भीमशक्ती शिवशक्ती : बहुजनाची फसवणूक
भीमशक्ती शिवशक्ती : बहुजनाची फसवणूक भीम शक्ती आणि शिवशक्ती ह्या परस्पर विरोधी संघटना आहेत हे सार्या महाराष्ट्राला चांगले माहित आहे गेके चाळीस वर्षे हा संघर्ष हा महाराष्ट्र च काय सारा देश पाहत आहे शिवरायांनी सर्व सामान्य माणसाच्या हितरक्षण व हित संवर्धन करणे हा हेतूहोता तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतून उभ्या राहिलेल्या भीमशक्तीचे उद्दिष्ट्ये आणखी व्यापक आणि सखोल होते जनतेच्या हिताचे रक्षण आणि संवर्धन करणे हा एकमेव उद्देश होताच पण एवढ्यावरच न थांबता समाजात समता न्याय बंधुता बुद्धीप्रामाण्याच्या दिशेने जाणारे अमुलाग्र सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आर्थिक परिवर्तन घडवून आणणे हे हि तिचे उद्दिष्ट्ये होते त्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती या दोन्ही शक्ती कधीच एकमेकाविरोधात नव्हत्या समाजाचे कल्याण करणे हाच यांचा ध्यास होता शिवशक्ती हि शिवरायांच्या स्वराज्याच्या इर्षेतून निर्माण झालेली शक्ती होती आणि ती प्रामुख्याने बारा बलुतेदार अठरा अलुतेदार यांच्यातून उभी राहिली होती या शिवशाहीला तत्कालीन सामाजिक आणि नाय मर्यादा असल्या तरी शिवराय हे एक राजे असले तरी या शिवशक्तीचा बरासचा ...