कोरेगावचा विजय स्तंभ आणि सांचीचा बौद्ध स्तूप एक अकथित इतिहास




भीमा कोरेगाव  इतिहासातील महत्वाचा पार्ट असून याच बरोबर एक महत्वाचा इतिहास जो जगापुढे आजवर आला नाही त्याचे महत्वाचे कारण आम्हाला हि त्याचा इतिहास माहिती नाही '
मध्यप्रदेशात असणारे हे सांची स्तूप आणि महाराष्ट्रात असणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ काय कनेक्शन आहे तर भिमाकोरेगाव च्या लढाई मध्ये ब्रिटीश सैनिकाच्या फौजेत असणारी महार सैन्याची तुकडी यात मराठा सैन्याची हि तुकडी आहेत एक लक्षात घ्या केवळ महार च नाही तर मराठा देखील पेशवाई च्या विरोधात उभा होता ब्रिटीशांच्या बाजूने ज्यांनी छत्रपतींचे राज्य लयास नेले अश्या पेशव्यांच्या विरोधात उभे होते महार मराठा
म्हणून च हा विजय स्तंभ केवळ महार सैन्यांचा च नसून मराठा सैन्यांचा देखील आहे आणि  त्यात महत्वाची बाब अशी कि सर्वांची नावे हि नाक नावने च आहेत त्यामुळे त्यातले महार मराठा कोण हे कोणालाच ओळखता आजवर आलेलेल नाहीत
ह्याच कोरेगाव ची लढाई १८१७ च्या शेवटच्या रात्री अवघ्या ७५० सैन्याच्या साथीने २८ हजार सैन्यांशी झाली  यात ५०० महार मराठा सैनिक होते त्यांनी जीवाची बाजी लावत विजय संपादन केला काहीनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांच्या नावाने हा विजय स्तंभ आहे पण त्याच बरोबर क्रांती  कारक घटना हि आहे कि  या कोरेगाव च्या सैनिकांच्या लढाईत कुमक म्हणून पाठवली असणरी एक सैन्याची तुकडी ग्वाल्हेर च्या छावणीत मेजर हेनरी टेलर याच्या अधिपत्याखाली असणारी सैनिकाची पलटण पुन्हा ग्वाल्हेर कडे पाठवण्यात आली तेव्हा हि पलटण भोपाळपासून त्गोड्या अंतरावर असणारे भिलसा या ठिकाणी थांबली होती त्यावेळी त्या पलटण मधील अधिकारी शिकारीसाठी दुपारचे जंगलात गेले असताना मुख्य मार्गावर बाजूला शेजारी झाडा झुडपांनी वेढलेल्या टेकडीवर गेले असताना त्यांच्या भोवती अनेक कृत्रिम छोट्या छोट्या टेकड्या नजरेस आल्या त्यातील काही टेकड्या ह्या गोलाकार असून सुंदर आहेत असे जाणवले
त्यामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्या पैकी कॅप्टन एडवर्ड फेल आणि लेफ्टनंट जॉन बागनोल्ड आणि निशाणजी जॉर्ज रोबुक यांनी या ठिकाणी उत्खनन झाले पाहिजे यासाठी पुन्हा  या ठिकाणी येण्याचा निर्णय घेतला
दोन कनिष्ट अधिकाऱ्यांनी या अवशेषांचे  रेखाचित्र काढले आणि एडवर्ड फेल यानि एक अहवाल तयार केला तो कलकत्ता जर्नल च्या जुलै १८१९ च्या अंकात  प्रकाशित झाला
या अहवालात त्यांनी लिहिले होते  कि एका अलग पडलेल्या टेकडीवर सपाट माथ्यावर अर्धगोल घुमटकार आकारात पडलेले दगडात बांधलेले टप्या टप्प्याने बांधलेले सिमेंट चे अजिबात वापर न करता पूर्ण  ठोस असे स्मारक बांधलेले आहे १२ फुट उंच आणि ७ फुट रुंद आस्व वर्तुळाकार ५५४ फुट परीघ असलेले स्मारक बांधलेले आहे
