कथा आमच्या गुलामीची
बहुजन हिताय बहुजन सुखाय घोषवाक्य आमचे
आम्हीच झालो गुलाम आम्हाला काय महत्व तयाचे
ज्यांनी लाथाडले आम्हाला तयाशी नाते जुळवायचे
नको हि गुलामी बंधुनो आता तुम्हीच ठरवायचे ।। धृ ।।
स्वप्न आमचे स्वप्न राहिले असते
कमरेचा झाडू गळ्यात गाडगेच असते
गावाच्या बाहेरच होतो आता आम्हाला बाहेर फेकले असते
तेव्हा जोहर करायचे आता चित्र वेगळेच असते
बरे झाले बाबा तुम्ही जन्मले म्हणून नाही तर काय झाले असते या समाजाचे
नको हि गुलामी बंधुनो आता तुम्हीच ठरवायचे ।। १ ।।
ज्यांचे होते जीवन यातानाचा सागर
त्याला जतिनिर्मित नद्यांची भर
करून गुलाम मानवाला जाती जातीचा डोंगर
म्हणूनच बाबासाहेबांनी निवडला बुद्ध महासागर
आव्हान केल बाबांनी अश्या समाजाला सार्थक करण्या जीवन तयाचे
नको हि गुलामी बंधुनो आता तुम्हीच ठरवायचे ।। २।।
मनुस्मृतीने घातले शुद्राच्या जन्माला
गीतेत जन्म आमचा पाप योनीत झाला
पुराने घालती अज्ञानी म्हणून जन्माला
संविधान मात्र घालते जन्माला मानव म्हणून आम्हाला
मग कशाला त्या धर्माचे अजून गोडवे गायाचे
नको हि गुलामी बंधुनो आता तुम्हीच ठरवायचे ।। ३ ।।
होत होता विटाळ आमच्या सावलीचा
पाणी हि बाटायचे स्पर्श होता आमचा
आमच्या थुंकीनेही विटाळ व्हायचा
मार्गच नव्हता आम्हाला मानाने जगण्याचा
उपकार बा भीमा तुझ्या त्या लेखणीचे
म्हणूनच रवि लिहतो बोल असे विद्रोहाचे ।। ४ ।।

टिप्पण्या