महाभारताची गीता
महाभारत इतिहास :
आज उपलब्ध असलेला महाभारत हा ग्रंथ इ, सन २०० ते इ, सन ५०० यामध्ये लिहिला असल्याची माहिती भेटते महाभारत ग्रंथात एकूण ९६२२४ श्लोक आहेत पण त्याचे हे आजचे स्वरूप हे मुल स्वरूप नाही महाभारत ग्रंथ व १८ पुराने व्यास यांनी लिहिली शुद्र व स्त्रियांच्या कल्याणाकरिता ती लिहिली असे सांगितले जाते
ज्यावेळी व्यासांनी मूळ महाभारत लिहल त्यावेळी त्यांच्या श्लोकांची संख्या हि केवळ ८८०० इतकी होती आणि त्याचे नाव हे जय संहिता होते { उदाहरण पहा महाभारत आदिपर्व श्लोक ६२-२२ }
पुढे जनमेनजय राजाच्या महायज्ञाच्या वेळी वैश्यपायन ऋषींच्या संपादनाखाली जय संहीताचे वाचन करण्यात आले तेथे अनेक ऋषींनी आपल्या कथा रचून जय संहितेच्या नावावर कथन करण्यास सुरुवात केली आणि तेव्हा ८८०० च्या श्लोकांचे वाढती संख्या झाली २४००० साली आणि जय संहीताचे नाव बदलून त्याचे नाव भारत संहिता ठेवण्यात आले
वेळोवेळी यज्ञाच्या वेळी भारत संहिता चे वाचन होत गेले त्यात निरंतर अनेक ऋषींनी आपल्या श्लोकांची भर देत गेले आणी तिसर्यावेळी उसश्रवा सौति नावाच्या ऋषीच्या संपादनाखाली भारत संहिता च्या रचना कथन केल्या गेल्या आणि तेव्हा त्या श्लोकांची सांख्य हि २४००० वरून ९६२२४ इतकी वाढली आणि मग त्याचे नाव बदलून महाभारत करण्यात आले एकंदरीत काय तर व्यास यांनी लिहिलेला जय संहिता वाढवून इतका मोठा केला कि त्याचे अवाढव्य महाभारत ग्रंथात रुपांतर करण्यात आले यासाठी आपल्याला महाभारत आदिपर्व श्लोक १-३०० मध्ये पाहावे लागेल पहा काय आहे ते
'' महत्ताद भारवत्ताच्य महाभारत मुच्चते ।। माभारात आदिपर्व १-३००
आता आपण पहिले तर व्यासांच्या जय संहिता ग्रंथात अनेक ऋषींनी ऋचा घुसडल्या मुले मुल ग्रंथाच्या अकरा पटीने आपल्या रचना भरून महाभारत बनवला
आता गीतेचा एकही श्लोक कृष्णाने अर्जुनाला रणांगणावर सांगितलेला नाही हा गीता मागाहून महाभारतात घुसडली आहे प्रथम आपण सर्चव ग्रंथांचे निर्माण कधी झाले आहे ते पाहूया
वैदिक आर्य धर्माचे सर्व धर्मग्रंथ हे सिंधू संस्कृती नंतरचे
सिंधू संकृती इंद्राने नष्ट केली याचा पुरावा ऋग्वेद ऋचा ६ सर्ग २७ श्लोक ५ मध्ये सापडतो काही लोक म्हणतात कि पुराने हि संकृती नष्ट झाली पण प्रश्न असा उद्भवतो कि जर सिंधू संस्कृती पुराने नष्ट झाली तर ऋग्वेदात असे का लिहिले कि सिंधू संस्कृती इंद्राने नष्ट केली असा उल्लेख का यावा म्हणजे वेद म्हणजे निव्वळ गप्पा मारण्याचे साधन आहे का ? तसे असो वा नसो पण ऋग्वेदात सिंधू संस्कृती नष्ट केल्याचा उल्लेख येन म्हणजे , ऋग्वेद हा सिंधू संस्कृती नष्ट झाल्यावर लिहिण्यात आला आहे यात शंका नाही .
