गद्दार लोकांचा संघ
बाबा तुझ्या पिलांना उरलाच नाही स्वाभिमान
कसा वाटेल त्यांना तुझ्या कर्तुत्वाचा अभिमान
झाले गद्दार तुझी लेकरे नाही राहिला त्यांचा सन्मान
विकला दलालांच्या बाजारात बाबा तुझा बहुमान
नाही राहिली जान त्यांना तुझ्या उपकाराची
गद्दार झाली लेकरे तुझी अशी कथा त्यांच्या गद्दारीची ।। धृ ।।
धम्म बुद्धाचा दिला आम्हाला होण्या बुद्धाचे अनुयायी
समजलाच नाही बुद्ध आम्हाला अजून आम्ही हिंदुच्या ठायी
जग चालले बुद्धासोबत आम्ही चाललो जुन्या रूढीनिशी
कधी समजणार आम्हाला बुद्ध कधी हिनर एकरूप त्याच्याशी
न उमगेना न समजेना महती बुद्ध ज्ञानाची
गद्दार झाली लेकरे तुझी अशी कथा त्यांच्या गद्दारीची ।। १ ।।
धम्म घेतला ५६ झाली नागांच्या नागपुरात
झालो आम्ही अजरामर त्या बुद्ध इतिहासात
बाबा तुम्ही जगाला असता अजून या भारतवर्षात
नक्कीच बुद्ध समजला असता आज या बहुजनात
आणि आज सारा भारत गात असता वाणी त्या बुद्धाची
गद्दार झाली लेकरे तुझी अशी कथा त्यांच्या गद्दारीची ।। २ ।।
गद्दार लोकांची कथा आहे बहु न्यारी
घराघरात यांच्या गणपतीची स्वारी
करती आषाढ कार्तिकची पंढरीची वारी
जावून शिर्डीला साईबाबाला वंदन करी
यांच्या नीच कृतीची कथा तरी कशी सांगायची
गद्दार झाली लेकरे तुझी अशी कथा त्यांच्या गद्दारीची ।। ३ ।।
अशी बा भीमाची लेकरे झाली बेईमान बाबा तुला
तुझ्या विचारांचा यांनी सुकवला मळा
बुद्धाच्या ज्ञाना कडे आता तरी वळा
नाही तर परत जाने आहे तुम्हा त्या रसातला
आज जगत आहात अभिमानाने हि पुण्याई बा भीमाची
गद्दार झाली लेकरे तुझी अशी कथा त्यांच्या गद्दारीची ।। ४ ।।
बुद्धाशिवाय पर्याय नाही तुमच्या जीवनाला
आत्मसात करा रे त्या बुद्ध तत्वज्ञानाला
जाणा बाबासाहेबांच्या कृतीला
म्हणूनच बौद्ध केल बाबांनी तुम्हला आम्हाला
आजही करिता का गुलामी अश्या काल्पनिक धर्माची
गद्दार झाली लेकरे तुझी अशी कथा त्यांच्या गद्दारीची ।। ५ ।।
टिप्पण्या