पोस्ट्स

फेब्रुवारी १६, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उपकार महापुरुषांचे

बुद्ध रुपी महासागराला कमी नाही कशाची भीमरूपी  सूर्याला कमी नाही तेजाची औलाद हि भीमरायाची त्याला भीती नाही कोणाच्या बापाची  ।। १ ।। शिवरायरुपी  आकाशाला मर्यादा नाही कोणाची फुले रुपी प्रकाशाला साथ छत्रपती सूर्याची शाहू रुपी वार्याला भीती ना अडथळ्याची कबीर रुपी पावसाला कमी न पाण्याची वाहतात नेहमी आमच्या मनी गाणी तयांची औलाद हि भीमरायाची त्याला भीती नाही कोणाच्या बापाची  ।। १ ।।  कोणापुढे झुकणे आमच्या रक्तात नाही शिवरायांची पाळतो आम्ही शिवशाही संकटाना आम्ही घाबरत नाही भिमरायांची मानतो आम्ही लोकशाही स्वतंत्र शिकवलं आम्हाला हि पुण्याई या  महामानवांची औलाद हि भीमरायाची त्याला भीती नाही कोणाच्या बापाची।। २ ।। शिक्षणाने आम्ही केले सर केले यशाचे शिखर महात्मा फुले सावित्री माई यांचे उपकार जथे तिथे मळतो आम्हाला अधिकार आम्हाला आहे शाहू राजांचा आधार गातो गोडवी  अश्या या महापुरुषांची औलाद हि भीमरायाची त्याला भीती नाही कोणाच्या बापाची  ।। ३ ।। जगलात माणूस म्हणून आठवण ठेवा स्वातंत्र्यासाठी अखंड लढला जिजाऊचा शिवा गुलामीतून केल मोकळ त्या जीवा भावा हक्कासाठी सदा लढला भिमाइचा  भिवा

त्या बहुजनाला सार्या जनाला दाखवल भीमान बुद्धाकडे बोट

सांगतोय तुम्हा हा भीमाचा लेक हाती धारा ह्या लेखणीचे टोक त्या बहुजनाला  सार्या जनाला दाखवल भीमान बुद्धाकडे बोट ।। धृ ।। नको युद्ध हे जाणा मनी शांतीची वाणी बुद्ध असे हि शांती मनाची गावी त्यांची गाणी शिकवा जगाला बुद्ध करुणेची कहाणी आज युद्ध नको हवा बुद्ध जगाला त्या तुम्ही पटवुनी भीमराया चा सल्ला द्यावा जगाला छाती ठोक  त्या बहुजनाला  सार्या जनाला दाखवल भीमान बुद्धाकडे बोट   ।। १ ।। बहुजननो आठवा  दिवस त्या गुलामीचे भिमरायाने  जिने दिले रे तुम्हा सन्मानाचे गुलामगिरीची  तोडली बेडी  बंध ते गुलामाचे बुद्ध रुपी हे अमृत पाजले तुम्हाला बुद्ध ज्ञानाचे जतन कराया  कार्य भीमाचे करा एकीचा कोट त्या बहुजनाला  सार्या जनाला दाखवल भीमान बुद्धाकडे बोट ।। २ ।। समता बंधुता शिकवण आहे बुद्धाची स्वातंत्र्याची दिली ललकारी शिकवण छत्रपतींची शिक्षण आहे तिसरा डोळा शिकवण महात्मा  फुलेंची बहुजन समाज शिक्षित व्हावा आरक्षण देवून किमया शाहू राजांची संविधानात दिले रे सारे अधिकार अशी हुशारी बाबा भीमाची बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर आहे एक तलवारीचे टोक त्या बहुजनाला  सार्या जनाला दाखवल भीमान बुद्धाकडे बो

चला बाबा तुम्हाला तुमचा भारत दाखवतो

नको परत जन्म बाबा परत आता कोण देईल साथ तुम्हाला  आम्ही तर झालो ना गद्दार बाबा तुम्ही परत आलात तर तुम्ही परत झटाल  ह्या हीन दिन दुबळ्यांच्या हितासाठी पण बाबा हा समाज आता तुमचा राहिला कुठे आहे म्हणून बाबा एक कविता आठवते जगण्यासाठी जीवन देवून बाबा तुम्ही झाला महान नाही राहिली जाण  यांना हे दुसर्याचे गुलाम करून कारणी आज यांची बाबा तुम्हा सांगतो चला बाबा तुम्हाला तुमचा भारत दाखवतो   ।। धृ ।। मागचीच घटना बाबा दिल्लीत या घडली बलात्कार झाला म्हणुनी लोक रस्त्यावर आली नाव तिचे माहितच नाही कोणाची निर्भया  तर कोणाची दामिनी झाली नंतर समजल ती मुलगी सवर्ण हिंदूची निघाली त्याच्या अगोदर हि घटना अशीच घडली काय सांगू बाबा त्यांची तर जातीवाद्यानी इज्जत गावाच्या वेशीवर टांगली खैरलांजी हत्याकांड म्हणून बातमी पेपरात आली प्रियांकाची इज्जत म्हणे गावगुंडांनी लुटली चार दिवस मायलेकरांची प्रेते सडवली तेव्हा  का हि लोक रस्त्यावर नाही आली अशी जनता या देशाची जातिवाद सांगतो चला बाबा तुम्हाला तुमचा भारत दाखवतो   ।। १ ।। संविधानाने दिला तुम्ही हक्क जगण्याचा नेत्यांनी अधिकारच छिनला ह्या लेकरांचा पुढ