सन १९२२ साली सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली सिंधू संस्कृती मधील ७०० स्थळांचे उत्खनन करण्यात आले. त्यात लहान गाव याबरोबर मोहेंदजोडो व हडप्पा हि शहरे देखील उत्खननात सापडली. शास्त्री यांच्या अहवालानुसार व कार्बन च्या सहाय्याने सिंधू संस्कृती हि इसवी सन पूर्व २५०० ते इ. स. पुर्व ३००० मध्ये अस्तित्वात आली होती हे सिद्ध होते हा काळ एकूण ४५०० ते ५००० वर्षामधील आहे म्हणूनच ऋग्वेदाचा काळ हा इ. स. पूर्व १५०० म्हणजे ३५०० वर्षापूर्वीचा नाही हे आपल्याला मान्य करावे लागेल
यावरून वैदिक आर्य धर्मीय ऋग्वेदादि ग्रंथांचा काळ हा लाख वर्षाचा सांगतात याला कोणताच सत्य आधार नाही असा अर्थ होतो आता जय संहिता निर्मितीचा काल हा साधारण इ. स. २ ते ५ वे शतक असल्याचे गृहीत धरले आहे व्यासाला महाभारताचा लेखक मानले जाते . ज्यामध्ये गीतेचा देखील समावेश आहे वास्तविक गीता हा काही वेगळा ग्रंथ नाही हा महाभारताचा एक भाग आहे हे जो मागाहून त्यात घुसडला आहे म्हणजे महाभारत भीष्मपर्व मधील अध्याय २५ ते ४२ म्हणजे एकूण १८ अध्यायांचा भाग म्हणजे गीता होय गीता महाभारताच्या २५ व्या अध्यायापासून सुरु होते . तिचा २२ ,२३ व २४ या अध्यायांशी काहीच संबंध जुळत नाही . तसेच महाभारताच्या ४३ या अध्यायाचा गीतेच्या १८ व्या अध्यायाशी देखील काहीच संबंध जुळत नाही . डॉ सर्व पल्ली राधाकृष्णन हे भारताचे माजी राष्ट्रपती व गीतेचे गाढे अभ्यासक त्यांनी आपल्या भगवत गीता या ग्रंथातील लेखकाची भूमीका यामध्ये लिहतात मला गीतेचा रचयता कोण आहे य़ाचा पत्ताच लागत नाही . आता गीता हा स्वतंत्र ग्रंथ असल्याचा आभास निर्मान केला गेला तसेच गीता नायक कृष्णाचे इथे खूप महात्म वर्णन करण्यात आले आहे गीताकारणाने गीतेची निर्मिती वैदिक आर्य धर्माला आलेली ग्लानी करण्यासाठी करण्यात आले . आता धर्माला ग्लानी केव्हा येते जेव्हा इतर कोणत्या धर्माच्या अस्तित्वामुळे त्याच्या प्रसारामुले धर्माला ग्लानी आली आहे हे मान्य करावे लागते नाही तर ईश्वर प्रणीत धर्माला ग्लानी का यावी ईश्वराच्या व्यवस्थेत कुणी ढवळाढवळ केली म्हणून ग्लानी आली असावी असे अनेक प्रश्न निर्माण होतात याचा पुरावा खुद्द गीतेतच आहे श्लोक ३-३५ मध्ये हा आहे यात कृष्ण म्हणतो कि आपला धर्म कितीही गुणहीन असला तरी आपल्याच धर्माचे पालन करावे दुसर्याचा धर्म कितीही उत्तम असला तरी त्याचे पालन करू नये तो भयावह आहे दुसरे धर्म अस्तित्वात येण्याचे कारण वर्णव्यवस्था व त्याद्वारे विशिष्ट वर्गाला देण्यात येणारी अमानवीय वागणूक हेच होय . नाही तर कृष्णाला दुसऱ्याचा धर्म भयावह म्हण्याची पाळी आलीच नसती .
गीता म्हणजे चुकांचे भांडार
१ गीता महाभारताचा भाग आहे असे दाखविण्यात येत पण ते सत्य नाही कारण महाभारताचा गीताविरहित भाग शुद्ध संस्कृत शुद्ध व्याकरण व छंदांची रचना याला धरून आहे . पण गीतेत संधी समास प्रयोग आणि व्याकरण आणि छंद यांच्या अनेक चूकां आहेत . हीच तफावत गीता महाभारताचा भाग नाही ती कुण्या अर्धवट ज्ञानी लेखकाने घरी बसून लिहिली मग ती मागाहून महाभारतात घुसवली हे सत्य त्रिवार सत्य आहे .
२} महाभारतात व्याकरणाच्या चुका नसताना गीतेच्या भागात एवढ्या चुका का ? यावरुन अनेक प्रश्न उपस्थित होतात
अ } महाभारताचे सर्व ऋषी व्याकरण व छंदांचे ज्ञानी असताना गीतेचा भाग लिहिताना ते अज्ञानी का बनले.
ब } स्वतःला सर्वशक्तिमान व सर्व काही मीच असे म्हणणरे कृष्ण व्याकरण आणि छंदांच्या बाबतीत अज्ञानी होते काय ?
क } पुढे आपल्या गीतेत कुणी विद्वान एवढ्या चुका व्याकरण आणि छंदांच्या काढील याचे भविष्य ते जाणत नव्हते काय ?
ख } असे भविष्य जाणणारे कृष्ण असते तर त्यांना व्याकरण आणि छंदांच्या कोणत्या चुका आपल्या उपदेशातून होत आहेत ते कळले नसते काय ?
ग } रणांगणावर गीतेचा उपदेश लिहिण्यासाठी कोणाची नेमणूक करण्यात आली . रणांगणावर व्यास हजार नसल्यामुळे ते अन्य कुण्या वेगळ्या लेखकाने लिहिली असे का माणू नये ?
