पोस्ट्स

मे ८, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चळवळ

जय भीम तुमची चळवळ एका सिनेमामुळे पाच वर्षे मागे जात असेल तर तुमची चळवळ हि केवळ वरकरणी आहे हे सिद्ध होते बहुजन संज्ञा लोकांनी जातिधर्मात बांधून काय सध्या केले हे अजून न  कळालेल सत्य आहे बुद्धाने तरी हि संज्ञा जाती धर्मात पाहून सांगितलेली नाही इतके नक्की  आम्ही केवळ  कोणी जातीबाबत बोलतो  आहे ते हि काही तीन चार  लोक बोलत असतात पण या तीन चार लोकांचे बोलणे म्हणजे सर्व समाजाचे बोल तसेच आहेत असे समजून वागणाऱ्या लोकांचा बुद्धीचा व्यास किती मोठा आहे हे कळते अथांग अश्या बुद्ध महासागरात जाती धर्म गौण आहेत सांगण्याचे तात्पर्य हेच आहे कि मानवी जीवनाच्या मूल्यांचे जतन करण्याची आपली तयारी असणे आवश्यक आहे  आता चळवळीच्या काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करायला घेवू १} भारताच्या इतिहासात चळवळीचे खरे स्वरूप आले ते बुद्धाच्या  क्रांतीमुळे इथून खरी चळवळ व्यापक होवून  यशस्वी हि झाली आहे अगदी  जवळपास इसवी सणाच्या सहाव्या शतकापर्यंत ती यशस्वी  होती २} इथे चळवळ कशी संपवली  जाते याचा विचार केला तर शत्रू कधी हि समोरासमोर येवून उघडपणे चळवळीला विरोध करून...