पोस्ट्स

जून २४, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बौद्ध स्मारकांचे जतन व्हावे बौद्ध ओळख निर्माण व्हावी

जय भीम नमो बुध्दाय भारताचा प्राचीन वारसा  जतन करण्यासाठी प्रयत्न करताना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते मुख्य अडचण आहे लोकांची अनास्था लोकांची लेणी विषयक असणारी अज्ञान आणि दुर्लक्षपणा सध्या खूप भयानक मोड घेत आहे आजवर आम्हाला पुरोगामी  या नावाखाली प्रबोधनाचे  गाजर हातात देऊन स्वधर्माची सुधारणा करून घेतली जात आहे. आणि आम्ही त्याला बळी पडत आहोत. पडलो आहे त्यामुळे आज गरज आहे ती स्वतःची ओळख निर्माण करण्याची . मनुवादी बुद्धीच्या लोकांनी बौद्ध समाजाला त्यांची ओळख आजवर मिळवून दिलेली नाही . आणि यामुळे बौद्धांची ओळख काय  आणि कशी निर्माण  केली जाईल यावर आजवर काम करता आलेलं नाही . ते यासाठी कि मनुवादी लोकांचा धर्माचे जे नुकसान होत होते ते कुठे तरी थांबवले पाहिजे आणि यासाठी या देशात   एक चळवळ उभी केली ती आहे पुरोगामी जिला बाबासाहेबांचे लेबल लावले आणि बाबासाहेब हे पुरोगामी चळवळीचे हिरो केले जेणें करून बाबासाहेबांची जी धर्मांतराची चळवळ होती तिला थांबवली  त्यामुळे बाबासाहेबांचा महत्वाचा विषय इथल्या  बौद्धांना  समजला नाही आणि इथले बौद्ध पुरोगामी चळवळी...