३} गीता जशी आहे तशीच्या मराठी भाषांतरानुसार सर्व प्रथम कृष्णाने १२ कोटी वर्षापूर्वी गीता सूर्याला सांगितली याचा अर्थ प्रथम कृष्ण मग सूर्य पैदा झाला म्हणून सूर्य देखील १२ कोटी वर्षाच्या आसपास निर्माण झाला असा अर्थ आहे . प येथे गीतकार याचे म्हणणे योग्य वाटत नाही कारण वैज्ञानिकांच्या मतानुसार रेडीओ कार्बन याच्या प्रयोगाने ४६० कोटी वर्षाच्या आसपास सूर्याची निर्मिती व ४५० कोटी वर्षाच्या आसपास पृथ्वीची निर्मिती झाल्याचे सांगण्यात येते
४} ज्याअर्थी रामायण व गीता या ग्रंथात तीन हजार वर्षापूर्वी होवून गेलेल्या चार्वाकाला व अडीच हजार वर्षापूर्वी होवून गेलेल्या महावीर व बुद्धाला शिव्या देण्यात आल्या आहेत त्या अर्थी गीता महाभारत हे ग्रंथ चार्व व बुद्धाच्या नंतर लिहिण्यात आले आहेत हे मान्य न करून कसे चालेल कोट्यावधी किंवा लाखो वर्षापूर्वी झाले म्हणणाऱ्या राम व कृष्णाच्या तोंडून चार्वाक व बुद्धाला शिव्या कश्या काय निघतील सत्य नेहमी सत्य असते ते मान्य करा अथवा नका करू कोणता फरक पडतो कारण सूर्याला तळहाताने झाकता येत नाही
५} एक लाख वर्षापूर्वी मानव दऱ्या खोऱ्यात राहत होता त्याची नग्न अवस्था संपली नव्हती राम कृष्ण तर लाखो करोडो वर्षापूर्वीचे असतील तर ते नग्न अवस्थेत असल्याचे उल्लेख सापडत नाहीत ते वस्त्र वापरत असल्याचा उल्लेख सबंधित ग्रंथात सापडतो
६} वैदिक आर्य धर्मीय ग्रंथ संस्कृत भेश्त व देवनागरी लिपीत आहेत पण वेदापुर्वी अस्तित्वात असलेल्या सिंधू संस्कृतीची भाषा संस्कृत व देवनागरी नव्हता तिची चित्रलिपी असून ती अजून शास्त्रज्ञाना वाचता आली नाही संस्कृत भाषा व देवनागरी भाषा हि इराणी आर्यांनी आपल्या सोबत भारतात आणली म्हणून वैदिक धर्माचे सर्व ग्रंथ त्यांनी कल्पिलेल्या देव देवितांच्या इत्यादी सर्व गोष्टी सिंधू संस्कृती नंतर च अस्तित्वात आले हे प्रामाणिकपणे कबूल करावे .
७ } गीतेत ३७५ वेळा कृष्णाच्या तोंडून स्वतःसाठी मी हे प्रथम पुरुषी सर्वनाम आले आहे पण पुढे असे काही ठिकाणी भगवान म्हणाले असे त्रितीय पुरुषी सर्वनामाचा उल्लेख का बर ? आता गम्मत अशी कि ३७५ वेळा ज्यांनी स्वतःसाठी मी म्हटले ते स्वतःसाठी भगवान कसे काय म्हणणार म्हणजे याचा अर्थ नक्की कि हि कथा कोणी तिसऱ्याच व्यक्तीने लिहालि असणार हे नक्की आणि हा कोणीतरी अर्धवट लेखक असावा कारण चुकांचा डोंगर उभा केला आहे या लेखकाने
****************** कृष्णाने गीता रणांगणावर सांगितलीच नाही **************************
१} असा का बर असेल कि कृष्णाने गीता रणांगणावर सांगितली नाही याची काही करणे आहेत ती पाहू या महाभारत भीष्म पर्व मध्ये अध्याय २५ ते अध्याय ४२ हे एकूण १८ अध्याय गीतेचे आहेत यात गीता ज्ञान सांगितले आहे प्रथम लक्षात घ्यावे कि गीतेचा पहिला अध्याय हा महाभारताचा २५ अध्याय आहे गीतेचा पहिला अध्याय हा ४६ श्लोकांचा आहे यातील एक श्लोक धृतराष्ट्र याच्या तोंडून २१ श्लोक हे धृतराष्ट्राचा वकील संजय याच्या तोंडून आणि २३ श्लोक हे अर्जुनाच्या तोंडून वदवून घेतले आहेत
२} धृतराष्ट्र हा आंधळा असल्याने त्याला कुरुक्षेत्रावर काय चालू आहे हे घरी बसून संजय हा त्याचा वकील अगदी लाइव टीव्ही सारखे सांगत असतो कारण त्याला व्यासाने दिव्य दृष्टी दिली होती
३} धृतराष्ट्राला युद्धभूमी वरील वर्णन सांगताना महाभारत अध्याय २५ मधील १९ श्लोकात संजय धृतराष्ट्राला सांगतो कि धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली पहा श्लोक " स घोषो धार्तराष्ट्रानां ह्रदयानि व्यदारयत । " गीता १- १९
