पोस्ट्स

डिसेंबर ८, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इतिहास बदलवणारा महामानव

रविवार ,२ डिसेंबरला नानकचंद रत्तू सकाळी नेहमीप्रमाणे सव्वासातला आले, तेव्हा बाबासाहेब बिछान्यात पडून राहिले होते. त्याला पाहताच बाबासाहेब म्हणाले, " आलास वेळेवर ! आज आपल्याला खूप काम करायचे आहे." ते बिछान्यातून उठले, चहा घेतला व 'कार्ल मार्क्सचे ' 'दास कॅपिटल ' या ग्रंथातील मजकूर परत डोळ्यांखालून घालून ' buddha & his dhamma ' या ग्रंथाच्या लेखनासाठी बसले. आणि नानकचंद ला टाईप करायला देत होते. हे काम संध्याकाळपर्यंत चालले .दिनांक ४ डिसेंबर ला बाबासाहेब सुमारे ८-४५ ला उठले . सकाळी सुमारे ११ वाजता बाबासाहेबांना भेटायला जैन धर्माचे काही लोक आले. त्यांनी याबाबतीत विचारविनिमय करावा अशी विनंती केली.बाबासाहेब त्यांना म्हणाले, ' यासंबंधी आपण उद्या रात्री ८-३० च्या नंतर चर्चा करू . दिनांक ५ डिसेंबर १९५६ ला नानकचंद ऑफिस सुटल्याबरोबर बाबासाहेबांच्या बंगल्यावर आले. तसा बाबासाहेबांचा नोकर सुदाम याने त्यांना फोन केला होता. बाबासाहेबांना झोप लागत नव्हती . ते अस्वस्थ होते. अशा परिस्थितीतही बाबासाहेब मधूनमधून 'buddha & his dhamma ' या ग्