या स्तुपाभोवतो भग्नावस्थेत पडलेले तोरणे आणि कठड्यावरील नक्षीचे हि वर्णन  त्यांनी अहवालात केले होते शिल्पाचा अर्थ न लागल्याने एका दीर्घ कालीन प्राचीन इतिहासाला उलगडा करणऱ्या स्थळ जैनांचे कि बौद्धांचे याबाबत निश्चिती नव्हती कलकत्त्यातील रॉयल आशीयाटिक सोसायटीच्या एच एच विल्सन यांनी दुर्लक्ष केल होते नंतर च्या काळात जॉन प्रिन्सेप अलेक्झांडर कनिघहम आणि जॉन मार्शल यांनी लक्ष घालून सांचीचा शोध लावला सांचीचे संरक्षण आणि पुर्नबांधणी करण्यासाठी साधनसामुग्री नेण्यासाठी एक छोटी रेल्वे लाईन खालच्या मोठ्या लोहमार्गावरून टाकण्यात आली सांची वरील जातक कथा बुद्ध जीवन कथा दान दात्यांचे शिलालेख आणि तर सामग्री वरून सम्राट अशोकाच्या काळापासून इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून ते गुप्तोतर काळापर्यंत म्हणेज इसवी सनाच्या पाचव्या शतकापर्यंत आहे आणि बौद्ध धम्माचा इतिहासावर एक प्रकाश पडला
पेशवाई बुडवणाऱ्या कोरेगावातील लढाई मधील हे यश हे विषमतेचे राजवट नष्ट करणे हे होते आणि दुसरी यश सांचीच्या शोधातून उलघडत जाणारा बौद्ध धम्माचा समतावादी परंपरेचा शोध हे होते
बाबासाहेब यांच्या अभ्यासात हे आले नसावे  का तर नक्कीच आलेले आहे त्यामुळे बाबासाहेब हा अनोखा संगम साधतात ते १ जानेवारी ला कोरेगाव या ठिकाणी जावून विजय स्तंभाला मानवंदना देतात जणू हेच सांगत असतात कि आजच्या दिवशी एक  बौद्ध धम्माच्या महत्वाचा परंपरेचा शोध लागला आहे सांची चा महास्तूप आजच्या दिवशी याच लढाई साठी पाठवलेल्या सैनिकांनी शोधून काढला हे इतिहासात मात्र लपवून ठेवलेले आहे आपण जगापुढे जाताना हे मात्र उजेडात आणले पाहिजे
त्यामुळे कोरेगाव च्या विजयस्तंभाला मानवंदना देणाऱ्या बौद्ध बांधवाना हा हि  इतिहास माहिती असणे आवश्यक आहे
जोवर तुम्हाला तुमचा इतिहस कळणार नाही तोवर तुम्हाला त्याचे महत्व  कळणार नाही का बाबासाहेब यांनी १९५६ ला बुद्ध च्या ओटीत टाकले याचा विचार करा १९२७ ला कोरेगाव ला जाणार्या बाबासाहेब यांना या बौद्ध संस्कृतीचा चांगला परिचय झाला होता
कोरेगाव च्या लढाई साठी पाठवलेली कुमक म्हणून जी पलटण पाठवली तिने सांचीच्या स्तुपाचा शोध घेणे आणि भीमा कोरेगाव ला त्याच लढाई मध्ये लढाई विजय होणे एक योगायोग समजावा असा आहे
त्यामुळे भीमा कोरेगाव ला विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या लोकांनी हा इतिहास अभ्यासावा वाचवा आणि बौद्ध धम्माच्या इतिहासाची ओळख असणाऱ्या बौद्ध लेण्याकडे वळावे कारण इथूनच बौद्ध धम्माची पाळेमुळे शोधण्यास सुरुवात झाली आहे चला तर आपला वारसा जतन करण्यासाठी पुढे येवू या


जयभीम नमो बुद्धाय  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र