धृताराष्ट्राचा वकील आपल्या राजाला धृतराष्ट्र हे कसे काय म्हणू शकेल त्याला आदर देवून म्हणाले कि नाही एक तर महाराज म्हणेल या राजाधीपती असे काही तरी सन्मानाने म्हणेल ना आत तो असे म्हणू शकतो कि महाराज आपल्या मुलांची हृदये विदीर्ण झाली आहेत आत धृतराष्ट्र हे तृतीय पुरुषी विशेषनाम न वापरता द्वितीय पुरुषी सर्वनाम वापरले यावरून हे वाक्य संजय ऐवजी तिसऱ्याच कोणी तरी लिहिले हे देखील सिद्ध करता येते याचा स्पष्ट अर्थ हे गीतेच्या रचनाकार याचे आहे
४} आता महाभारताच्या भीष्म पर्वातील अध्याय १४ श्लोक ७९ व ८० मध्ये धृतराष्ट संजय ला म्हणतो कि कौरव आणि पांडवांच्या सेनेमध्ये जे युद्ध झाले ते ज्याक्रमाने झाले ज्यां दिवशी झाले आनिओ जसे झाले ते सर्व मला सांग पहा श्लोक काय आहे तो
" तथातदभवद युद्ध कुरुपाण्डवसेनयोः ।। " महा. भी. १४-७९
" ऋमेण येन यश्चिश्चकाले यच्च यथाभवत ।। महा. भी . १४ -८०
या श्लोकात भविष्यकाली क्रियापदा ऐवजी भूतकाली क्रियापदे का वापरली कारण हा अध्याय युद्ध सुरु होण्या अगोदर चा आहे याचाच अर्थ ज्याने लिहिली तो व्याकरणात कच्चा होता हे नक्की कारण ज्याला भूतकाळ आणि भविष्यकाळ समजू शकले नाहीत
५ } यानंतर अध्याय १५ पासून ते अध्याय २१ पर्यंत कौरव पांडव यांच्या सैन्याचे वर्णन आहे २२ व्या अध्यायात कृष्ण अर्जुनाला आदेश देतात कि हे अर्जुना तू कौरवांचा संहार कर म्हणून पुढे जावून कृष्ण अर्जुनाला २३ व्या अध्यायात सांगतात कि अर्जुन तू दुर्गेची पार्थना कर जी तुला प्रश्न होवून वरदान देईल म्हणून आणि कृष्णाच्या आदेशाप्रमाणे अर्जुन दुर्गेची प्रार्थना करतो आणि दुर्गा त्याला वर देखील देते प्रसन्न होऊन तू युद्ध जिंकशील म्हनुन पहा श्लोक काय आहे तो
" स्वल्पनैव तू कालेन शत्रूञजेष्यसि पाण्डव ।
नरस्त्वमसि दुर्धर्षो नारायण सहायवान ॥ २३-१८
"अजयेस्त्वं रणे रौणामपि ब्रहभूतः स्वयम ।
इत्येवमुक्त्वा वरदा क्षणेनान्तर धीयत ॥ २३-१९
काय अर्थ आहे याचा पाहू या हे पांडव तू शत्रूला लवकर जिंकशील तू नर आहेस आणि नारायण तुझे सहाय्यक आहेत तुला इंद्रासमान योद्धा देखील हरवू शकणार नाही
६} असे वरदान देवीकडून प्राप्त होताच अर्जुनाने स्वतःला विजयी झाल्याचे अनुभवले तो आपल्या दिव्य रथावर आरूढ झाला आणि त्याने जोशात आपला देवदत्त शंख वाजवला कृष्णाने देखील आपला शंख वाजवला सर्व पांडव आणि कौरवांनी आपले शंख वाजवले नगारे वाजू लागले
७} शंख नगरे वाजले कि युद्ध सुरु होते हे सांगण्याची गरज काय प्रचीन् युद्धात नगारे वाजले कि युद्ध सुरु होते आता काय फायर म्हटले कि युद्ध सुरु होते इतकेच
८} भीष्मपर्व मध्ये अध्याय २४ मध्ये धृतराष्ट्र संजय यास विचारतो कि युद्धात पहिल्यांदा माझ्या पुत्रांनी प्रहार केला कि पांडवानी आणि पुढच्या श्लोकात संजय उत्तर देत आहेत संख वाजले आहेत नगरे वाजले आहेत हत्तींचे चीघाडणे सुरु झाले आहे सर्वत्र कल्लोळ मजल आहे आता हत्तीचे चीघाडणे आणि सर्वत्र कल्लोळ माजणे हे कशाचे लक्षण आहे सोप आहे युद्ध सुरु असल्याचे तरी पण गम्मत आहे आपण पाहू या काय आहे ती
*********************अर्जुनाला विषाद निर्माण होतो **********************************
१} पूर्वी युद्धांचा नियम असे कि सूर्योदय झाला कि युद्धास प्रारंभ आणि सूर्यास्त झाला कि युद्ध थांबले जात असे भीष्म पर्व २४ व्या अध्यायात युद्ध सूर झाले असताना २५ व्या अध्यायात अर्जुनाला विषाद निर्माण होतो आणि म्हणून अर्जुन कृष्णाला सांगतो आहे श्लोक २१ आणि २२ मध्ये कि माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये ने म्हणून
आता गंमत अशी आहे कि युद्ध चालू असताना अर्जुनासाठी युद्ध कसे काय थाबवातील आणि पांडव थांबले तरी कौरव का थांबतील आणि कोणाच्या आदेशाने हे युद्ध थांबले असेल हा प्रश्न पडतो आणि असे करायला हा काय मुलीबालींचा भातुकलीचा खेळ आहे का ?
