जाणता राजा
छत्रपती हे नाव सार्या जगामधी हे गाजे सांगा ओरडून उभ्या जगाला शिवराय आमचे राजे ना कोणाचे भय आम्हाला ना कोणी इथे साजे शिवरायांच्या कार्तुत्वापुढे हिमालयही लाजे महासागरही छोटा वाटे असा छत्रपती माझा जगात गाजावाजा शिवराय जाणता राजा ।। १ ।। स्वराज्याची संकल्पना जिजाऊ मासाहेबांची मेढ रोवली शिवरायांनी रयतेच्या स्वराज्याची बांधले तोरण स्वराज्याचे हि साथ मावळ्यांची जातिभेदाला गाडून मातीत नाती जोडली मनाची महासागरही छोटा वाटे असा छत्रपती माझा जगात गाजावाजा शिवराय जाणता राजा ।। 2 ।। रयतेच्या हितासाठी अखंड झिजला मानवतेचा कल्पतरू या भारतात रुजला स्वाभिमानी जिने जगती मराठे हे आजला प्रणाम करती दुनिया सारी शिवराया तुजला महासागरही छोटा वाटे असा छत्रपती माझा जगात गाजावाजा शिवराय जाणता राजा ।। 3 ।। करुनी छातीचा कोठ रक्षिला समाज बहुजनांचा रयतेसाठी लढणारा राजा तू दिनांचा स्वाभिमानी जिने आपले लढाऊ बाणा तुमचा हाती घेवूनी तलवार केला संहार त्या विकृती सैतानांचा महासागरही छोटा वाटे असा छत्रपती माझा जगात गाजावाजा शिवराय जा...