भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च त्याग करणार्या किंवा भारताची किर्ती जगभरात वृद्धीगंत करणार्या व्यक्तीस भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देवून गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. आतापर्यंत समाज सेवा, कला, साहित्य, विज्ञान व तंत्रज्ञान, कारखानदारी ही क्षेत्रे व सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला गेला आहे. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरांत ‘भारतरत्न’ देण्याची सोय उपलब्ध करून घेण्यात आली. त्यानंतर १२ जणांना मरणोपरांत भारतरत्न दिले गेलेले आहे. आत्तापर्यंत ४१ जणांना ‘हा अत्युच्च सन्मानाचा भारतरत्न पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत. सुरुवातीला हा पुरस्कार म्हणजे ३५ मिमी व्यासाचे एक वर्तुळाकार सुवर्णपदक असावे अशी कल्पना होती. त्यावर एका बाजूवर मधोमध सूर्याची प्रतीमा, त्याच्या वरच्या बाजूला हिंदी भाषेत ‘भारतरत्न’ असे लिहिलेले असे व सूर्याच्या खालील बाजूस एक फुलांची माळ असावी. तसेच पदकाच्या दुसऱ्या बाजूस संबंधित राज्याचे ...
टिप्पण्या