२ } आजून एक गंमत ती अशी कि अर्जुन २२ व्या अध्यात दोन्ही सैन्यांच्या मध्ये होता पुढे २३ व्या अध्यायात दुर्गा त्यास वर देते तू शत्रूला लवकर जिंकशील म्हणून आणि २४ व्या अध्यायात युद्ध सुरु होते तरी देखील या अर्जुनाला महाभारताच्या २५ अध्यायात अर्जुन आपला रथ हा दोन्ही सैन्याच्या मध्ये नेण्याचे सांगतो हे कितपत शहाणपणाचे ठरते अर्जुनाला अक्कल होती कि नाही कि ज्याने लिहिली त्याला अक्कल नव्हती हे दिसते आता कोणी हि सांगेल हो कि युद्ध झाल्यवर दोन्ही सैन्यांचा मध्यभाग कसा शोधणार आणि युद्ध सुरु झाल्यावर दोन्ही सैन्य एकमेकांना भिडले होते मध्यभाग शोधला कसा हा प्रश्न निर्माण होतो आत हे कसे एकंदरीत धरून बांधून जुळवण्याचा प्रयत्न हि कथा काय कृष्णाने रणांगणावर सांगितली नाही हि कुण्या अर्धवट लेखकाने घरात लिहून काढली आहे पण ती अर्जुनाला कृष्णाने रणांगणावर सांगितली हे सिद्ध करण्याचा लोक प्रयत्न करतात
३} आता हा विषाद नेमका काय आहे हे पाहू या अर्जुन म्हणतो मी माझ्या नातेवाईक यांना कसे मारू म्हणून आता अर्जुन काय पहिल्यांदा आपल्या नातवाईक यांच्याशी लढाई करत होता का विराट राजाकडे असताना यांनी मोठा पराक्रम केला होता दुर्योधनाने यांचा अज्ञातवास याचे भांडेफोड करण्यासाठी विराट राजावर आक्रमण केले होते तेव्हा मोठ मोठे योद्धे होते तेव्हा अर्जुनाने पराक्रम केला होता कि म्हणजे हि काही अर्जुनाची पहिली वेळ नव्हती त्यामुळे त्याला असा प्रश्न पडणे म्हणजे जाणून बुजून अर्जुन किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी लेखकाने केलेली चूक आहे आणि त्यात त्याला हे समजले नाही कि आपण जे लिहतो आहे ते चुकीचे आहे पण त्याला हे सुद्धा माहित असावे कि वाचणारा वर्ग हा भोला आहे त्यामुळे काहीही लिहिले तरी हे सत्य मानतात आता पुढे अर्जुनाच्या मनात विजयाबाबत शंका निर्माण होते पण दुर्गेने आशीवार्द दिला असतना त्याला शंका का निर्माण व्हावी हा प्रश्न पडतो आणि कृष्ण त्याचा सारथी असताना का असे घडावे आता आपण थोडे कृष्णाकडे येवू या कृष्णाला गीता रणांगणावर सांगण्याच्या वेळी ऐकत कोण होता आणि ती लिहिण्यासाठी नेमाका कोण होता हे माहित नाही इथे संजय ला दिव्य दृष्टी व्यास देतो म्हणजे व्यास कृष्णापेक्षा सरस आहे कृष्णाने सुद्धा दिली असतो जर इतके प्रगत तंत्रज्ञान होते तर आज मंत्रज्ञान वापरून जे प्रदूषण होत आहे ते थांबवता आले असते असो
कृष्ण देव ईश्वर आपले विराट रूप अर्जुनाला दाखवले म्हणजे ते फक्त एकटा अर्जुन कसा काय पाहू शकतो बाजूला काय सैन्यलढत नव्हते का कोणत्या कोपर्यात होते का हे नाही तर सर्व रणांगणावर हि घटना घडते आणि ती फक्त अर्जुन आणि लेखक यालाच माहित होते यात किती मूर्ख बनवले आहे आणि कृष्ण देवहोता आता असे म्हटले पण कि कृष्ण काय व्याकरणात कच्चा होता का कि इतक्या चुका त्या गीतेत केल्या त्याने म्हणजे कृष्ण सुद्धा एक मानव होता त्याला जाणून बुजून देव केले हे नक्की कारण चुकतो तोच मानव आहे पुढे काय कृष्ण गीतेत जे तत्वज्ञान सांगतो ते वाचल्यावर गंमत वाटते रणांगणावर युद्ध कसे लढायचे याचे ज्ञान दिले पाहिजे कि मनुष्याने कसे वागले पाहिजे याचे याचाच अर्थ स्पष्ट आहे कि हे लिखाण कोणी तरी घरी बसून लिहिले आहे आणि लिहिणारा हा भाषा शास्त्राच्या दृष्टीने अर्धवट आहे हे नक्की कारण जर कृष्ण देव आहे तर त्याला माहित हवे कि भविष्यात कोणी तरी माझ्या तत्वज्ञानात चुका काढू शकतो गंमत अशी वाटते कि कृष्णाने गीता काय म्हणून रणांगणावर सांगितली घरी राजवाड्यात बसूनमस्त सांगता आली असती आनि