चला बाबा तुम्हाला तुमचा भारत दाखवतो

नको परत जन्म बाबा परत आता कोण देईल साथ तुम्हाला  आम्ही तर झालो ना गद्दार
बाबा तुम्ही परत आलात तर तुम्ही परत झटाल  ह्या हीन दिन दुबळ्यांच्या हितासाठी पण बाबा हा समाज आता तुमचा राहिला कुठे आहे
म्हणून बाबा एक कविता आठवते
जगण्यासाठी जीवन देवून बाबा तुम्ही झाला महान
नाही राहिली जाण  यांना हे दुसर्याचे गुलाम
करून कारणी आज यांची बाबा तुम्हा सांगतो
चला बाबा तुम्हाला तुमचा भारत दाखवतो   ।। धृ ।।
मागचीच घटना बाबा दिल्लीत या घडली
बलात्कार झाला म्हणुनी लोक रस्त्यावर आली
नाव तिचे माहितच नाही कोणाची निर्भया  तर कोणाची दामिनी झाली
नंतर समजल ती मुलगी सवर्ण हिंदूची निघाली
त्याच्या अगोदर हि घटना अशीच घडली
काय सांगू बाबा त्यांची तर जातीवाद्यानी इज्जत गावाच्या वेशीवर टांगली
खैरलांजी हत्याकांड म्हणून बातमी पेपरात आली
प्रियांकाची इज्जत म्हणे गावगुंडांनी लुटली
चार दिवस मायलेकरांची प्रेते सडवली
तेव्हा  का हि लोक रस्त्यावर नाही आली
अशी जनता या देशाची जातिवाद सांगतो
चला बाबा तुम्हाला तुमचा भारत दाखवतो   ।। १ ।।
संविधानाने दिला तुम्ही हक्क जगण्याचा
नेत्यांनी अधिकारच छिनला ह्या लेकरांचा
पुढार्यांची चंगळ आहे कुठला प्रश्न विकासाचा
ज्याला ज्याला त्याला छंद लागलाय आपल्या तिजोर्या भरण्याचा
निवडणुका येती मग करती ढोंग आपण समाजसेवक असल्याचा
नेत्यांची कमाल भारी म्हणतीकरू विकास या समाजाचा
एकमेकांवर करती आरोप प्रत्यारोप करून घात लोकशाहीचा
एकमेकांना करती आव्हान भागते त्रास जनता यांच्या जुलूमशाहीचा
रस्त्यारस्त्यावर ह्यांच्याच नावाचे पोस्टर लावत बसती असा कारबार यांचा
जनमानसात एकही नेता नाही राहिला ज्यावर नाही ठपका कलंकाचा
काय सांगू बाबा तुम्हाला हाच समाज तुमच्या विचारांचा घात  करतो
चला बाबा तुम्हाला तुमचा भारत दाखवतो    ।। २ ।।
जातीवादी दंगली घडतात याच भारताच्या मातीत
दया येईना या भारताला सुरा खुपसती आमच्या छातीत
कानपूर हि हत्याकांडाची  करून कहाणी आहे याच भूमीत
खैरलांजी तर लाजवेल अशी कहाणी याच मायभूमीत
लेकरे एकाच मातीची तरीही करिती वर आमच्या पाठीत
कोण समजावणार यांना जातिवादच इथल्या रुढीत
अन्यायाचा डोंगर उभा भारताच्या भूमीत
तरी समाधान मानंतात तुझी लेकरे याच गुलामीत
नाही तापत यांचे रक्त समाज तुझा षंढ  आज ठरतो
चला बाबा तुम्हाला तुमचा भारत दाखवतो  ।। ३ ।।
लोकशाही आणली बाबा याच भारतात तुम्ही
गहाण  ठेवली मते आमची लाचार होवून आम्ही
कधी बलात्कार कधी हत्या होतात आजला  नेहमी
प्रतिकार तर दूरच राहिला इथे बोलेनाच कोणी
आपलीच बायको आपलीच मुलगी मीच म्हणे माझ्या संसाराचा धनी
समाज गेला उडत मग लढायचं तरी कोणी
अन्यायाची चीड आहे पण व्यक्त करायची हिम्मतच नाही
अनुयायी राहिलाच नाही तुमचे भक्त झालो आम्ही
म्हणूनच आज हि साधू वरदान म्हणून तुम्हा हिणवतो आम्ही
देवाची हि गोडी नाही गेली अजून जो तो आज काल्पनिक देवांनाच पुजतो
चला बाबा तुम्हाला तुमचा भारत दाखवतो   ।। ४ ।।
देश आहे महान जगात भूमी बुद्धाच्या जन्माची
करून कहाणी आहे बाबा याच भारत देशाची
नको वाटते बाबा बस झाले नाही दाखवू शकत त्या रूढ परंपरेची
लाज वाटते बाबा दाखवायला हि कथा  त्या हीन संकृतीची
कामवासनेची मंदिरे बांधून त्याला पूजा करती इथे लिंगाची
नको बाबा परत फिरुया हि भूमी नाही राहिली बुद्धाची
महाराष्ट्र भूमी  विख्यात आहे  भूमी संतांची
दिवसा ढवळ्या  इथे इज्जत लुटली जाते तुझ्या लेकींची
संत म्हणून झाले फार आता भूमी आहे जंताची
चला परत फिरुनी वाट धरू चैत्य भूमीची
कोणाला सांगू बाबा मी नेहमी तुमच्या बरोबरच फिरतो
चला बाबा तुम्हाला तुमचा भारत दाखवतो   ।। ५ ।।







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र