आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : १

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतावर प्रभाव भाग : 1
सम्यक दृष्टी : म्हणजे मध्यम दृष्टिकोनातून विचार करणे मध्यम मार्गीय ज्ञानाला अथवा विचार करण्याच्या पद्धतीला सम्यक दृष्टी म्हणतात . यात कुशल अकुशल म्हणजे भल्या वाईट गोष्टीचे ज्ञान अपेक्षित आहे. हिंसा,चिरो,व्यभिचार किंवा मिथ्याचाराचा समावेश अकुशल कायिक कर्मात होतो.असत्य,चुगली,कटू वा कठोर वचन आणि व्यर्थ बडबड हे वाचिक अकुशल काम होत. अविद्या,लोभ, व्यापाद, प्रतिहिंसा आणि मिथ्यादृष्टी धारणा हि मानसिक अकुशल कर्मे होत. ह्या अकुशल कर्मांच्या विरुद्ध कृतीला कुशल हि संज्ञा होय.
सम्यक दृष्टीचा मराठी संतावर झालेला परिणाम : कुशल याला संतांनी योग्य वा शुभ आणि अकुशल याला अयोग्य वा अशुभ अश्या संज्ञा वापरल्या आहेत आणि यांच्या आचारांच्या मूळ कारणांना विचारपूर्वक ओळखणे हाच अर्थ सम्यक दृष्टीत अभिप्रेत आहे . हि सम्यक दृष्टी केवळ कायिक आचारापुरातीच सीमित नसून तिचा व्याप मानसिक आणि वाचिक आचारणापर्यंत पसरला आहे . बुद्धाच्या मूलगामी विचारांची गरुडझेप जीवनाच्या प्रत्येक अंगाशी संबंधित असून काया,वाचा, आणि मने करून सदाचाराची तीत अपेक्षा आहे . म्हणून सम्यक दृष्टीमध्ये कायिक कुशल कर्मात हिंसा अहिंसा ह्यांचा निकट संबंध येतो .बुद्धाची हिंसेबद्दल केवळ रक्त पाताची कल्पना नसून त्यात मानसिक आणि वाचिक हिंसा सुद्धा तेवढीच गर्हाणिय वाटते.
तुकोबांनी हिंसा अहिंसेच्या बाबत स्वतःची सम्यक दृष्टी पुढील गाथेत स्पष्ट दिसून येते . ते म्हणतात, 'आम्ही सज्जनांसाठी काहीही सहन करू किंवा त्याग करू , पण दुष्ट असला तर मग वज्रा एवढे कठीण होऊन त्याचा समाचार घेऊ. माया करायची असल्यास आई-बापापेक्षा अधिक करू, पण घात करायचा झाल्यास शत्रूलाही मागे टाकू. आमच्या ठिकाणी अमृताची गोडी आणि विषाचे कटूपण सारखेच आहे.
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास | कठीण वज्रासही भेदू ऐसें||
मेले जित असो निजोनिया जागे | जो जो जे जे मागेल ते रे देऊ||
भले तरी देऊ काशेची लंगोटी | नाठ्यालाचे काठी देऊ माथा ||
मायबापाहून बहू मायवंत| करू घातपात शत्रूहुनी ||
अमृत ते काय गोड आम्हापुढे | विष ते बापुडे कडू किती ||
सज्जनांचे सरंक्षण आणि दुष्टांचे निर्दालन कंटकांचे ह्या तुकोबांना दया किंवा अहिंसेच्या दोन बाजू वाटतात .
दया तिचे नाव भूतांचे पालन | आणि क निर्दालन कंटकांचे || {264 }
हा कठोर दृष्टिकोन। बाळगून हि तुकोबा तहानलेल्या गाई व पशूंना पाणी पाजायला सांगतात .म्हणजेच त्यांना पशुहत्या अमान्य आहे . त्यांचे मते पशूंसहित सर्वामध्ये जीवात्मा असून पशुहत्या करणारा नरकात महादुःख भोगतो
याच भूमिकेतून तुकोबांना परपीडक दावेदार वाटतो त्यासाठीच ते दुर्जनांचा मान | सुखे करावा खंडन | असा आदेश देऊन नखे काढावी तशी गुंडांना लाथा हाणून वाट शुद्ध करायला सांगतात
 तसेच मानसिक सम्यक दृष्टी प्राप्त व्हावी म्हणून ते म्हणतात प्रथम आशा, तृष्णा खणून काढून मगच गोसावी व्हावे-'
आशा हे समूळ खनोनी काढावी | तेव्हाची गोसावी व्हावे तेणे || {1426 }
आणि वाचिक सम्यक दृष्टीच्या सत्य प्रतिपादन महत्वाचे आहे. म्हणून तुकोबा म्हणतात
तुका म्हणे येथे खऱ्याचा विकरा { तू.अ. गाथा 834 }
सत्यवादी करी संसार सकळ | अलिप्त कमळ जळी जैसे || 1025
अश्या प्रकारे संत तुकोबाराय यांच्यावर बुद्धाच्या सम्यक दृष्टीचा प्रभाव होता हे स्पष्ट। दिसते
 साभार मराठी संत साहित्यावर बौद्ध धम्माचा प्रभाव। डॉ भाऊ लोखंडे
वास्तविक मराठी च नव्हे सर्वच संतावर बुडाच्या विचारांचा प्रभाव आहे हे नाकारता येत नाही
बुद्धाला विष्णूचा अवतार करून यांनी केलेली सर्वात मोठी चूक होती आणि एक चांगली गोष्ट म्हणजे सर्वच संतांना बुद्ध समजून घेता आले आणि त्यातूनच संतांमध्ये समाज सुधारणेची चळवळ रुजली बुद्धमुळेच संत हे मानवतावादी होण्याकडे झुकले
चला पुढच्या वेळेस दुसऱ्या मार्गाचा कसा प्रभाव पडला आहे ते पाहू या ...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र