इतके तत्वज्ञान अर्जुन ऐकत राहिला लढाई कोण त्याचा बाप करीत होता का ? काय लिहावे हे पण गीतेच्या रचनाकार याला समजले नाही बाकीचे काय गप्प बसले असते का कोणी तरी बाणाने याचे मस्तक उडवले असते नाही का ? तरी पण भोळी लोक विश्वास ठेवतात आता नेमका गीता काय आहे हे पहिले तर सर्व बुद्ध तत्वज्ञान बुद्धाने जे तत्वज्ञान सांगितले ते मिळून बांधून गीतेत भरले आणि गीता केली कर्म सिद्धांत बुद्धाने सांगितला पण नाव कृष्णाकडे नेतात बर या कृष्णाने गीता प्रथम कोणास सांगितली तर म्हणे सूर्यास सांगितली काय आहे ना कीव येते यांच्या मेंदूची आज कोणी म्हटले कि मी सूर्यास विज्ञान शिकवायला चाललो आहे लोक काय म्हणतील हो याचा विचार करा
आता हा कृष्ण अडाणी होता कि काय ते समजत नाही बघा काय म्हणतो तो तेजास्वीमध्ये कृष्ण मी आहे मरुदगनामध्ये मरीची मी आहे आणि नक्षत्रामध्ये चंद्र मी आहे श्लोक आहे का गीता दहावा अध्याय आणि श्लोक २१ वा आहे यात कृष्णला हे माहित नव्हते का नक्षत्र २७ त्यात चंद्र नाही चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही सूर्याच्या तेजाने चमकणारा तारा आहे तरी देखील त्याला नक्षत्र कृष्ण करतो म्हणजे कृष्णन खरेच देव होण्याच्या लायकीचा आहे का आजून पुढे पाहू या अध्याय १० मध्ये २२ व्या श्लोकात कृष्ण म्हणतो वेदामध्ये सामवेद मी आहे देवतांमध्ये राजा इंद्र मी आहे इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि प्राणी मात्रांमध्ये चेतन मी आहे आता यात कृष्ण त्याच्याच धर्माच्या बाबतीत अडाणी दिसतो वेदामध्ये मोठा वेद हा ऋग्वेद आहे ज्याच्यापासून बाकींच्या वेदाची निर्मिर्ती आहे तरी देखील कृष्ण सामवेद म्हणतो मी आहे पुढे देवतांमध्ये मध्ये म्हणतो राजा इंद्र मि आहे आता ऋग्वेद मध्ये इंद्र हा मानव असल्याचा पुरावा हे ऋग्वेद मध्ये रुचा २-३०-२ ,३-४८-२, ४-१८-४ व १०७३-१ मध्ये इंद्र मानवपुत्र असल्याचे सांगितले जाते म्हणजे कृष्ण इंद्राला देव करतो आता कृष्ण जर मन असेल तर शुद्र लोकांचे मन जे आहे ते कोण होते राक्षस का पुढे २३ व्या श्लोकात कृष्ण म्हणतो मी पर्वतामध्ये मेरु आहे आणि २४ व्या श्लोकात म्हणतो कि जलाशयामध्ये सागर आहे यात सुद्धा कृष्णाचे सामान्यज्ञान किती कच्चे होते ते दिसते मेरु पेक्षा हिमालय मोठा आहे आणि जलाशयात सागर नाही महासागर मोठे असतात हे माहित नसावे कृष्णाला कदाचित पुढे याच अध्यात ३६ व्या श्लोकात कृष्ण म्हणतो मी फसवणाऱ्या मध्ये द्यूत मी आहे आणि ३७ मध्ये म्हणतात कि मुनीमध्ये व्यास मी आहे आता कृष्ण जर द्यूत असतील तर फसवेगिरी करणारा कृष्ण आहे हे मानावे लागते न अर्थात या माणासाने ते केलेच आहे बऱ्याच गोपिकांना फसवून सबंध निर्माण केले होते त्यामुळे कदाचित इथे सत्य म्हटले असावे पण पुढे मुनीमध्ये व्यास का पसंद वाल्मिकि का नको झाले किमान वाल्मिकी ने चांगल तरी लिखाण केले काल्पनिक असो पण अश्लील नव्हते यांनी पुराने अश्लील लिहिले ते व्यास मुनीमध्ये याला महान वाटले असू शकतात भक्तांना आपल्यासारखे गुरु आवडतात
पुढे जावून कृष्ण काय म्हणतो कि आदी मध्य आणिअंत सजीवाचा मीच आहे हे श्लोक अध्याय १० मधील ३९ वा आहे आहे जर सर्व काही तूच आहेस मग बाकीचे अवतार कशाला घेतले होते तूच राहायचा शेवटपर्यंत आणि शेवटी कृष्ण सुद्धा मेला आहेच कि कृष्णा नंतर चा अवतार बुद्ध वैदिकांनी घेतला पण गंमत अशी झाली कि कृष्ण आत्मा परमात्मा ईश्वर मानणारा तर बुद्ध नेमका त्याच्या विरोधात म्हणून बुद्ध जवळ करू शकत नाहीत हे लोक कारण बुद्ध सर्वाना बुद्धी स्वातंत्र्य देतो
