आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतावर प्रभाव भाग : २

सम्यक संकल्प : योग्य निर्णय किंवा निश्चय म्हणजे सम्यक संकल्प होय. साधकाला साधनेसाठी सम्यक संकल्पाची आवश्यकता असते. सदाचाराचा साधनेला उपयोगी ठरणाऱ्या निर्णयाचा संकल्प करणे जरूर ठरते . अद्रोह, अहिंसा,निष्कामता आणि तृष्णा वा वासनानाश तथा त्यागाचा दृढ  संकल्प यात अभिप्रेत असतो. अविद्याश्रीत संस्कारांना निर्मळ करण्यास ज्ञानमय संकल्प करणे म्हणजेच  सम्यक संकल्प होय. 
मराठी संतांवर सम्यक संकल्पाचा प्रभाव जाणवतो.  खास करून तुकाराम महाराज बुद्धाच्या जास्तच जवळ गेलेले वाटत आहेत.  कारण त्यांच्याच साहित्यात बुद्ध तत्वांचा वापर जास्त आहे बुद्ध शिकवणीला आपलेसे केलेलं पाहायला मिळते. तुकाराम महाराज म्हणतात , स्वतः आपल्या हातानी संसाराला आग लावून बाहेर पडल्यावर मागे वळून पाहू नये . जसा दिपावर जळणारा पतंग मागे -पुढे पाहत नाही . 
सवंसारा आगी लावुलेनी हाते । लावूनी मागे पहात नाही ।। 
तुका म्हणे व्हावे तयापरी धीट । पतंग हा नीट दिपावरी ।। ३४१४
संकल्पपूर्वक सर्व लौकिकाची लाज बाळगून अन्नवस्त्राची लालसा लागल्यास देव उपेक्षित नाही . 
सांडूनियां सर्व लौकिकाची लाज । आळवा यदुराज भक्तिभावे ।।
पाहुनिया झाडे बरबडुनी पाला । खाउनी विठ्ठल आळवावे ।।
तुका म्हणे ऐसे मांडिल्या निर्वाण । तया नारायण  उपेक्षित ।। सा श्री तू गा १७२९
यात हि साधकाच्या मनाचा वज्रानिर्धार किंवा वज्रसंकल्प दृग्गोचर होतो. तुकोबा पुढे म्हणतात, जे मुक्त होऊन पुढे गेलेत्याचा मागोवा घेत आपण पुढे जाऊ म्हणजे जन्म मंरणाच्या खेपा चुकतील . 
पुढे गेले त्यांचा शोधात मारग । चला जाऊ माग घेत आम्ही 
वंदू चरणरज सेवू उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनिया ।।
जन्म मरणाच्या खुंटतील खेप । होईल हा सोपा सिध्दपंथ ।। तू. व. १३
थोडक्यात संतांवर पडलेला हा प्रभाव आपण पाहू शकतो 
सांगण्याचा हेतू हाच आहे कि बुद्धाला विष्णूचा अवतार केल्याने इथल्या संतांनी देखील बुद्ध विष्णूचा अवतार समजून त्याची शिकवण आत्मसात करायचा  प्रयत्न केला परंतु परिणाम मात्र वेगळाच झालेला आपणास जाणवतो   देवाला मानणारे संत  लोकसुधारक चळवळ हिच्याकडे वळले ते याच बुद्धाच्या शिकवणीमुळे हे सत्य नाकारता येत नाही प्रत्येक संतांच्या  शिकवणीत बुद्ध जाणवतो . 
पुढील भागात अजून एक मार्गाचे  विश्लेषण करू या .....  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र