आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ६
सम्यक व्यायाम : सम्यक व्यायाम म्हणजे बाह्य शरीराचा व्यायाम नाही . कसरत करून कमावलेली शरीयष्टी म्हणजे सम्यक व्यायाम नाही. सम्यक व्यायाम म्हणजे ज्ञानयुक्त प्रयत्न अथवा अभ्यास करणे. निर्वाण व सत्यप्राप्तीच्या कार्यात अथवा अभ्यास अत्यावधक मानून बुद्धाने उद्योग किंवा प्रयत्नपूर्वक अभ्यासाला अनन्य साधारण महत्व दिले आहे. मनात नको ते वाईट विचार येऊ न देणे आणि मनातील चांगले विचार बाहेर जाऊ न देणे ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. कारण अभ्यासाला काहीही अश्यक्य किंवा अलभ्य नाही . ह्या गोष्टीचा संतांनी आपल्या उपदेशात व आपल्या साहित्यात उल्लेख केला पण तो मात्र भक्तीच्या मार्गासाठी वापरला पाहू या संतांचा याबाबत काय अर्थ आहे तो संत एक सारखे ईश्वराचा धावा करतात आणि आपल्या मनात ईश्वराशिवाय दुसरे विचार येऊ नयेत ह्यासाठी करुणा भक्तात . ह्यासाठी त्यांनी प्रयत्न किंवा अभ्यासाची महिती गायली आहे . आणि ह्याला बौद्ध धम्मात सम्यक प्रधान असे नाव आहे. न मिळो खाया न वाढो संतान । परी हा नारायण कृपा करो ।। विटंबो शरीर येता का विपत्ती । परी राहो चित्ती नारायण ।। क्षणक्...