आता हाच कृष्ण अजून काय सांगतो कि प्रकृतीमध्ये जन्म घेवून सर्व योनी प्रकट होत असताना आणि बीज प्रदान करणारा पिता मीच आहे पित्याच्या बीजाने मातेच्या गर्भात मुल जीव धारण करते नरमादी शिवाय हे अशक्य आहे तरी देखील कृष्ण म्हणतो कि कि मी स्वतः बीज प्रदान करतो आता प्रश्न असा पडतो कि स्वतः बीज प्रदान करणारा पिता मुलींचे वस्त्रहरण का करतो भागवत मध्ये श्लोक १०-२२-१९ मध्ये कृष्ण म्हणतो हे सखिनो तुम्ही पूर्णपणे नग्न होवून व्रत पूर्ण करण्यासाठी या जळत शिरून तुम्ही जे स्नान कराल तर ते फार अनुचित झाले कारण तुमच्या या कृतीने जलदेवता वरुणाचा अपमान झाला म्हणून या अपराधाची क्षमा करवून घेण्यासाठी तुम्ही कपाळावर हात बांधून आणि वाकून प्रणाम करा आणि नंतरच आपले वस्त्र अंगावर घाला पहा श्लोक
" यूयंविविस्त्रा यदपोध्रुतव्रता व्यगाहतै तत्तदुदवहेलनम ।
वद्ध्वाजलिंमुर्ध्न्य पनुत्तयेधोवसनं प्रगृह्ययाम ।। भागवत १०-२२-१९
आता कृष्ण असा का सांगतो आणि शरद ऋतूमधील कृष्णाच्या रासलीला नुसत्या वाचल्या तरी लाजेने मन खजील होते हो रजनीकांत शास्त्री यांच्या उत्थान और पतन या पुस्तकात आपल्याला चांगली माहिती भेटते कि असा मथुरा वासी गोपिसोबत जी रासलीला केली त्याचे वर्णन आपल्याला वाचायला मिळेल
आता कृष्ण काय म्हणतो आहे कि श्रेष्ठ व्यक्ती जे जे करतात त्याचे अनुसरण सामान्य जन करतात आपल्या अनुसरणीय कृत्यांची ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार जग कार्य करते असे कृष्ण गीते मध्ये अध्याय ३ मध्ये २१ व्या श्लोकात सांगतो आणि म्हणून कि काय आज जे दरदिवशी बलात्कार होत आहेत ते त्याचेच परिणाम आहेत कि कृष्णाचा सर्व लोक आदर्श घेत आहेत असा कृष्ण आणि त्याचे भक्त धन्य हो धन्य
आता गीतेते कृष्ण अर्जुनास सांगतो कि अर्जुन परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहे हे सर्व जीव मायेने बनविलेल्या यंत्रावर आरूढ आहे आता जीवांचे भ्रमण निर्देशित करणे म्हणजे मनुष्य जी चांगलि वाईट कामे करतो ती तो स्वतः करीत नसून त्याच्या हृदयात असणारा परमेश्वर करीत असतो असा त्याचा अर्थ आहे मग जेव्हा न्यायालयात समजा एखाद्या गुन्हेगार सिद्ध होतो तेव्हा न्यायाधीश महोदय त्या व्यक्तीस दोषी न मानता त्याच्या हृदयात असणाऱ्या ईश्वराला दोषी मानले पाहिजे आणि आरोपीला निर्दोष सोडले पाहिजे कारण सर्व कर्ताकरविता तर ईश्वर आहे न पण काय आहे कायदा ईश्वराने नाही महामानवाने निर्माण केला आहे न त्यामुळे महामानवाचे वर्चस्व ईश्वरापेक्षा महान आहे नाही का
अजून के महत्वाचे म्हणजे गीता ज्या वेळी लिहिली तेव्हा इतर धर्म अस्तित्वात होते हे ठामपणे म्हणता येईल कारण गीता अध्याय ३ मध्ये श्लोक ३५ मध्ये कृष्ण म्हणतो ओपला धर्म कितीही गुणहीन असला तरी त्याचेच पालन करावे स्वधर्माचे पालन करताना मृत्यू जरी आला तरी ते श्रेयस्कर समजावे दुसर्याचा धर्म उत्तम असला तरीत्याचे पालन करू नये ते भयावह आहे याचा अर्थ आहे कि इतर धर्म आहेत आणि हे सिद्ध होते पन सोबत प्रश्न असा पडतो कि ज्याने सृष्टीची निर्मिती केली मानवाला घडवले तो धर्माच्या चौकटीत कसा काय अडकतो आणि अडकून मानवाला तसा संदेश का देतो स्वधर्माचे रक्षण करा त्याचेच पालन करा म्हणजे एक तर हे नक्की कि देव नावाचा प्राणी नाही म्हणून आणि देव असेल तर हा देव मूर्ख आहे असेच म्हणावे लागेल आता या श्लोकात धर्म हा शब्द चार वेळा आला आहे भागवत गीता सातवी आवृत्ती १९९५ मध्ये भक्ती वेदांत ट्रस्ट मुंबई या पुस्तकात पान नंबर १४८ वर धर्म ह्या शब्दाचा मराठी अर्थ कर्म सांगतात त्यामुळे नेमेके काय काय झाले ते पहा
