा नसून फारच सुंदर होता वाल्मिकी रामायणात रावणाला काही वाईट चारित्र्याचा व्यभिचारी दहा शिरांचा व वीस हातांचा दाखविला आहे आता प्रश्न असा पडतो कि काही ठिकाणी रावणाला चांगला दाखवून काही ठिकाणी रावणाला वाईट दाखवून वाल्मिकीला काय होते हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रामायण लिहिताना वाल्मीकीचे डोक काही ठिकाणी चांगले तर काही ठिकाणी बिघडले असावे असे म्हयाला काही हरकत नाही
आता आपण पहिले तर वाल्मिकीने रामायण लिहिण्यापूर्वी नारदाकडून रामकथा ऐकली होती आणि बुद्ध शिष्य रावण हे हि त्याने ऐकले होते आणि त्याने ती करून रामायणात लिहिली आता बुद्ध शिष्य रावण हा मध्यप्रदेशातील गोंडवंशीय राजा होता बुद्ध शिष्य रावण हा वाल्मिकीच्या रावण हे सद्याच्या सिंहल {श्रीलंका } देशात झाला नाही वाल्मिकीने रावणाची कथा ऐकली होती त्यामुळे त्यामुळे त्याने रावणाला सुंदर चांगले वर्णन करण्यात आणि बुद्ध शिष्य रावणाच्या जीवनात सीता हरण आणि रामरावण युद्ध नाही
आता आपण बुद्ध शिष्य रावण पाहूया त्यावरून निष्कर्ष काढता येईल कि खरी रामायणाची कथा काय आहे ते
बुद्ध शिष्य रावण : राम कथा असली तरी रावण हि व्यक्ती भारतातच झालेली आहे यात शंका नाही बौद्ध ग्रंथात लंकावतार सुत्त यामध्ये बुद्धाचा रावणाला उपदेश यावरून स्पष्ट होते मात्र लंकावतार सुत्तातील रावण हा श्रीलंका या देशातील असणे शक्य नाही कारण वाल्मिकी रामायणात सुंदरकांड सर्ग १५ श्लोक १५ मध्ये रावणाच्या अशोक वनात चैत्यप्रासाद अति उंच असल्याचे वर्णन आहे आणि श्लोक ५-४३-१ मध्ये हनुमानाने चैत्यप्रासाद उधवस्थ केल्याचे वर्णन आहे आणि चैत्य हा शब्द प्रासाद स्मारक स्तूप किंवा विहार हे अन्य कोणत्याही धर्मग्रंथात सापडत नाही ते बौद्ध ग्रंथात सापडते चैत्यस्मारक हे तथागतांच्या केसलोमादी शारीरिक धातूवर जातात त्यामुळे रावण जा बौद्धधम्मीय होता यात शंका राहत नाही बुद्ध शिष्य रावणाला उपदेश बुद्धांनी दिला ते अडीच हजार वर्ष पहिले बुद्धांनी रावणाला उपदेश दिला श्रीलंकेत बौद्ध धम्म प्रथम श्रीलंकेत सुमारे २२५० वर्षापूर्वी म्हणजे इ सन पूर्व २४७ मध्ये सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांनी नेला यावरून लक्षात येते कि मिश्र देशातील रामसेस याची कथा नारदाकडून एकली आणि बुद्ध शिष्य रावणाला कल्पनेतून रामायंत खलनायक बनवले कारण बुद्ध शिष्य रावणाच्या जीवनात सीता हरण आणि रामरावण युद्ध झालेच नाही अश्या घटना घडल्याच नाहीत यावरून भारतातील रामायणात किती मिळवत आहे हे लक्षात येते
अनेक विद्वानांनी आणि इतिहासकारांनी रावणाची लंका हि नर्मदा नदी व सोनभद्र नदीच्या संगमाजवळ असलेल्या प्रदेशात अमरकंटक पर्वतावर असल्याचे म्हटले आहे लंका म्हणजे उंच टिळा हा लंका शब्द गोंडी भाषेचा शब्द आहे म्हणूनच गोंड राजा रावणाची लंका हि अमरकंटक पर्वतावर होती असे विद्वान मान्य करतात अमरकंटक पर्वताच्या जवळ फार मोठा दलदलीचा प्रदेश आहे ज्याला पार करणे शक्य नाही आणि वाल्मिकीने ह्यालाच समुद्र म्हटले आहे
आजही अमरकंटक पर्वताच्या जवळ रावण ग्राम नावाचे गोंड जमातीचे गाव आहे तेथे रावांची झोपलेल्या दगडी मूर्ती आहे आणि तेथील लोक विजयदशमीला रावण बाबा म्हणून या मूर्तीची पूजा करतात सन १८९१ च्या जनगणनेनुसार त्या भागातील लाखो गोंडानि स्वताचे नाव रावण वंशीय नोंदविल्याचा उल्लेख आहे आजही तेथील लोक स्वताला रावण वंशीय म्हणूनच सांगतात इ स १३ व्या शतकात या भागातील पराक्रमी राजे गोंड वंशी होते त्यांच्यातील पराक्रमी राजा संग्रामसिंग हा होवून गेला याची सोन्याची नाणी सापडली असून यावर पौलस्त्य वंश असे नाव लिहिले आहे या घराण्याची सत्ता ३०० ते ४०० वर्षे होती