इतरांच्या कर्माचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वताच्या नियत कर्माचे दोषयुक्त असेल तरीही पालन करणे अधिक श्रेयस्कर आहे स्वताचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसर्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण करणे भयावह आहे आता यात धर्माच्या कर्म वापरल्याने पूर्ण बदलले आहे रजनीकांत शास्त्री यांच्या हिंदुजाती का उत्थान और पतन या पुस्तकात असा अर्थ आहे याचा आपण धर्म गुणहीन भी हो तो अच्छा किंतु दुसरे का धर्म सुचारू रूप से संपादित होणे पर भी अच्छा नही अपने धर्म के पालन मे मर जाणा अच्छ है क्योंकी दुसरे धर्म खतरे से भरा है
आता किती गैरसमज होतो नाही यांनी धर्माला कर्म केले आणि सर्व चूक मांडून ठेवली अशी गीता हि कृष्ण हा सांगतो म्हणजे देव किती अडाणी होता याचे उदाहरण दाखवतो आहे
आता बघा गीता हि महाभारतात घुसडली आहे हे नकळत गीता मान्य करते ती अशी कि गीता मध्ये अध्याय १८ मधील श्लोक ७० मध्ये कृष्ण म्हणतो कि मी घोषित करतो कि जो कुणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करेल तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो
आता कोणता हि शहाणा म्हणून सहज म्हणू शकतो अलिखित संवादाचे अध्ययन कसे करायचे शक्य आहे का आणि ते हि रणांगणावर तिथे काय स्पीकर लावला होता का कृष्णाने याचा शोध लावायला पाहिजे एकंदरीत सारे काल्पनिक बाजूने केलेले लिखाण आता रणांगणावर कृष्णाला गीता सांगताना कोणी लेखक ठेवला होता का नि मधेच अर्जुनाला विषाद निर्माण होणार आहे मग कृष्ण उपदेश करणार आहे आणि त्यासाठी सार्वजन युद्ध थांबवून उपदेश ऐकणार आहेत असे म्हणणे केवळ मूर्खपणाचे ठरेल आता व्यसने लिहिले म्हटले तरी शक्य नाही कारण महाभारत याचे पहिले अध्याय हे व्याकरण चांगले आहे त्यामुळे चुकीचे लिखाण व्यासाने केले म्हणणे शक्य नाही जर केले म्हटले तर व्यासाने मागचे लिखाण करताना काय घेतली होती का ह्याचे संशोधन करावे लागेल अशी गीता कोणी दुसर्या महाशय यांनी लिहून महाभारतात टाकली आहे कारण कृष्ण म्हणतो कि अध्ययन करावे आता श्रवण करेल असे म्हटले असते तर त्यावेळी तिथे असणारा जो सैनिक आहे त्याला लागू पडेल पण तेव्हा हि शंका निर्माण होते तिथे काय माइक लावला होता का स्पीकर सहित असा अर्धवट लेखकाची किमया फक्त त्याने बुद्धाचे तत्व अर्धे गीतेत घातले आणि गीता तयार केली शेवटी सर्व गोष्टी समोर येतातच
आता बघा गीता म्हणजे अर्धे बौद्ध तत्वज्ञान आहे तोडूनमोडून मांडण्यात आले आहे फक्त कृष्णाला बुद्धाच्या पुढे नेण्याचा हा प्रयत्न आहे गीता कशी आहे हे संपूर्ण पाहिल्यावर असा हि प्रश्न पडतो ,कि एकीकडे रासलीला करणारा इतके चांगले तत्वज्ञान कसे काय सांगू शकतो आणि रणांगणावर का सांगतो पण लोकांना मुर्ख बनविण्याचा हा यांचा प्रयत्न तेव्हा लोक मूर्ख बनले कारण अज्ञान होते शिक्षण बंदी होती आता शिक्षणाने बहुजन शिकत आहे आणि सत्यातावादी बनत आहे पुढे महाभारत काय आणि गीता काय हे सारे थोतांड जगासमोर आधीच आले आहे अजून पूर्ण रूपाने येईल आणि हा बहुजन जागृत होईल एवढे मात्र नक्की
एक छोटासा प्रयत्न आहे कि नेमकी गीता काय आहे आणि कशी घुसडली आहे म्हणजे एकच कथा कशी वेगवेळ्या लोकांनी लिहिली ते पहा इतकेच सांगणे आहे
संदर्भ
हिंदुजाती का उत्थान और पतन : रजनीकांत शास्त्री
महाभारत
भागवत गीता जशी आहे तशी मराठी आवृत्ती १९९५
गीता :
रहस्य विश्वोत्पत्तिचे आणि ईश्वराचे : दिवाकर डांगे
गीता कि शव परीक्षा : सुरेंद्र अज्ञात
श्रीमदभागवत

टिप्पण्या