याच भागात गोंडी यांच्या विरोधी उराव {वानर } व शबर जातीचे लोक राहतात हे बुरव लोक प्राचीन काळी वानर नावाने संबोधले जातात १९११ चे जनगणनेनुसार तेथे ६ लाख शबर जातीचे व ९ लाख उराव जातीचे लोक असल्याचा उल्लेख आहे आणि वाल्मिकीने याच उराव व शबर यांचा आधार घेवून रामायण रचले
वाल्मिकी रामायणात श्लोक ३-५४-५ मध्ये रावणाने सीतेला नेल्याचा उल्लेख याप्रमाणे केला आहे रडत असलेल्या सीतेला रावणाने पंपा सरोवर ओलांडून लंकापुरीत नेले पहा श्लोक
''सच पम्पामतीक्रम्य लंकामभिमुखः पुरीम
जगाम मैथिली गृह्य रुदती राक्षसेश्वर : वा रा ३-५४-५
आपण जर पहिले न भौगोलिक दृष्ट्या पंपा सरोवरापलीकडे फार विस्तीर्ण असा द्रविडींचा प्रदेश लागतो जो आजचा तामिळनाडू आहे आणि त्याही पलीकडे श्रीलंका आहे वरील श्लोकात सरोवरानंतर एकदम लंका आहे याचा अर्थ असा कि किष्किंधा नगरी वर जवळच होती वालीच्या धाकाने सुग्रीव आपल्या हनुमान आणि अमल्या मंत्र्यासोबत जंगलात पळून गेला बलीसमोर हनुमानाचा पराक्रमाला काय झाले होते वालीला मारण्याला त्याने सुग्रीवाला मदत का नाही केली याचा अर्थ वालीसमोर सारे हतबल होते
वरील स्थळांचा आसपास म्हणजे चित्रकुट आणि अमरकंटक यांच्या मध्ये सर्वच गोष्टी जुळून येतात पंचवटी दंडकारण्य हे भूभाग रावणाच्या राज्याचा भाग होते म्हणून जवळपास नगरधन रामटेकला राहणाऱ्या वाल्मिकीने याच भूभागांचा रामायणात पुरेपूर वापर केला आहे आता भारत आणि श्रीलंकेचे अंतर हे रामायणात १०० योजन दाखवले आहे १०० योजन म्हणजे ८०० मैल आणि ८०० मैल म्हणजे आजचे १२८० किलोमीटर होते पण पाहिलं तर लंका भारताच्या ५० किलोमीटरही दूर नाही याचा अर्थ वाल्मिकीने काल्पनिक रामायण लिहिले यात शंका नाही आता आपण लंकावतार सुत्त पाहूया
या सुत्तात रावण बुद्धाला १०८ प्रश्न विचारतो आणि हे सारे प्रश्न बौद्ध तत्वज्ञानाशी मुल सिद्धांताशी सबंधित आहेत निर्वाण संसार बंधन मुक्ती आलयविज्ञान मनोविज्ञान शून्यता इत्यादी गंभीर विषयाबद्दल तसेच चक्रवर्ती मांडलिक आणि शाक्यवंश इत्यादी बाबत १०८ प्रश्न विचारले आहेत
आता आपल्याला कोणतीच शंका राहत नाही कारण रावणाने स्वत विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे तथागतांनी त्याला दिली यावरून रावण बौद्ध राजा होता आणि तो बुद्धकालीन होता म्हणजे बुद्धाच्या समकालीन होता
लंकाधीश बुद्ध शिष्य रावणाला इराणी वैदिक धर्मीय आर्य आणि ऋषीबद्दल घृणा होती त्याचे कारण यज्ञ आणि ईश्वराच्या नावावर पवित्र अग्नीमध्ये अत्यंत क्रुरतेने निरापधार दिन अबोल गुराढोरांची हत्या दररोज होत असे हा ऋषींचा अक्षम्य अपराध होता वैदिक ऋषीमुनी आश्रमाच्या नावावर पंचवटी आणि दंडकारण्य इत्यादी रावणाच्या राज्यातील भूभाग बळकावून बसले होते यज्ञात रावणाची माणसे ऋषींना त्रास देत असत कधी कधी अर्बट ऋषींना ठार देखील मारत त्यामुळे रावणाला वाईट केल
आता निष्कर्ष असा निघतो कि रावण हा बुद्ध शिष्य होता यात शंका नाही आणि तो आमचा आदर्श पूर्वज होता हे स्वतः रामायण सिद्ध करते आपणही आपल्या या पूर्वजाला जे विजयदशमीला जळतो त्यामुळे आपण आपल्या पूर्वजाला वाईट होवून बसलो आहे या लोकांनी आपलेच पूर्वज आपले वैरी म्हणून दाखवले आहे
जय शिवराय
जय भीमराय
टिप्पण्या